AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी ! मोदींची प्रकृती बरी नाही, अस्वस्थ, थकले… कुणी केला दावा?

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींच्या प्रकृतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मोदी थकले असून, त्यांना बोलताना-चालताना त्रास होत असल्याचे राऊत यांचे म्हणणे आहे. देशाच्या हितासाठी थकलेल्या व्यक्तीने नेतृत्व करू नये, असे आवाहन करत मोदी आणि अमित शाह यांनी सत्तेतून दूर व्हावे, अशी मागणी राऊत यांनी केली आहे.

सर्वात मोठी बातमी ! मोदींची प्रकृती बरी नाही, अस्वस्थ, थकले... कुणी केला दावा?
Prime Minister Narendra Modi Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 26, 2026 | 11:04 AM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रकृती बरी नाही. ते अस्वस्थ आहेत. चालताना आणि बोलताना ते जाणवतं. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूही अखेरच्या काळात थकले होते. तसेच मोदीही थकले आहेत, असं सांगतानाच थकलेल्या माणसाने देशाचं नेतृत्व करू नये. देशहितासाठी मोदी आणि शाह यांनी सत्तेतून दूर गेलं पाहिजे, असं ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी मोदी थकल्याचा दावा केला आहे.

मोदींना पाहिल्यावर ते अस्वस्थ असल्याचं दिसतं. त्यांना बोलताना, चालताना पाहिलं. थकलेले दिसतात. मोदी थकलेत हे त्यांचेच लोकं सांगतात. जसे नेहरू थकले होते. तसे मोदी थकले आहेत. शेवटच्या काळात नेहरू फार थकले होते. आता मोदीही फार थकले आहेत. थकलेल्या माणसाने देशाचं नेतृत्व करू नये. राष्ट्रहितासाठी मोदी आणि शाह यांनी दूर झालं पाहिजे. राष्ट्र प्रथम असेल तर त्यांनी सत्तेपासून दूर राहिलं पाहिजे. अन् मार्गदर्शकाच्या भूमिकेत राहिलं पाहिजे. यालाच देशसेवा म्हणतात, असं संजय राऊत म्हणाले.

झोप न येणंही आरोग्य बिघडल्याचं लक्षण

कुवत नसताना, शरीर साथ देत नसताना सत्तेच्या खुर्चीत बसणं हे राष्ट्रहित नाही. हे चांगल्या उत्तम आरोग्याचं प्रकृतीचं लक्षण नाही. त्यांनी आत्मविश्वास गमावलेला आहे. झोप न येणं हे सुद्धा गंभीर आजाराचं लक्षण आहे. एक माणूस इतकी वर्ष झोपत नाही, त्याचं राजकारण करतो. कमी झोप येणं किंवा झोप न येणं हे सुद्धा प्रकृती बिघडल्याचं लक्षण आहे. किंवा मानसिक स्वास्थ ठिक नसल्याचं लक्षण आहे. चिंतेमुळे झोप लागत नाही. हे त्यांचं आरोग्य बिघडल्याचं लक्षण आहे, असं राऊत यांनी सांगितलं.

कॅबिनेटचा चेहरा बदलावा लागणार

यावेळी राऊत यांनी राहुल गांधी यांचं तोंडभरून कौतुक केलं. राहुल गांधींनी विरोधी पक्षनेता म्हणून दबाव निर्माण केला आहे. त्यांनी सरकारच्या अपयशाची लक्तरं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर टांगली आहेत. त्यामुळे मोदींना कॅबिनेटमध्ये मोठा बदल करावा लागणार आहे. कॅबिनेटचा चेहरा बदलावा लागणार आहे. तुम्ही तेच विद्रूप मुंडकं ठेवाल आणि बाकी बदल कराल तर त्याला बदल म्हणता येणार नाही. मोदींची प्रतिमा घसरली आहे. शाहांना प्रतिमाच नाही, असं ते म्हणाले.

99 टक्के मंत्री अकार्यक्षम

मंत्री अपयशी आहेत. केंद्रातील 99 टक्के मंत्री अकार्यक्षम आहे. भाजपमध्ये एखाद दुसरा नेता सोडला तर त्या लायकीचे नेते केंद्रीय मंत्रिमंडळात नाहीत, हे मी मुद्दाम सांगतो. शिवराज सिंह चौहान आणि नितीन गडकरी ही मोठी नावे आहेत. बाकी सर्व राम भरोसे सुरू आहे. त्याचा परिणाम देशाच्या विकासाच्या गतीवर आणि कार्यक्षमतेवर सुरू आहे. मोदींची तब्येत बरी नाही असं म्हणणं आहे. मोदींना फार काम झेपत नाही. अमित शाह यांची प्रतिमा इतकी डागळली आहे की ते गृहखातं चालवत नाही तर वर्दीतील गुंडांची टोळी चालवत आहेत. याचा परिणाम मोदींच्या प्रतिमेवर झाला आहे. या बदलात शाहांना बाजूला केलं जात नाही, तोपर्यंत बदलाला अर्थ नाही. अशी दिल्लीत चर्चा आहे, असं त्यांनी सांगितलं.

राहुल गांधी मोदींच्याही पुढे

राहुल गांधींचं देशात भ्रमण सुरू आहे. राहुल गांधींचं नेतृत्व मोदींना मागे टाकून पुढे गेले आहे. मोदी सत्तेत आहेत म्हणून ते नेते आहेत. सत्तेवर नसतील तर ते नेते नसतील. राहुल गांधींचं तसं नाही. राहुल गांधी अनडिस्प्युटेड नेते आहेत, असा दावाही त्यांनी केला.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ