
Chhatrapati Sambhajinagar ZP Sena-BJP Alliance: छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिकेत भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत काडीमोड झाला होता. त्यात शिंदेसेनाला मोठा हाबाडा बसला. आता जिल्हा परिषद निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र आले आहे. दोन दिवसांपासून त्यांच्या जागा वाटपावरून खलबतं झाली. त्यानंतर सिल्लोड वगळता इतर ठिकाणी दोन्ही पक्षात मनोमिलन झाले. जिल्हा परिषद निवडणुकीत भाजप- शिवसेना युती झाली आहे. एकूण 63 जागा असून, त्यात 25 जागा शिवसेना, 27 जागा भाजप लढवणार आहे. तर सिल्लोड विधानसभा क्षेत्रातील जागा दोन्ही पक्ष मैत्रीपूर्ण लढत आहेत. दरम्यान कोणता पक्षाला कुठली जागा सुटली आहे, पाहूयात….
छत्रपती संभाजीनगर/फुलंब्री
लाडसावंगी गट – भाजप
करमाड गट – भाजप
गोलटगांव गट – भाजप
पिंप्रीराजा गट – भाजप
सावंगी गट – शिवसेना
आडगाव बु गट – शिवसेना
बाबरा गट -भाजपा
पाल गट – भाजपा
गणोर गट – भाजपा
बडोदवाजार गट – शिवसेना
कन्नड विधानसभा
गोंदेगाव गट – भाजपा
नागद गट – शिवसेना
करंजखेडा गट – शिवसेना
चिंचोली लिंबाजी गट – शिवसेना
पिशोर गट – शिवसेना
कुंजखेडा गट – भाजपा
हतनूर गट – भाजपा
जेहुर गट – भाजपा
देवगाव रंगारी गट – भाजपा
वैजापूर विधानसभा
वाकला गट – भाजपा
बोरसर गट – शिवसेना
शिवूर गट – भाजपा
संवदगाव गट – शिवसेना
लासुरगाव गट – शिवसेना
पायगाव गट – शिवसेना
बांजरगाव गट – शिवसेना
महालगाव गट – भाजपा
नेवरगांव – भाजपा
पैठण विधानसभा
बिडकीन गट – भाजप
चितेगांव गट – शिवसेना
आडूळ बू गट – शिवसेना
पाचोड गट – शिवसेना
दावरवाडी गट- शिवसेना
ढोरकीन गट – शिवसेना
पिंपळवाडी पी. गट- शिवसेना
विहामांडवा गट – शिवसेना
नवगाव गट – शिवसेना
गंगापूर विधानसभा
सावंगी गट – भाजपा
अंबेलोहळ गट -भाजपा
रांजणगाव शे. पु. गट – भाजपा
वाळुज बु. गट – भाजपा
तुर्काबाद गट – शिवसेना
शिल्लेगाव गट -शिवसेना
जामगाव गट -शिवसेना
शेंदुरवादा गट -भाजपा
खुलताबाद विधानसभा
वेरुळ गट- भाजपा
बाजारसावंगी गट -भाजपा
गदाणा गट -भाजपा
छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा
दौलताबाद गट -भाजपा
वडगाव कोल्हाटी गट (उत्तर पूर्व) – भाजपा
वडगाव कोल्हाटी गट (मध्य पश्चिम) -शिवसेना
पंढरपूर गट -शिवसेना
सिल्लोड विधानसभा
सिल्लोड विधानसभा क्षेत्रात भाजप आणि शिवसेना यांच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. या ठिकाणी एकूण 11 जागा आहे.
मिनी मंत्रालयासाठी युती
जिल्हा परिषद निवडणुकीविषयी पालकमंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. महापालिका निवडणूक हे वेगळे क्षेत्र आहे. मात्र हे मिनी मंत्रालय म्हटले जाते. चांगला कारभार व्हावा म्हणून युती केल्याचे त्यांनी सांगितले. भाजप कुणाचा गेम करेल मात्र नाना पटोले यांचा गेम कोणी केला हे माहिती आहे का, पक्षांतर्गत काय गेम होतो ते पाहा, असा टोला त्यांनी पटोलेंना लगावला.
शिवसेनेचे भावनिक नाते होते ते नाकारता येत नाही. मराठी माणसांनी संघर्ष केला ते मराठी माणूस आणि बाळासाहेबांचं नातं मात्र आज या लोकांनी शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी दावणीला बांधली. हिंदुत्व कुठे गेले.आता हा विषय राहणार नाही. भविष्यात मराठी माणसाचा विचार केला तर चमत्कार घडेल मात्र सध्या नाही, असे शिरसाट म्हणाले.