AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमने-सामने असताना पडद्याआडून भाजप..रोहित पवारांचा मोठा दावा

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमने-सामने आले आहेत. या निवडणुकीच्या पडद्याआडून भाजप शिरकाव करत असल्याचा दावा रोहित पवारांनी केला आहे.

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमने-सामने असताना पडद्याआडून भाजप..रोहित पवारांचा मोठा दावा
Rohit pawar Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 04, 2026 | 9:39 AM
Share

पुण्यातील बारामती तालुक्यातील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमुळे राजकारण तापलं आहे. सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार तयारी केल्याचे दिसत आहे. दुसरीकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने प्रयत्न सुरू केले आहेत. कारखान्यावरील सत्ता मिळवण्यासाठी राष्ट्रवादीचे दोन्ही गट आमनेसामने आले आहेत. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने निवडणुकीच्या प्रचाराची धुरा युगेंद्र पवार यांच्याकडे सोपवली आहे. याच निवडणुकीच्या माध्यमातून भाजप बारामतीत शिरकाव करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केली आहे.

पुण्यातील आंदोलनस्थळावरून माध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार म्हणाले, ‘मुख्यमंत्री हुशार माणूस आहेत, आमच्यात मतभेद आहेत. मात्र विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही त्यांच्याशी चर्चेला तयार आहे.मुख्यमंत्र्यांनी बोलवलं तर मी जाणार नाही. मात्र विद्यार्थी चर्चेसाठी जातील.  दुष्काळामुळे शेतकरी पूर्णतः आर्थिक अडचणीत आला आहे’.

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन संपल्या संपल्या लगेच मी दुष्काळ दौऱ्यावर निघणार आहे. सध्या राजकारणात, निवडणुकीत काय चालले हे मला माहीत नाही, सध्या मी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी लढत आहे.  अजितदादा असते तर श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पुरुषोत्तम जगताप हे वेगळे झाले नसते. भाजप बारामतीमध्ये शिरकाव करण्याचा प्रयत्न करतंय. पवारसाहेब येत्या काळात सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत काहीतरी शेतकऱ्यांच्या हितासाठी राजकीय समीकरण जुळवतील. एमपीएससी विद्यार्थ्यांचा आंदोलन दुष्काळ दौरा आणि त्यातून वेळ मिळाला तर मी सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी जाईल’.

अजितदादांच्या अपघात प्रकरणावर भाष्य करताना रोहित पवार म्हणाले,  येत्या 10 ऑक्टोबर रोजी मी सर्व प्रेझेंटेशन घेणार आहे. त्यामध्ये पुराव्यासहित त्या नेत्याचे नाव जाहीर करणार आहे. व्हीएसआर कंपनीला कोण वाचवते हे देखील सांगणार आहे’. रोहित पवारांच्या विधानाने एकच खळबळ उडाली आहे. रोहित पवारांनी मफलर मॅन अशी उपाधी दिलेला नेता कोण आहे, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.  बारामतीतील श्री सोमेश्वर कारखाना निवडणुकीत नेमकं काय घडणार, याकडे सर्व राजकीय पक्षांच्या नजरा असणार आहेत.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर