
Old GR will be challenged in High Court : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील 29 ऑगस्ट रोजी मुंबईत धडकले. उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांच्या लढ्याला मोठे यश मिळाले. सरकारने सातारा आणि हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा GR लागू केला. त्यांच्या इतर मागण्यांबाबत विचार करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी वाढवून घेतला. कुणबी नोंद असलेल्या मराठ्यांना ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला. पण त्याचवेळी आज माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळांना मोठा इशारा दिला.
आरक्षणामुळे खुश झालो
आता मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र दौरा नाही.आम्ही आता खुश झालो आहोत. आम्ही आरक्षण मिळवले.GR निघाला म्हणजे लहान गोष्ट नाही, अशी प्रतिक्रिया जरांगे पाटील यांनी दिली. महाराष्ट्रातील गरीब मराठा बांधवांनी त्यांनी आवाहन केले की कोणीही हार, पुष्पगुष्य,शाल असे आणून खर्च करू नका. आपण हार तुरे आणि शाल घेऊ नये,आपला जो वायफळ खर्च होतोय त्यातून गरिबांना मदत करू.
मला घरातील कुंकू आणून लावले तरी चालेल, असा साधेपणा त्यांनी दाखवला.
देवाभाऊंच्या जाहिरीतीवर म्हणाले काय?
कुणी बॅनर लावा,कुणी कॅम्पेन करा,आम्ही तुमचे आभार आणि कौतुक करू. मात्र तातडीने प्रमाणपत्र द्या, असे मत मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केले. तुम्ही कामे केल्यास आम्ही तुम्हाला मोठेपणा देऊ. शिंदे समितीस बढती दिल्यास सर्व विभागात नोंदी शोधण्याचे काम सुरूच ठेवा. सरकारने कामे केल्यास आम्ही कौतुकच करू. आमच्या मागण्या पूर्ण करा. अन्यथा पुन्हा आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचा इशाराही त्यांनी दिला. एकनाथ शिंदे हे मोकळा धाकळा माणूस आहे,ते तसे करणार नाहीत.
GR ओके आहे.GR कसा ही काढला तरी नंतर दुरुस्ती करावी लागते. गैरसमज पसरवून कुणाचे ऐकू नका. केसलेही येतात आणि बरळतात, त्यांनी नुकसान केली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कुणीही आरक्षणापासून वंचित राहणार नाही. मालोजीराजेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना तुम्हाला आरक्षण घ्यायचे असेल तर घ्या नाही तर राहू द्या असे जरांगे पाटील म्हणाले.
ओबीसी मोर्चाबद्दल काय भूमिका?
कुणाला काय म्हणायचे ते म्हणू द्या,कुणाला गैरसमज पसरवायचे असतील तर पसरू द्या, अशी प्रतिक्रिया त्यांनी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर दिली. GR बदलून आल्यानंतर वकील आणि अभ्यासकांना वाचायला दिला.काम सुरू झाल्या शिवाय अंदाज येत नाही. आपण रेकॉर्डला नव्हतो ते आलं मराठ्यांनी कायदा पारित केला. GR दुरुस्त करायला लावलाय.
नागपूरमधील ओबीसी मोर्चाबाबत ही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. आमचे त्यांच्याविषयी काही म्हणणे नाही आम्ही सरकारशी भांडतो.आम्हाला जे हवे होते ते मिळवले असून ठासून सांगत आहोत. मराठ्यांचे विरोधात लढण्यापेक्षा जातीसाठी लढा. तुमच्या जातीसाठी लढा कल्याण होईल तुमचं, असा सल्लाही जरांगेंनी दिला. आम्हाला आरक्षण मिळाले त्यामुळे आता लढायला काय बाकी आहे? असा सवालही त्यांनी केला.
1994 चा जीआर चॅलेंज करणार
मंत्री छगन भुजबळ राज्य सरकारे मराठा आरक्षणाविषयी जो जीआर काढला. त्याला न्यायालयात आव्हान देणार असल्याबाबत त्यांनी खणखणीत प्रतिक्रिया दिली. आतापर्यंत मी या विषयावर बोलणं टाळलं. पण आता ठासून सांगतो की, 1994 रोजीचा शासन निर्णय आम्ही हायकोर्टात चॅलेंज करणार आहोत. आमच्या हक्काच्या नोंदी असताना तुम्ही कोर्टात जाता. तर 1994 रोजी ज्या जीआर मुळे ओबीसीत 16 टक्के आरक्षण मिळवले, त्याविरोधात कोर्टात दाद मागणार आणि तो रद्दच करून आणणार असे जरांगेंनी ठणकावले.
1994 मध्ये कोणत्या निकषावर, आधारावर जीआर काढला, सर्वच निघणार मग. सर्वच प्रक्रिया होणार असा इशारा त्यांनी दिला. ओबीसी आरक्षणात घुसलेल्या 16 टक्केंना बाहेर काढा अशी मोठी मागणी त्यांनी केली. जुना जीआर चॅलेंज करणार. मागील GR रद्द करायला लावणार अशी भूमिका त्यांनी जाहीर केली. मला हळूहळू गेम करून मराठा आरक्षणात घालायचे होते, असे ही ते म्हणाले.