ना NIA कोर्ट, ना ED, सचिन वाझे ते खडसेंचा जावई, अद्याप कोणालाच जामीन नाही

NIA ने अटक केलेल्या सचिन वाझे, रियाझ काझी, विनायक शिंदे, सुनील माने, नरेश गोर, सतीश मोठेकरी या आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. सर्व आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांनी वाढ केली आहे.

ना NIA कोर्ट, ना ED, सचिन वाझे ते खडसेंचा जावई, अद्याप कोणालाच जामीन नाही
सचिन वाझे आणि एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी

मुंबई : मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेल्या गाडी प्रकरणात आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात NIA ने अटक केलेल्या सचिन वाझे, रियाझ काझी, विनायक शिंदे, सुनील माने, नरेश गोर, सतीश मोठेकरी या आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. सर्व आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांनी वाढ केली आहे. त्यामुळे आता हे सर्व आरोपी 2 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत असणार आहेत. न्यायमूर्ती प्रशांत सित्रे यांनी सर्व आरोपींच्या न्यायालयीन कोठडीत वाढ केलीय. (Sachin Waze and Eknath Khadse’s son-in-law Girish Chaudhary, have not been granted bail)

खडसेंच्या जावयाच्या न्यायालयीन कोठडीतही वाढ

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या ईडी कोठडीतही वाढ करण्यात आली आहे. गिरीश चौधरी यांना आता 26 जुलैपर्यंत ईडी कोठडीत पाठवण्यात आलं आहे. ईडीचा तपास अद्याप पूर्ण न झाल्यामुळे ईडीने पुन्हा एकदा कोठडीची मागणी केली होती. न्यायाझीश एस. एच. गवलानी यांनी गिरीश चौधरी यांच्या कोठडीत वाढ केली आहे. पुण्यातील भोसरी जमीन घोटाळा प्रकरणात गिरीश चौधरी यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.

यापूर्वी झालेल्या सुनावणीत गिरीश चौधरी यांची अटक बेकायदेशीर असल्याचा युक्तिवाद त्यांचे वकील मोहन टेकावडे यांनी 15 जुलै रोजी कोर्टात केला. या प्रकरणात आम्हाला अनेक साक्षीदार सापडत आहेत. काही साक्षीदार पुढील आठवड्यात ईडीच्या कार्यलयात येणार आहेत. त्यामुळे साक्षीदार आणि आरोपी यांचा आम्हाला समोरासमोर तपास करायचा आहे. त्यामुळे 7 दिवसांची ईडी कोठडी द्यावी, अशी मागणी ईडीचे वकील हितेन वेनेगावकर यांनी कोर्टात केली होती.

वसुलीचे पैसे घेणारा नंबर एक कोण? सचिन वाझेनं फोडलं नाव

मुंबई पोलीस दलातील अटकेत असलेला निलंबित API सचिन वाझेने आठवडाभरापूर्वी ईडीकडे अनेक खुलासे केले होते. 100 कोटी वसुली प्रकरण आणि अंबानींच्या घराबाहेर ठेवलेल्या स्फोटकांप्रकरणात सचिन वाझे आरोपी आहे. तळोजा जेलमध्ये असलेल्या वाझेने ईडीला दिलेल्या माहितीमुळे तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा पाय आणखी खोलात जाण्याची चिन्हं आहेत.

आरोपी सचिन वाझेने तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संपर्कात असल्याचा खुलासा केला. यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढणार आहेत. वाझे हा स्फोटकांनी भरलेली गाडी अंबानी यांच्या घराजवळ पार्क केल्याच्या गुन्ह्यात आरोपी आहे. या प्रकरणात सचिन वाझे सध्या तळोजा जेलमध्ये आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी वाझेच्या चौकशीसाठी ईडी कोर्टाची परवानगी घेतली होती. त्यानुसार ईडीला 10 ते 12 जुलै या काळात चौकशीसाठी परवानगी मिळाली होती.

संबंधित बातम्या :

ईडीची पहिली मोठी कारवाई, अनिल देशमुखांची 4 कोटींची संपत्ती जप्त

भोसरी जमीन घोटाळा, एकनाथ खडसेंना मोठा दणका, जावई गिरीश चौधरींना ईडीची अटक

Sachin Waze and Eknath Khadse’s son-in-law Girish Chaudhary, have not been granted bail

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI