सांगलीने करुन दाखवलं, जिल्हा कोरोनामुक्त, कोरोनाबळीच्या संपर्कातील 44 जण निगेटिव्ह

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बँक कर्मचाऱ्याच्या संपर्कातील 44 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे सांगली जिल्हा कोरोनामुक्त झाला (Sangli District Corona Free) आहे. 

सांगलीने करुन दाखवलं, जिल्हा कोरोनामुक्त, कोरोनाबळीच्या संपर्कातील 44 जण निगेटिव्ह

सांगली : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत (Sangli District Corona Free) आहे. या परिस्थिती सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या बँक कर्मचाऱ्याच्या संपर्कातील 44 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे सांगली जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे.

सांगलीतील विजय नगर परिसरात राहणाऱ्या एका बँक कर्मचाऱ्याचा काल (20 एप्रिल) कोरोनामुळे (Sangli District Corona Free) मृत्यू झाला होता. त्यानंतर त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 44 जणांना क्वारंटाईन करण्यात आलं होतं. तसेच खबरदारी म्हणून बँकही सील करण्यात आली होती.

तसेच 8 ते 18 एप्रिलपर्यंत सर्व सीसीटिव्ही फुटेजही तपासण्यात आले होते. सीसीटिव्ही फुटेजच्या मदतीने त्या मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या आणि बँकेत दैनंदिन येणाऱ्या लोकांची तपासणी केली गेली.

यातील 31 जणांचे रिपोर्ट आज (21 एप्रिल) दुपारी निगेटिव्ह आले. तर संध्याकाळच्या सुमारास उर्वरित 12 जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहे, सांगली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी याबाबतची माहिती दिली.

मात्र अद्याप त्या मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्याची मोहीम सुरू आहे. या सर्वांना शोधणे हे प्रशासनापुढे सर्वात महत्त्वाचे आव्हान आहे.

दरम्यान सांगली जिल्हा कोरोनामुक्त झाला असला, तरी राज्य सरकारने आज रात्री जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सांगलीतील रुग्णांची संख्या 26 अशीच ठेवली आहे.

महाराष्ट्रात 5218 कोरोना रुग्ण 

राज्यात आज (21 एप्रिल) 552 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या 5 हजार 218 झाली आहे. तर आज राज्यात 19 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 251 झाली आहे. तर आतापर्यंत 83 हजार 111 नमुन्यांपैकी 77 हजार 638 जणांचे नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर सध्या राज्यात 99 हजार 569 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 7 हजार 808 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Sangli District Corona Free)  आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI