AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुलगा आणि बायको तोंडाला स्कार्फ बांधून आले, रोहित आर्याचा मध्यरात्रीच उरकला अंत्यसंस्कार, स्मशानभूमीत फक्त इतके लोक होते…

Rohit Arya Encounter : मध्यरात्रीच उरकले रोहित आर्या याचे अंत्यसंस्कार विधी, स्कार्फ बांधून आलेले नातेवाईक, फक्त इतकेच नातेवाईत होते उपस्थित..

मुलगा आणि बायको तोंडाला स्कार्फ बांधून आले, रोहित आर्याचा मध्यरात्रीच उरकला अंत्यसंस्कार, स्मशानभूमीत फक्त इतके लोक होते…
फाईल फोटो
| Updated on: Nov 01, 2025 | 8:28 AM
Share

Rohit Arya Encounter : मुंबईतील पवई येथील आरए स्टुडिओमध्ये 17 मुलांना ओलीस ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ माजली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक चौकशी करत असून कारवाई करत असताना अरोपी रोहित आर्या याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला. 17 चिमुकल्यांचे प्राण वाचवण्यासाठी पोलिसांनी रोहित आर्या याच्यावर गोळी झाडली आणि त्यांच्या तावडीतून मुलांची सुटका केली. आता मिळालेल्या माहितीनुसार, रोहित आर्या याच्या मृतदेहाचं शवविच्छेदन झाल्यानंतर कुटुंबियांकडे सोपवण्यात आला.

रोहित याच्यावर अंत्यसंस्कार…

मिळालेल्या माहितीनुसार, रोहित आर्या याच्या मृतदेहावर पुण्यातील वैकुंठ स्मशान भूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. रोहित आर्या याची पत्नी आणि भावाने त्याचा मृतदेह पुण्यात आणला. त्यानंतर मध्यरात्री अंत्यविधीची तयारी सुरु करण्यात आली..

अंत्यविधीला पत्नी आणि मुलगा देखील असल्याची माहिती समोर आली. मात्र मुलगा आणि पत्नी तोंडाला स्कार्फ बांधून अंत्यविधीला आलेले. मध्यरात्री 2.30 वाजता रोहित याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

इतके लोकं होती रोहितच्या अंत्यविधीला उपस्थित

जवळपास 12 नातेवाईकांच्या उपस्थितीमध्ये रोहित आर्याचा अंत्यविधी पार पडला. रात्री 2.35 वाजता रोहित याला अखेरचा निरोप देण्यात आला. अंत्यविधीला आलेल्या 12 नातेवाईक देखील तोंडाला स्कार्फ बांधल्याची माहिती समोर येत आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

मुंबईतील पवई येथे असलेल्या आरए स्टुडिओत 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्या याचे एन्काऊंटर केलं. ओलीस ठेवलेल्या मुलांची सुटका करण्यासाठी मुंबई पोलिसांनी ऑपरेशन राबवले.  यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात रोहित आर्याच्या छातीजवळ गोळी लागली आणि यातच त्याचा मृत्यू झाला.

पीएसआय अमोल वाघमारे यांनी रोहित आर्याचा एन्काऊंटर केला आहे. पर्याय नसल्याने गोळीबार करावा लागला, असे एपीआय वाघमारे यांनी सांगितलं. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत..

मिळालेल्या माहितीनुसार, ओलीस ठेवलेल्या 17 मुलांना एका वेबसिरिजसाठी ऑडिशन आयोजित करण्यात आलं आहे… असं सांगत रोहित याने मुलांना आरए स्टुडिओमध्ये बोलावलं होतं…  तुमची निवड झाल्यास वेबसिरीजमध्ये काम करायला मिळेल, असे सांगत मुलांना आरए स्टुडिओत बोलवण्यात आले. सकाळी रोहित मुलांच्या पालकांना म्हणाला, ‘मुलांना 10 मिनिटं भेटून घ्या…’ पण त्यानंतर रोहित याने मुलांना ओलीस ठेवलं.

धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.