Chhatrapati Sambhajinagar Election Results 2026 LIVE: गारखेड्यासह साताऱ्यात आवाज कुणाचा? कोणता उमेदवार गुलाल उधळणार, आताच जाणून घ्या

Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation Election Results 2026 LIVE Updates in Marathi : शहरातील महत्त्वाचा भाग असलेल्या चिखलठाण्यापासून ते गारखेड्यापर्यंतचा बीडबायपास लागून असलेला समांतर भाग आणि पल्याड असलेल्या सातारा परिसरात कोणत्या पक्षाचा वरचष्मा आहे?

Chhatrapati Sambhajinagar Election Results 2026 LIVE: गारखेड्यासह साताऱ्यात आवाज कुणाचा? कोणता उमेदवार गुलाल उधळणार, आताच जाणून घ्या
छत्रपती संभाजीनगर महापालिका निकाल
| Edited By: | Updated on: Jan 16, 2026 | 12:24 AM

Chhatrapati Sambhajinagar Election Results 2026 LIVE: चिखलठाण्यापासून ते गारखेड्यापर्यंत बीडबायपास लागून असलेली आणि जालना रस्त्या पल्याडची जुनी वसाहत हा कधीकळी शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. येथील वसाहतींनी कायम सेनेचा किल्ला शाबूत ठेवला. पण आता भाजपने अनेक ठिकाणी दिमाखात प्रवेश केला आहे. भाजप या पट्ट्यातही मोठा भाऊ होण्याची तयारी करत असताना महापालिका निवडणुकीत दमखम दाखवण्याची मोठी संधी चालून आली. या जुन्या आणि सर्वात मोठ्या मतदारसंघात सातारा-देवळाईचा नव्यानेच समावेश झाला. येथे आता कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येणार याची उत्सुकता चांगलीच ताणल्या गेली आहे. काल झालेल्या मतदानात मतदाराचा कौल कुणाच्या पारड्यात पडणार याची जोरदार चर्चा सुरु होती. आज अखेर निकाल हाती आले आहेत.

शहरातील 29 प्रभागात 115 नगरसेवक निवडून येणार आहेत. यावेळी 2015 पेक्षा दोन जागा वाढल्या आहेत. यावेळी शहराच्या राजकारणात दोन पक्षांचा भरणा वाढला आहे. शिंदे सेना आणि अजितदादांची राष्ट्रवादीची या राजकारणात एंट्री झाली आहे. तर एमआयएम गेल्या दहा वर्षांपासून शहराच्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बदलवत आहेत. यावेळी प्रचारात या मुद्यावर ज्यांनी आश्वासनांचा पाऊस पडला. त्यांचं पारडं जड भरत की, नवीन दमाच्या उमेदवारांना संधी मिळते हे आता समोर आलं आहे.

Live

Municipal Election 2026

10:58 PM

सोलापूरात निकालापूर्वीच किरण देशमुखांच्या विजयाचे बॅनर

09:12 PM

जळगाव : दोन महिलांना यादीत नाव असूनही मतदान करता आले नाही

08:00 PM

BMC Election 2026 Exit Poll Prediction : जेव्हीसीच्या एक्झिट पोलनुसार मुंबईत कोणाला किती जागा?

06:58 PM

एक्झिट पोलनुसार मुंबईत शिवसेना ठाकरे गट, मनसेला धक्का

11:39 PM

ठाणे मानपाडात मतमोजणी केंद्रावर राडा

11:00 PM

राज ठाकरेंच्या जागा कमी येणार, एक्झिट पोलचा अंदाज

प्रभाग क्रमांक 26

प्रभाग क्रमांक 26 ची लोकसंख्या 41,166 इतकी आहे. सातारा-देवळाईचा भाग, ऊर्जा नगर, साईनगर, सत्कर्म नगर, रेणुकापुरम, ज्ञानेश्वर नगर, पांडुरंग नगर, वेणुसूत कॉलनी, दिशा घरकुल, विजयंतनगर, वंसत विहार, अरुणोदय कॉलनी,माऊली नगर, श्रीकृष्ण नगर, बजरंग हिल्स,हरिप्रसाद नगर, विठ्ठल नगर, ख्वाजा नगर, सरदार रेसिडेन्सी, रहिम नगर, श्री विहार कॉलनी, श्रीनिवास कॉलनी,श्री रेसिडेन्सी, रहिम नगर, श्री विहार कॉलनी,श्रीनिवास कॉलनी, आभूषण पार्क, राजेश नगर, सारासिद्धी, नाईक नगर, देवळाई शिवार, सर्व गट क्रमांक, अलोकनगर, चंद्रशेखरनगर, कुमावत नगर, सातारा तांडा, सुधाकर नगर, आयटीआय कॉलनी, पवार वस्ती, छत्रपती नगर, अप्रतिम परिसर, आमदार रोड, रोहिदास कॉलनी, लक्ष्मी कॉलनी, पेशवे नगर, टेलीफोन भवन परिसर, संग्राम नगर या परिसराचा या प्रभागात समावेश आहे.

प्रभाग क्रमांक 27

प्रभाग क्रमांक 27 ची लोकसंख्या 46,580 इतकी आहे.या प्रभागात बाळकृष्ण नगर, भूषण नगर, ईसाक नगर, कल्पतरू सोसायटी,शिवनेरी नगर,जय दुर्गा हौऊसिंग सोसायटी, नेहरुनगर, देशमुख नगर, विजय नगर, गारखेडा गाव, शिवनेरी कॉलनी, एमरॉल्ड सिटी, रेणुका नगर, गुरुदत्त नगर, गणेश नगर, भारत नगर, आनंद नगर, आशा नगर हा परिसर येतो.

प्रभाग क्रमांक 28

या प्रभागाची लोकसंख्या 46,420 इतकी आहे. या प्रभागात एकनाथ नगर, म्हाडा कॉलनी, फुलेनगर, शहा कॉलनी,द्वारकापूरी, कबीर नगर, नागसेन नगर, मिलिंद नगर, बनेवाडी गावठाण, राहुल नगर, सादत नगर, थर्टी ग्रीन कॉलनी, हमालवाडा, रेल्वे स्टेशन सिल्कमिल कॉलनी असा परिसर येतो.

प्रभाग क्रमांकविजयी उमेदवारपक्ष

प्रभाग क्रमांक 29

या प्रभागाची लोकसंख्या 29,149 इतकी आहे. बीड बायपासकडून पैठणकडे जाणाऱ्या रस्त्यावरील काही वसाहती यामध्ये येतात. कासलीवाल मार्वेल, एमआयटी कॉलेज परिसर, शीतल नगर, गादीया विहार, सातारा गाव, शंकर नगर, अभिनंदन सोसायटी, अमीर नगर, सुधाकर नगर, कांचनवाडी, काश्मिरीनगर, समतानगर, संताजी धनाजी नगर, नक्षत्रवाडी, दिशा सिल्क सिटी, इटखेडा रोड या वसाहतींचा यामध्ये समावेश आहे.

महत्त्वाच्या लिंक्स

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2026

महाराष्ट्र महापालिका निवडणूक निकाल 2026 मतमोजणीचे लाईव्ह अपडेट्स

बीएमसी महाराष्ट्र निवडणूक निकाल LIVE TV

महाराष्ट्र महानगरपालिकेचा सर्वात वेगवान निकाल पाहा फक्त टीव्ही 9 मराठीवर LIVE

छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणूक निकाल 2026 LIVE