अजितदादांनी केलेल्या वक्तव्यात तथ्य, आर. आर. आबा अन् पृथ्वीराज चव्हाण…; महायुतीच्या नेत्याचं विधान
Sanjay Shirsat on Ajit Pawar Statement : अजित पवार यांनी आर. आर. पाटील यांच्याबाबत काल एक विधान केलं. त्यानंतर त्यांच्या विधानावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. शिवसेना शिंदे गटाचे नेते, संजय शिरसाट यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिरसाट काय म्हणाले? वाचा सविस्तर...
आर. आर. पाटील हे गृहमंत्री असताना त्यांनी 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळा प्रकरणात अजित पवार यांची उघड चौकशी व्हावी. या फाईलवर त्यांनी सही केली, असा आरोप अजित पवारांनी केला. त्यानंतर त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना शिंदेंचे नेते संजय शिरसाठ यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा पवार यांनी गौप्यस्फोट यांनी केला आहे. त्यावर आर. आर. आबांची सही होती. त्यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण होते. पृथ्वीराज बाबांनी देखील सही केली असावी. त्यात तथ्य असावं.त्यांचा रोख कुणाकडे मला माहिती नाही.केसाने गळा कापणे या टोमण्याचा अर्थ संजय राऊतला समजत नसेल तर उद्धव ठाकरे यांना विचारा ते सांगतील, असं संजय शिरसाट म्हणालेत.
विधानसभा निवडणुकीवर काय म्हणाले?
काल विधानसभेच्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता,अनेक ठिकाणी बंडखोरी झाली मात्र हे काही नवीन नाही. आकडेवारी पाहिली तर महाविकास आघाडीमध्ये मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्यांनी ऐनवेळेस उमेदवार लादले त्याचा फटका बसणार आहे. चार तारखेपर्यंत अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया आहे. तो पर्यंत अनेकजण माघे घेतील. नेते समजूत कधण्याचा प्रयत्न करताहेत. काही जण मागे देखील आले आहे. मात्र महा विकास आघाडीला बंडखोरीला लागली आहे. याचा फटका त्यांना पडेल. महायुतीला याचा फायदा होणार आहे, असं संजय शिरसाट म्हणालेत.
ठाकरे गटावर निशाणा
आम्ही धनुष्यबाण आणि तुम्ही मशाल घेऊन लढतो आहोत. ज्या जागेवर आमदार आहेत. त्याचं जागेवर लढत आहे. हे बकवास वक्तव्य करून दिशाभूल करण्याचा काम आहे. काँग्रेस आणि शरद पवार यांचे पाय चोळण्यापलिकडे काहीही करू शकत नाही. काहीही संभ्रम निर्माण होणार नाही. शिवसेना प्रमुखांच्या हा धनुष्यबाण आहे. आम्ही शिवसेना प्रमुख्यांच्या विचारणा घेऊन चालत आहे, असं म्हणत संजय शिरसाट यानी ठाकरे गटावर टीका केली आहे.
सर्वपर्यंत पक्ष पातळीवर कराव्या लागतात. अखेर त्या शिवाय पर्याय नव्हता. जोपर्यंत तातडीने करायचं होतं तो पक्षाने केला त्यात गैर वाटत नाही. वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होतो. युतीचा धर्म पळायचं प्रयत्न होतो, त्यावेळी असा प्रत्युत्तर देण्याच्या प्रयत्न होतो. आता मत्रीपूर्न लढती होतील.२८८ ठिकाणी एक-दोन ठिकाणी मतभेद होणे साहजिक आहे, असं शिरसाटांनी महायुतीतील जागावाटपावर म्हटलं आहे.