अनिल देशमुख यांच्या खळबळजनक आरोपांनंतर समित कदम Tv9 च्या कॅमेऱ्यासमोर, देशमुखांची भेट घेतल्याची कबुली, पण..

अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत धक्कादायक दावा करत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी हे आरोप करत असताना आणखी एका व्यक्तीचं नाव घेतलं आहे. ते नाव समित कदम असं आहे. देशमुखांच्या आरोपांनंतर समित कदम नावाची व्यक्ती आता 'टीव्ही 9 मराठी'च्या कॅमेऱ्यासमोर आली आहे. समित कदम यांनी देशमुखांच्या आरोपांवर खुलासा केला आहे.

अनिल देशमुख यांच्या खळबळजनक आरोपांनंतर समित कदम Tv9 च्या कॅमेऱ्यासमोर, देशमुखांची भेट घेतल्याची कबुली, पण..
अनिल देशमुख यांच्या खळबळजनक आरोपांनंतर समित कदम Tv9 च्या कॅमेऱ्यासमोर
Follow us
| Updated on: Jul 28, 2024 | 6:43 PM

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. आपण गृहमंत्री असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी ऑफर दिली होती, असा धक्कादायक गौप्यस्फोट अनिल देशमुखांनी केला आहे. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी एका व्यक्तीच्या माध्यमातून आपल्याला ही ऑफर दिली होती. समित कदम नावाचा व्यक्ती हा देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन आला होता, असा नवा आरोप अनिल देशमुख यांनी केलाय. त्यांच्या याच आरोपांवर देशमुखांनी पुरावे द्यावेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. अनिल देशमुख यांनी केलेल्या दाव्यानुसार जो व्यक्ती देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन गेली होती त्याचं नाव समित कदम असं आहे. समित कदम हे जनस्वराज्य पक्षाचे युवा प्रदेश अध्यक्ष आहेत. या समित कदम यांनी अनिल देशमुखांच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली आहे.

समित कदम नेमकं काय म्हणाले?

“अनिल देशमुख हे त्यावेळी राज्याचे गृहमंत्री होते. त्यांना झेड प्लस सुरक्षा होती. त्यांनी मी त्यांच्या घरी गेलो होतो याचा खुलासा केला आहे. त्यांच्या परवानगीशिवाय मी त्यांच्या घरी जाऊ शकत नाही. त्यांनी मला बोलावलं होतं म्हणून मी त्यांच्या घरी गेलो होतो. त्यावेळचे तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री अमित भाई शाहा आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांना माझ्या अडचणीत मदत करण्यासाठी त्यांनी विनंती केली. त्यामुळे देवेंद्रजी फडवणीस यांचा या गोष्टीची कोणताही दूरान्वयही संबंध नाही. त्यांनी बोलावलं म्हणून मी गेलो होतो. त्यामुळे त्यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांनी तीन वर्षानंतर हा विषय काढणे मला गरजेचा वाटत नाही”, असं स्पष्टीकरण समित देशमुख यांनी दिलं.

“अनिल देशमुख यांनी बोलावलं म्हणून मी गेलो होतो. त्यामुळे त्यांच्याकडे फुटेज असतील तर त्यात काय विशेष नाही. मी एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे मी सर्वा मंत्र्याकडे भेटायला जात असतो”, असा देखील खुलासा समित कदम यांनी केला.

अनिल देशमुख यांचे आरोप नेमके काय?

“ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ऑफर होती. मला ऑफर देऊन उद्धव ठाकरे, अजित पवार, अनिल परब यांना अडकवण्याचा डाव होता. आरोप करण्यासाठी 4 प्रतिज्ञापत्रांवर सही करण्यासाठी मला सांगितलं होतं. देवेंद्र फडणवीस यांचा निरोप घेऊन मिरजेतील समित कदम नावाचा व्यक्ती मला भेटायला आलेला. समित कदम जनसुराज्य शक्ती पक्षाच्या युवा शाखेचा अध्यक्ष आहे. आरोपांचा मसुदा असलेला लिफाफा समितने आणला होता. समितने 5 ते 6 वेळा माझी भेट घेतली. माझ्याकडे भेटीचे व्हिडीओ आहेत”, असा दावा अनिल देशमुख यांनी केलाय.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

अनिल देशमुख यांच्या आरोपांवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. “अनिल देशमुख खोटे नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. दावा करत असलेले पुरावे देशमुखांना देऊ द्या. त्यांच्या पुराव्यानंतर माझ्याकडे असलेल्या सर्व क्लिप्स सार्वजनिक करेन”, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.

'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?
'राहुल सोलापूरकरचं तोंड फोडणाऱ्याला 1 लाख', कोणी जाहीर केलं बक्षीस?.
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी
'शब्द मागे घे, नाहीतर ...', आव्हाड भडकले अन् सोलापूरकरची काढली लायकी.
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला
‘वेदांनुसार डॉ. भीमराव आंबेडकर हे...’, राहुल सोलापूरकर पुन्हा बरळला.
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका
'राऊतांनी ठाकरेंचा पत्ता राजकारणातून कट...', निलेश राणेंची टीका.
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा
'ऑपरेशन टायगर... 100% कोकण खाली..', शिवसेनेच्या बड्या मंत्र्यांचा दावा.
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा
'मला तुम्ही फार आवडता', आशा भोसलेंकडून शिंदेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ
माझ्या वडिलांना 3 तासात संपवलं, मग..., बापाच्या न्यायासाठी लेकीची तळमळ.
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री
हॉस्टेलवर मागवला पिझ्झा अन् 'त्या' चौघीना महिनाभर वसतिगृहात नो एन्ट्री.
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?
शिंदेंचा राजन साळवींना फोन, 'या' तारखेला पक्षप्रवेश करण्याचे आदेश?.
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले...
'... तर देशमुख प्रकरणात मुंडेंना कोण अडकवणार?', धस स्पष्टच म्हणाले....