AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sachin Ahir : तीन दिवस एकमेकांच्या संपर्कात… उद्धव ठाकरे दौऱ्यावर जाताच शिंदेंनी डाव…; सचिन अहिर फुटीमागची Inside स्टोरी समोर

उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर असतानाच एकनाथ शिंदे यांनी मोठी राजकीय खेळी करत विश्वासू सचिन अहिर यांना आपल्या गटात ओढले. ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. तीन दिवसांपासून शिंदे यांच्या संपर्कात असलेले अहिर, कामगार वर्गात मजबूत पकड असलेले नेते होते. ही फूट ठाकरे गटासाठी धक्कादायक असून, शिंदेंच्या वाढत्या वर्चस्वाचे संकेत देत आहे.

Sachin Ahir : तीन दिवस एकमेकांच्या संपर्कात... उद्धव ठाकरे दौऱ्यावर जाताच शिंदेंनी डाव...; सचिन अहिर फुटीमागची Inside स्टोरी समोर
सचिन अहिर फुटीमागची Inside स्टोरी समोर
| Updated on: Jun 30, 2026 | 2:20 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) यांना झटक्यावर झटके देणं सुरू केलं आहे. आधी सहा खासदारांनी फोडल्यानंतर आता मातोश्रीतील विश्वासू माणूस असलेल्या सचिन अहिर (Sachin Ahir) यांना शिंदे यांनी फोडलं आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. खासदार फुटले म्हणून या खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे गेले होते. मतदारसंघातील शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना आपल्यासोबत ठेवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हा तीन दिवसांचा दौरा आयोजित केला होता. पण या तीन दिवसातच मोठा गेम फिरला. आपल्या माघारी काय चाललंय हे उद्धव ठाकरेंनाही कळलं नाही. एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळी केली अन् ठाकरेंच्या पक्षात मोठा राजकीय भूकंप झाला.

सचिन अहिर यांनी आदित्य ठाकरे यांना आज सकाळी संपर्क साधून पक्ष सोडणार असल्याचं सांगितलं होतं. आदित्य ठाकरे यांनी अहिर यांना थांबवण्याचा प्रयत्नही केला. मात्र अहिर आपल्या भूमिकेवर ठाम होते, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. पक्ष सोडल्यानंतर सचिन अहिर यांनी भारतीय कामगार सेना आणि बेस्ट कर्मचारी सेनेच्या पदावरून राजीनामा दिला आहे. कामगार वर्गात अहिर यांची मोठी पकड होती. त्यामुळे अहिर फुटल्याने ठाकरे गटासाठी मोठा झटका मानला जात आहे.

गेल्या 3 दिवसांपासून सचिन अहिर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात होते. त्यांचं फोनवर बोलणं सुरू होतं. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अहिर यांनी शिंदे यांची भेटही घेतल्याचं सांगितलं जात आहे. उद्धव ठाकरे मराठवाडा आणि विदर्भाच्या तीन दिवसाच्या दौऱ्यावर गेलेले असतानाच इकडे शिंदे यांनी अहिर यांच्याशी संपर्क साधून त्यांचं मन वळवलं. त्यात त्यांना यश आलं आणि आज अहिर यांनी ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र केला आहे.

वैयक्तिक कारणामुळे…

पक्ष सोडल्यानंतर वैयक्तिक राजकीय भूमिका ही घेतली आहे, असं मत सचिन अहिर यांनी दिली आहे. तर सचिन अहिर यांनी उपसभापतीपदाचा फॉर्म भरल्याने पुढील दोन वर्षाकरिता उपसभापती पद हे सचिन अहिर यांच्याकडे असणार आहे.

आणखी प्रवेश होणार

दरम्यान, सचिन अहिर यांच्यासोबत वरळीतील अनेक कार्यकर्ते शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत. 2019 ला सचिन अहिर यांच्यासोबत आलेले पदाधिकारी ठाकरेंना सोडून शिंदे सेनेत प्रवेश करणार आहेत. ठराविक पदाधिकाऱ्यांचा आज प्रवेश होणार आहे. इतर कार्यकर्त्यांच्या प्रवेशानंतर बाकी कार्यकर्त्यांचा प्रवेश होणार आहे, असं सांगितलं जात आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा