आमदार म्हणून निवडून आलोय, मंत्रिपदाची अपेक्षा का ठेवू नये?; अब्दुल सत्तार यांचा सवाल; खैरेंना सडेतोड उत्तर

Abdul Sattar Claim on Ministry: सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपविरोधात मोठे वक्तव्य केल्याने राजकारणात खळबळ उडाली. त्यांच्या एका वक्तव्यामुळे सेना-भाजपमधील खदखद बाहेर आली. तर आता आमदार सत्तार यांनी मोठा राजकीय बॉम्ब टाकला आहे. त्यांनी मंत्री‍पदावरच दावा सांगितला आहे.

आमदार म्हणून निवडून आलोय, मंत्रिपदाची अपेक्षा का ठेवू नये?; अब्दुल सत्तार यांचा सवाल; खैरेंना सडेतोड उत्तर
अब्दुल सत्तार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे
Image Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Jun 04, 2026 | 1:43 PM

ज्ञानेश्वर लोंढे, टीव्ही ९ मराठी प्रतिनिधी : सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी दोन दिवसात महायुतीचे राजकारण ढवळून काढले. त्यांनी भाजपवर मोठा आरोप केला. भाजप मित्र पक्षाला संपवण्याचे काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. महायुतीत भाजप आणि शिंदे सेनेतील धुसफूस विधान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने चव्हाट्यावर आली. तर आता आमदार सत्तार यांनी अजून एक राजकीय बॉम्ब टाकला. त्यांनी आता मंत्रीपदावरच दावा ठोकला आहे. आगामा मंत्रिमंडळ फेरबदलात त्यांच्या हाती मंत्रीपद (Abdul Sattar Claim on Ministry) लागतं का? याची चर्चा रंगली आहे.

मंत्रिपदाची अपेक्षा का ठेवू नये?

अब्दुल सत्तार यांनी मुलगा समीर याला विधान परिषद निवडणुकीत उभे केले. त्यानंतर लागलीच भाजपवर तोफ डागली. मंत्री पदासाठी अब्दुल सत्तार हा खटाटोप करत असल्याचा आरोप माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. त्यावर सत्तार यांनी मोठे वक्तव्य केले. आपल्या नेत्याकडे आपल्या भावना मांडणं यात मंत्रिपदाचा कोणताही संबंध नाही. शेवटी कुणाला असं वाटतं का मंत्री बनवू नये, माझ्या नेत्यांनी मला मंत्री करायचं ठरवलं तर ते करतील त्यांनी नाही करायचं ठरवलं तर ते ठरवतील. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना राज्य चालवावे लागते. त्यांनी स्वत: बोलवलं आहे. अडीच वर्षानंतर मंत्रिमंडळात बदल होतील. मी आमदार निवडून आलो आहे मंत्री बनण्याची अपेक्षा का ठेवू नये? असा रोकडा सवाल करत त्यांनी मोठे संकेत दिले.

मंत्रीपद देण्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांना आहे. जर एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं सत्तार तो मंत्री पदाची शपथ घ्यायला मंत्रिमंडळाचे तर कोण नाही जाणार. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यादी दिली. ती जर फडणवीस यांनी संमत केली तर काम पुढे जातं. मी राजकारणात ज्यावेळेस मंत्री झालो आहे. मला मंत्रीपद नवीन नाही. याला मंत्री केल्यावर फायदा आहे का नुकसान आहे आमदार करणं खासदार करणे हे सगळं पाहिलं जातं. माझ्यामुळे पक्षाला फायदा होत असेल आणि एकनाथ शिंदे यांची संमती असेल तर त्यात गैर काय आहे, असे सत्तार म्हणाले.

रावसाहेब दानवेंविषयी पुन्हा उफाळले प्रेम

चंद्रकांत खैरे यांचे मी आभार मानेल. त्यांनी मला किमान एवढे तरी शाबासकी दिली. नाही तर एरव्ही ते मला रागाने बोलतात. अब्दुल सत्तार यांनी आपल्याला धोका दिला, राजकारणाचे समीकरण कुठे जातात. मी काय मूळ शिवसैनिक नव्हतो, एकनाथ शिंदे हे आमचे पालकमंत्री होते, सत्तार आणि शिवसेना ही समीकरण कुठे जळत नाही. मी 20 वर्षापूर्वी पृथ्वीराज बाबांना बोललो होतो शेवटचा मुख्यमंत्री म्हणून इतिहासात तुमचा मान जरूर राहील, काँग्रेसचे जे हाल होऊ राहिले आहेत ती जबाबदारी कोणाला घ्यावी लागेल. काँग्रेसमध्ये असतानाही मी बोललो होतो ज्या पद्धतीने आज बोललो. काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल त्यांची ताकद कमी झाली म्हणून बार्गनिंग पावर कमी झाली. पुढे राजकारण करण्यासाठी भाजपाला खारीचा वाटा तरी आमचा लागेल, असे सांगायला सत्तार विसरले नाहीत.

तर यावेळी त्यांनी राजकीय शहाणपण पुन्हा सिद्ध केले. रावसाहेब दानवे यांच्यावर त्यांनी कोणतीही टिप्पणी केली नाही. त्यांना काही सांगायचं नाही ते माझे मित्र आहेत, आम्ही रोज फोनवर बोलतो. जुने मित्र आहेत काही धमकी नाही मला त्यांच्याबद्दल काही बोलायचं नाही, असे मोठे वक्तव्य सत्तार यांनी केले.

जिल्ह्यातील वाद चव्हाट्यावर

स्थानिक लेवलवर जो त्रास होता तो मी जिल्हा पुरता बोललो. राग नव्हता. आमच्या जिल्ह्यातील इंटरनल वाद होता. तो वाद म्हणजे मी त्यांना बोललो मुंडके छाटेपर्यंत म्हणजे आमचे पद छाटले, जिल्हा परिषदमध्ये आमचा अध्यक्ष नाही, महानगरपालिकेत नाही, विधान परिषद ही नाही. राजकारण करताना आम्ही छोटे भाऊ आहोत आमचे मोठे भाऊ भारतीय जनता पार्टी आहे. चुका करून करून जो काही महायुतीचा गट बनला आहे छत्रपती संभाजी नगर याला शेत पडू नये म्हणून सावध भूमिका घेतली. पुढची रणनीती करताना भारतीय जनता पार्टीने आम्हाला विश्वासात घ्याव आम्ही त्यांना विश्वासात घेऊ. मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांचा मी आभार मानेल मुख्यमंत्र्यांनी एक तास आमच्याशी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांनी आमची खदखद जाणून घेतली त्यांनी सांगितलं मी आमच्या पक्षालाही बोलेल दोघे महायुतीचे पार्ट आहेत चांगले राजकारण करा. जे मनाला समाधान पाहिजे ते मुख्यमंत्री बोलले. एकनाथ शिंदे हे म्हणाले तुम्ही पक्ष सोडून जे एकमेकावर कुरघोडी करतात ते मला सगळं बंद पाहिजे. आज संभाजीनगरमध्ये एक नंबरचा पक्ष दुसऱ्या नंबर वर गेला हे पिक्चर राजकारणासाठी आणि भविष्यासाठी चांगलं नाही, त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्याशी तीन तास आमच्या सोबत चर्चा केली, असे सत्तार म्हणाले.

समीर सतार यांचा अर्ज दबाव तंत्र की विजयाचं गणित?

जुळवा जुळवीच्या गणिताशिवाय कोणीही फॉर्म भरत नाही, मी या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात एकदा निवडून आलो आहे. माझे जे संबंध होते त्यांनी त्यामुळे त्यांनी दिलेले आश्वासन, मी सगळ्यांना फोनवर बोललो अशी परिस्थिती आहे. फॉर्म भरणे म्हणजे विजयाचा गणित लावून फॉर्म भरला जातो. कसं निवडून येईल याचा एक एक तंतोतंत अभ्यास भोकरदन पासून ते परतुर पर्यंत अंबड पासून ते घनसावंगी पर्यंत हे सगळं नियोजन करूनच आम्ही निवडणूक लढवत होतो, अशी भूमिका सत्तार यांनी स्पष्ट केली.

खदखद व्यक्त करून मिळालं काय?

काही मिळण्यासाठी उमेदवारी नव्हती आमच्या भावना आमच्या दुखणं, खत खत आमच्या जिल्ह्यात होणारे पुढाऱ्यांचे जे काही वार होते. काही घेण्यासाठी फॉर्म भरला नव्हता भविष्यात शिवसेना हा पक्ष मजबूत राहावा, शिवसेनेवर काहीही अन्याय होऊ नये. शिवसेना हा एक नंबरचा संभाजी नगरचा पक्ष होता मी त्याला वाचा वैयक्तिक काही फायद्याचा काही प्रश्नच नाही. मला अपेक्षेपेक्षा जास्त मिळालेल आहे, मी पाच वेळा आमदार, चार वेळेस मंत्री दोन दोन जिल्ह्याचे पालकमंत्री आहे. पहिले जे अडीच वर्षे होते त्यात आम्हाला कुठेही तहान आला नाही निवडणूक झाल्यानंतर जो आम्हाला ताण यायला सुरुवात झाला त्याची कुठेतरी चर्चा व्हावी. कुणाला ब्लॅकमेलिंग करण्यासाठी हा फॉर्म नाही आमच्या पक्षाला असतांना कुठे ही खिंडार पडणार नाही यासाठी होता. आता आमचे मोठे भाऊ भाजप झाले, पहिली शिवसेना होती अशी सविस्तर भूमिका सत्तार यांनी मांडली.

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणुकीत कोणती भूमिका

मी पहिल्या वीस वर्षापासून तिथे संचालक आहे आता मी तिथे राहू शकत नाही. आता सरकारने नवीन कायदा बनवला आहे जो दहा वर्षे संचालक राहील त्याला नवीन फॉर्म भरता येणार नाही. आता माझ्या जागेवर तो समीर उभा राहू लागला आहे. आता राहिला बँकेचा प्रश्न माझ्या मुलाला बँकेचा चेअरमन, व्हाईस चेअरमन काही व्हायचं नाही हे मी स्वतः बोललो. पुढचं कोणाला वाटत असेल आता चेअरमनवर डोळा आहे काय बिलकुल नाही, माझ्या तालुक्याचे चेअरमन यापूर्वी होते. एकनाथ शिंदे यांनी खासदार यांच्यावर जबाबदारी दिली आहे तिकडची जबाबदारी अतुल सावे यांच्यावर दिली आहे. हे दोघे बसतील आणि पुढची रूपरेषा ठरेल, असे सत्तार यांनी स्पष्ट केले.

Follow Us