बदल्या तर होणारच, सामना अग्रलेखातून विरोधकांच्या टीकेचा समाचार

बदल्या तर होणारच, सामना अग्रलेखातून विरोधकांच्या टीकेचा समाचार

ठाकरे सरकारकडून पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत (Saamana Editorial on IPS Officer transfer).

सचिन पाटील

| Edited By:

Sep 04, 2020 | 8:27 AM

मुंबई : ठाकरे सरकारकडून पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत (Saamana Editorial on IPS Officer transfer). राज्यातील 40 हून अधिक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. पण या बदलीच्या आदेशानंतर विरोधी पक्षाने ठाकरे सरकारवर निशाणा साधत टीका केली आहे. या टीकेवर आज (4 सप्टेंबर) सामना अग्रलेखातून विरोधी पक्षाचा समाचार घेण्यात आला आहे (Saamana Editorial on IPS Officer transfer).

“गृहमंत्री अनिल देशमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात अशा नेत्यांनी एकत्र बसून पोलीस अधिकाऱ्यांच्या बदलीचे पत्ते पिसले आहेत हे स्पष्ट दिसते. कोणत्याही कुरबुरी न होता हे बदल झाले हे महत्त्वाचे. बाकी विरोधक काय बोलतात आणि टीका करतात याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. मर्जीतले अधिकारी त्यांनी त्यांच्या काळात नेमले. आता कर्तबगारी, राज्याची गरज पाहून नेमणुका झाल्या. त्यामुळे कोणी कितीही टीका केली तरी सरकाराचा व्यवहार जनतेच्या सुरक्षेशी असतो, त्याबाबत व्यवहार चोख झाला आहे असे सांगता यावे अशा प्रकारे पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत”, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

“पोलीस दलात प्रथमच मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. यावर विरोधी पक्षाने नेहमीप्रमाणे टीकेचे तुणतुणे वाजवले आहेत. सरकारला बदल्यांशिवाय दुसरे काहीच काम नाही किंवा बदल्यांचे दुकान उघडले आहे असे नेहमीचेच ठेवणीतले टीकास्त्र सोडले आहे. चंद्रकांत पाटील वगैरे नेत्यांनी त्याहीपुढे जाऊन टीकेच्या डफावर थाप मारत सांगितले आहे की, थांबा, आता बदल्यांमागचा हिशेबच जाहीर करतो. हिशेबाची वही आधीच्या सरकारने ठेवली असावी अशे एकंदरीत पाटलांच्या विधानावरुन दिसते. बदल्यांचा आदेश निघाल्यापासून विरोधी पक्षांच्या गुदमरलेला श्वास पाहता सरकारने पोलिसांच्या बदल्या करुन चांगलेच केले हे मानायला जागा आहे. यापैकी बहुतेक अधिकारी फडणवीस सरकारच्या काळात नेमलेले होते आणि सरकारने शपथ घेताच या अधिकाऱ्यांना तत्काळ बदलावे अशी जोरात मागणी असतानाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सात-आठ महिने कोणत्याही प्रमुख अधिकाऱ्यास हात लावला नाही. कोव्हिड काळात याच अधिकाऱ्यांच्या मदतीने मुख्यमंत्र्यांनी संकटाचा सामना केला. प्रशासन हे लोकनियुक्त सरकारचे असते. एखाद्या राजकीय पक्षाचे ते नसते. मुख्यमंत्र्यांनी प्रशासनावर विश्वास ठेवला हे महत्त्वाचे. पहिल्या महिन्याभरातच त्यांना बदल्या करता आल्या असत्या, पण त्या केल्या नाहीत”, असंही सामनामध्ये म्हटले आहे.

“आता ज्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत, त्याचा अभ्यास विरोधकांनी केला तर इतक्या पारदर्शक बदल्या आणि नेमणुका यापूर्वी कधीच झाल्या नाहीत याची खात्री त्यांना पटेल. देवेन भारती हे दहशतवादीविरोधी पथकाचे (एटीएस) काम उत्तम प्रकारे करत होते. त्यांचा दरारा, नावलौकिक चांगला होता. त्यांना मुंबई-महाराष्ट्रातील गुन्हेगारी जगताची खडान्खडा माहिती होती. तरीही त्यांचा बराच कार्यकाळ बाकी असताना त्यांची बदली का झाली?”, असा प्रश्नही सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.

“प्रशासनाच्या मूळ प्रवाहात आणणे हेच राजकीय नेतृत्वाचे काम असते. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या महासंचालकपदी रजनीश सेठ आले. मुंबईचे सहआयुक्त (गुन्हे) म्हणून मिलिंद भारंबे, मुंबईच्या वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी सहआयुक्त म्हणून यादवांवर पडली आहे. हे सर्व कर्तबगार अधिकारी आहेत आणि त्यांच्या नेमणुकांवर टीका करणे म्हणजे पोलीस दलाचे खच्चीकरण करण्याचेच प्रयोग आहेत”, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.

संबंधित बातम्या :

पोलिस दलात मोठे फेरबदल, विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईत बदली

मुंबई पोलीस आयुक्तांनी केलेल्या 12 उपायुक्तांच्या बदल्यांना गृहमंत्र्यांची तीन दिवसात स्थगिती

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें