AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मला नाही अब्रू आणि मी कशाला घाबरू… रूपाली चाकणकर यांच्यावर भडकल्या या नेत्या..

रूपाली चाकणकर मोठ्या वादात सापडल्या आहेत. पुण्यात सुरू केलेल्या हॉटेलमुळे त्या तूफान चर्चेत आहेत. त्यातच संगीता तिवारी यांच्यावर जोरदार टीका होत आहे. अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांचे नाव पुढे आले आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला.

मला नाही अब्रू आणि मी कशाला घाबरू... रूपाली चाकणकर यांच्यावर भडकल्या या नेत्या..
Rupali Chakankar
| Updated on: Aug 26, 2026 | 11:20 AM
Share

काँग्रेस नेत्या संगीता तिवारी यांनी रूपाली चाकणकर यांच्यावर जोरदार निशाणा साधला. संगीता तिवारी यांनी म्हटले की,  सहा महिन्यानंतर समजलं का लज्जा उत्पन्न झाली. सहा महिने लज्जा नव्हती का? माणसाने किती निर्लज्ज असावं. मला नाही अब्रू आणि मी कशाला घाबरू अशी अवस्था रूपाली चाकणकरांची झाली आहे. स्वतःचं कमबॅक करण्यासाठी एका नेत्याने सांगितलं, त्यासाठी तुम्ही बाकीच्या लोकांना त्रास देत आहेत. गुन्हा दाखल होऊ शकत नाही. सोशल मीडियावरील पोस्ट पहा किती घाण कमेंट्स केलेले आहेत, मग त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करा. तुम्ही गुन्हेगार नव्हत्या तर तुमचा राजीनामा का घेतला?. तुम्ही गुन्हेगार होता म्हणून राजीनामा दिला. ही बाई अतिशय खोटारडी आहे.

पुढे संगीत तिवारी यांनी म्हटले की, 2012 प्रतिज्ञापत्र पाहिलं तर आणि आजच्या दिवशी साठ कोटींचं पब, डान्स बार ,रेस्टॉरंट. माहिती अधिकारात आम्ही माहिती घेतोय हा पब आहे डान्सबार आहे का बार? आधी नाशिकमध्ये बायकांच वाटोळ केलं, पुणे सांस्कृतिक शहर आहे, आता आमच्या मुलांचं वाटोळ करणार का? तिथं तुम्ही दारू देणार हुक्का देणार पोरी देणार.

तुमचा पार्टनर कोण आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतून हाकलून दिलेला महेश शेट्टी याला तुम्ही पुण्यात प्रवेश देणार. हॉटेलला अंडरवर्ल्डचा मुजावर हा सुरक्षा देणार. एकंदरीत पहिल्यांदा महिला टार्गेट केल्या, त्यांचं वाटोळं केलं त्या महिलांवर तुम्ही पैसे कमावले ते हॉटेलमध्ये लावताय का? पुण्याची संस्कृती आणि मुलांना खराब करायचा कार्यक्रम ठेवला आहे का हा माझा सवाल.

सर्वात महत्त्वाचं एवढे 60 ते 70 कोटी आले कुठून आम्ही त्यांचा प्रवास. माहितीच्या अधिकारात आम्ही महसूल पोलीस प्रशासनाकडून माहिती घेणार. रूपाली चाकणकरांना जागा देणारा भाजपचा माणूस आहे. पैसे कमवण्यासाठी तुम्ही पुण्याचं वाटोळ करायला निघालात का. कल्याणी नगर सारख्या भागात 20 हजार चौरस फूट एवढं मोठं हॉटेल बांधलं तुम्ही अचमबीत व्हाल. जरी भाजपच्या माजी आमदाराच्या भावाने ही जागा त्यांना भाडेतत्त्वावर दिली असली तरी कुठेतरी पार्टनर इन क्राईम आहेस ना.

उद्घाटनासाठी जयंत पाटील येतात ज्यांनी घरातला पाणी दिलं होतं, ते रूपाली चाकणकरांच्या हॉटेलच्या उद्घाटनासाठी येतात आणखी बरेच जण आहेत. ह्या नेत्यांच्या बायकांना कळत नाही का ही बाई अशी आहे तुम्ही का गेलात उद्घाटनासाठी विचारलं पाहिजे बायकांनी चाकणकर बाईंना पैशाचा खूप माज आला आहे.

Follow Us
याला म्हणतात luxurious! चाकणकरांची कोट्यवधींची गुंतवणूक; 20,000 Cr...
याला म्हणतात luxurious! चाकणकरांची कोट्यवधींची गुंतवणूक; 20,000 चौ. किमीचे आलीशान हॉटेल
पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...बड्या नेत्याचा दावा
मोठी बातमी ! पंतप्रधानांची प्रकृती खालावलेय, ते अस्वस्थ, थकले...या नेत्याच्या दाव्याने पुन्हा खळबळ
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटन...
सर्वांच्याच नजरा खिळल्या; चाकणकरांच्या कोट्यावधींच्या हॉटेल उद्घाटनात बड्या नेत्याची हजेरी
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री...
मोठी खळबळ! धाड धाड धाड गोळीबार सर्व काचा फुटल्या; मध्यरात्री काँग्रेस नेत्याच्या...
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसणाचे दर तब्बल 200 रुपये किलोपर्यंत
सरसकट 80 ते 100 रुपयांची वाढ, कांद्यानंतर आता स्वयंपाकघरात दररोज उपयोगात येणारी वस्तुही महागली
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप,
महाराष्ट्रातील मोठ्या केसमध्ये न्यायाधीशांनीच लाच घेल्याचा आरोप, तब्बल 15 लाख...
विक्रेत्यांना 30 दिवसांपेक्षा जास्त काळ साखरेचा साठा करता येणार नाही
साखरेच्या साठेबाजीवर चाप लावण्यासाठी राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय
'मुंबई रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य करा'
मुंबई रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मराठी भाषा अनिवार्य करा: पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी
मुंबईतील रिक्षा, टॅक्सी चालकांची मराठी सक्ती विरोधात जनहित याचिका
मराठी सक्तीविरोधात रिक्षा, टॅक्सी चालकांची उच्च न्यायालयात धाव