AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, सदाभाऊ खोत यांची मागणी

सरकारने पंचनाम्याच्या प्रक्रियेत अडकून न राहता तातडीची मदत देणं गरजेचे असल्याचे मत सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले. आपत्तीग्रस्त नागरिकांना धीर देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी दौरे गरजेचं आहे, असेही ते म्हणाले. ( Sadabhau Khot demands state govt declare wet drought in maharshtra)

राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, सदाभाऊ खोत यांची मागणी
| Updated on: Oct 20, 2020 | 3:02 PM
Share

कोल्हापूर : राज्य सरकारने तातडीने ओला दुष्काळ तातडीने जाहीर करावा, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे. सरकारने पंचनाम्याच्या प्रक्रियेत अडकून न राहता तातडीची मदत देणं गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. आपत्तीग्रस्त नागरिकांना धीर देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी दौरे गरजेचं आहे, असेही ते म्हणाले. ( Sadabhau Khot demands state govt declare wet drought in maharshtra)

सध्या सरकारमध्ये असलेल्या लोकांनी या आधी केलेल्या मागण्या आता पूर्ण कराव्यात,असं खोत यांनी म्हटले. शरद पवार यांनी 2019 ला सरसकट कर्जमाफीची मागणी केली. आता या सरकारचे सूत्रधार असलेले पवारसाहेब ती मागणी विसरले आहेत का की त्यांच्या लक्षात आहे, हे शेतकऱ्यांना पाहायचं आहे, असे सदाभाऊ खोत म्हणाले आहेत.

नाचत येईना अंगण वाकड अशी राज्य सरकारची स्थिती झाली असून राज्याच्या मागणी नंतर केंद्रातून मदत येत असते. या सरकारची अवस्था वराती मागून घोड येत आहे, अशी झाल्याची टीका खोत यांनी केली.

2019 च्या महापुराच्या काळात राज्यसरकारने तातडीने रोख आणि सरसकट मदत दिली. तुमच्यात ही दानत आहे का? असा सवाल खोत यांनी राज्य सरकारला केला. राज्याने तातडीने मदत काय करणार हे आदी सांगावे. राज्यावर चार दोन लाख कोटींवर कर्ज होईल ते काढावे पण शेतकऱ्यांना मदत करावी, असं आवाहन खोत यांनी केले आहे

राज्य सरकारमध्ये तीन सावत्र भाऊ एकत्र असल्यामुळे प्रत्येकाचे मत घेतल्याशिवाय कोणीच निर्णय घेऊ शकत नाही. ओला दुष्काळ जाहीर करावा यासाठी 22 तारखेला रयत क्रांती राज्यात तहसील कार्यालयावर जागरण गोंधळ आंदोलन करणार असल्याची माहिती खोत यांच्याकडून देण्यात आली.

ऊसाच्या दराबद्दल बोलताना विना कपात पहिला हप्ता 14 दिवसात दिला गेला पाहिजे. आधारभूत किंमत वाढवल्यावर दुसरा हप्ता आणि साखरेची बाजारातील किंमत पाहून तिसरा हप्ता द्यावा, अशी मागणी खोत यांनी केली.

संबंधित बातम्या : 

Sadabhau Khot | लासलगावमध्ये कांदाप्रश्नी केंद्रसरकार विरोधात सदाभाऊ खोत यांचे आंदोलन

SadaBhau Khot | माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण

( Sadabhau Khot demands state govt declare wet drought in Maharshtra)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.