आता मनोज जरांगे यांचा भाऊही उपोषण करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून इशारा; सरकारची डोकेदुखी वाढणार?

मनोज जरांगे पाटील यांचं अंतरवली सराटी गावात उपोषण सुरु आहे. तर दुसरीकडे त्यांचे मोठे बंधू भाऊसाहेब जरांगे यांनीदेखील राज्य सरकारला उपोषणाचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता राज्य सरकारपुढे आव्हान वाढण्याची शक्यता आहे.

आता मनोज जरांगे यांचा भाऊही उपोषण करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून इशारा; सरकारची डोकेदुखी वाढणार?
आता मनोज जरांगे यांचा भाऊही उपोषण करणार, मुख्यमंत्र्यांना भेटून इशारा
Follow us
| Updated on: Sep 19, 2024 | 4:45 PM

मराठा नेते मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांनी पुन्हा आपल्या मागण्यांसाठी जालन्यातील अंतरवली सराटी गावात आमरण उपोषणाचं हत्या उपसलं आहे. त्यामुळे सरकारची डोकेदुखी वाढली आहे. असं असताना आता मनोज जरांगे पाटील यांचे बंधू भाऊसाहेब रावसाहेब जरांगे यानीदेखील उपोषणाचं हत्या उपसलं आहे. भाऊसाहेब जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत आपल्या मागणीची माहिती दिली. तसेच आपली मागणी मान्य झाली नाही तर आपण देखील आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारची आणखी डोकेदुखी वाढण्याची चिन्हं आहेत. सरकार जरांगे बंधूंची मनधरणी करण्यात आता कितपत यशस्वी होतं ते पाहणं आता सर्वात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. विशेष म्हणजे आगामी काळात विधानसभेची निवडणूक असणार आहे. त्यामुळे जरांगे बंधूंची मनधरणी करणं सरकारसाठी महत्त्वाचं असणार आहे.

मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचे पुन्हा एकदा आमरण उपोषण अंतरवली सराटी येथे चालू आहे. मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र मिळावं आणि सग्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्यात यावी, या मागणीसाठी मनोज जरांगे हे सध्या उपोषण करत आहेत. मात्र दुसरीकडे त्यांचे मोठे बंधू भाऊसाहेब रावसाहेब जरांगे यांनी नुकतंच 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आणि त्यांना एक निवेदन दिले आहे. त्या निवेदनामध्ये त्यांनी जायकवाडी प्रकल्पातील पाणी सिंदफणा नदी पात्रात सोडण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांसोबत केली आहे.

सरकारच्या अडचणी वाढणार?

मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरू असताना भावाने देखील उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मनोज जरांगे यांचे बंधू भाऊसाहेब जरांगे हे बीड जिल्ह्यातील साक्षाळ पिंपरी येथे वास्तव्यात आहेत. मनोज जरांगे पाटलांनी गेल्या वर्षेभरामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून उपोषण केले आहे. त्यांनी शेतकऱ्यांसाठी देखील पुन्हा आपण उपोषण करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र आता त्यांचे मोठे भाऊ भाऊसाहेब जरांगे यांनी जायकवाडी प्रकल्पातील पाणी सिंदफणा नदी पात्रात सोडण्यात यावे, अशी मागणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिना दिवशी केली आहे. यावेळी त्यांनी जर मागणी लवकरात लवकर जर मान्य नाही केली तर आपण शेतकऱ्यांना घेऊन उपोषण करणार असल्याचे देखील निवेदनात म्हटलं आहे. त्यामुळे आता सरकारच्या अडचणी वाढणार का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद
TV9 फेस्टीव्हलमध्ये अनुप्रिया पटेल यांनी घेतला देवी भगवतीचा आशीर्वाद.
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?
त्या एका व्यक्तीच्या बदल्यासाठी सिद्दीकींची हत्या? कोण आहे अनूज थापन?.
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका
'अंधारे अन् राऊत मोठे नेते, एक वाघ्या अन् ती मुरळी',मनसे नेत्याची टीका.
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?
फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं कधीपर्यंत चालणार 'लाडकी बहीण' योजना?.
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल
बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडून पळून जाणाऱ्या आरोपीचा व्हिडीओ व्हायरल.
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?
'मविआ'ची पत्रकार परिषद, ठाकरे-पटोले अन् पवार यांचा कोणावर हल्लाबोल?.
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?
निवडणुकीला पैसे वाटले, नक्की घ्या, कारण..., राज ठाकरे काय बोलून गेले?.
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '
विधानसभेचे राज ठाकरेंनी रणशिंग फुंकले; 'ना युत्या, ना आघाड्या आपण… '.
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे
'फुकट कसले पैसे देताय?', 'लाडकी बहीण'वरून राज ठाकरेंचे सरकारवर ताशेरे.
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड
...म्हणून बाबा सिद्दीकींची हत्या केली, बिश्नोई गँगचा मोठा खुलासा उघड.