AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | जेव्हा राष्ट्रवादीच्याच कार्यक्रमातून रोहित पवारांना काढता पाय घ्यावा लागला

जळगावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे बेशिस्त वर्तन आणि आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आमदार रोहित पवार यांना मनस्ताप सहन करावा लागला (Rohit Pawar leaves NCP Program)

VIDEO | जेव्हा राष्ट्रवादीच्याच कार्यक्रमातून रोहित पवारांना काढता पाय घ्यावा लागला
| Updated on: Jan 25, 2021 | 10:33 AM
Share

जळगाव : राष्ट्रवादीच्या कार्यालयात आयोजित कार्यक्रमावेळी गोंधळ उडाल्याचं पाहून युवा आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावरच काढता पाय घेण्याची वेळ आली. पाच मिनिटात भाषण आटोपतं घेऊन रोहित पवारांना जळगावातील कार्यक्रम अर्ध्यावर सोडून निघावं लागलं. जळगावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे बेशिस्त वर्तन आणि आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आमदार रोहित पवार यांना मनस्ताप सहन करावा लागला. (Rohit Pawar leaves NCP Program in Jalgaon after mismanagement)

पाच मिनिटात भाषण आटोपून रवाना

जळगावच्या राष्ट्रवादी कार्यालयात कार्यक्रमस्थळी गोंधळ उडाल्याचे पाहून रोहित पवार यांनी थेट माईकचा ताबा घेतला आणि भाषणाला सुरुवात केली. मात्र अवघ्या पाच मिनिटांत त्यांनी भाषण आटोपतं घेतलं. त्यानंतर ते कार्यकर्त्यांना चुकवत कार्यालयाच्या मागच्या दरवाजाने कसेबसे बाहेर पडले.

रोहित पवारांनी डोक्याला हात मारला

जळगावातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे बेशिस्त वर्तन आणि आयोजकांच्या ढिसाळ नियोजनामुळे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आमदार रोहित पवार यांना मनस्ताप सहन करावा लागला. पक्षाच्या जिल्हा कार्यालयात आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी करत गोंधळ घातल्याने रोहित पवारांना कार्यक्रम आटोपता घेऊन काढता पाय घ्यावा लागला. कार्यकर्त्यांची रेटारेटी, घोषणाबाजी आणि बेशिस्त वर्तन पाहून त्यांनी डोक्याला हात मारुन घेतला.
रोहित पवार रविवारी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले होते. या दौऱ्यात दुपारी तीन वाजता ते जळगावातील पक्षाच्या जिल्हा कार्यालयाला भेट देणार होते. या ठिकाणी त्यांच्या छोटेखानी सत्कारासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीचे नियोजन होते. परंतु आयोजकांनी कोणत्याही प्रकारचे नियोजन केलेले नसल्याने कार्यक्रमाचा फज्जा उडाला.

“…तरच निवडणुकांमध्ये चित्र बदलेल”

ग्रामपंचायत निवडणुकीत राज्यभर युवा वर्गाच्या हाती सत्तेची सूत्रे गेली आहेत. यापुढे आपण सर्व जण एकत्र आलो, तर पुढील निवडणुकांमध्ये निश्चितच चित्र बदलेल, असा विश्वास आमदार रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

“भाजपने अर्णब गोस्वामींच्या अटकेची मागणी करावी”

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या माहितीची खातरजमा केल्याशिवाय ती पुढे पाठवू नये. काही विरोधक सोशल मीडियाच्या माध्यमातून संविधानाच्या विरोधात माहिती पाठवू शकतात. देशाच्या सुरक्षेला बाजूला ठेऊन एखाद्या पत्रकाराला माहिती पुरवणे, तीपण तीन दिवस आधी देणे, चुकीचे आहे. तो फक्त भाजपच्या बाजूने बोलत असेल म्हणून अशी माहिती देणे योग्य नाही. अशा प्रकारे केंद्र सरकारकडून आपल्या सर्वांची सुरक्षा धोक्यात येत असेल, तर आपण सर्वांनी त्याच्यावर कारवाईची केंद्राकडे मागणी करायला हवी. भाजपने स्वतः अर्णब गोस्वामींच्या अटकेची मागणी करायला हवी, अशा शब्दात रोहित पवार यांनी अर्णब गोस्वामींवर हल्लाबोल चढवला. (Rohit Pawar leaves NCP Program in Jalgaon after mismanagement)

राज्य सरकारची मागणी कोर्ट मान्य करेल : रोहित पवार

मराठा आरक्षणाची मागणी करताना दुसऱ्या समाजाच्या आरक्षणातून आम्हाला हक्क पाहिजे, असं कोणीही बोलत नाही. मात्र काही जण ओबीसी समाजात वेगळ्या प्रकाराचा अपप्रचार करुन समाजात तेढ निर्माण करत आहेत. अशा लोकांना शोधलं पाहिजे, असंही रोहित पवार  पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
मराठा आरक्षण प्रश्‍नी खंडपीठात जी सुनावणी सुरु आहे, ती ऑनलाईन पद्धतीने न होता, समोरासमोर व्हावी अशी विनंती राज्य सरकारने न्यायालयाकडे केली आहे. राज्य सरकारची विनंती न्यायव्यवस्था मान्य करेल, असा विश्‍वास रोहित पवारांना वाटतो.
पाहा व्हिडीओ :

संबंधित बातम्या :
(Rohit Pawar leaves NCP Program in Jalgaon after mismanagement)
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.