AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुष्काळमुक्तीच्या दृष्टीने सांगलीकरांसाठी जयंत पाटील यांचं महत्वाचं पाऊल; कोणता महत्वाचा निर्णय?

स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सांगली जिल्ह्यातील टेंभू आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज, जत, मंगळवेढा, सांगोला या तालुक्याना कृष्णा नदीतील चालू पावसाळी हंगामातील अतिरिक्त पाणी वळवून दुष्काळी भागात दिले जाणार आहे. हे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी पुढील काळात उपयुक्त ठरणार आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

दुष्काळमुक्तीच्या दृष्टीने सांगलीकरांसाठी जयंत पाटील यांचं महत्वाचं पाऊल; कोणता महत्वाचा निर्णय?
जयंत पाटील, जलसंपदामंत्री
| Edited By: | Updated on: Aug 15, 2021 | 2:20 PM
Share

सांगली : सांगली जिल्ह्याला पुढील काळात पाण्याची कमतरता भासू नये यासाठी शासन सर्व शक्य त्या गोष्टी करत आहोत. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच याबाबतची पावले टाकल्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी करुन दुष्काळमुक्तीच्या दृष्टीने सांगलीकरांसाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत सांगलीकरांना गुड न्यूज दिली आहे. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून सांगली जिल्ह्यातील टेंभू आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव, मिरज, जत, मंगळवेढा, सांगोला या तालुक्याना कृष्णा नदीतील चालू पावसाळी हंगामातील अतिरिक्त पाणी वळवून दुष्काळी भागात दिले जाणार आहे. हे पाणी पिण्यासाठी व शेतीसाठी पुढील काळात उपयुक्त ठरणार आहे असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. (Excess rain water will be diverted to drought stricken talukas of Sangli district)

टेंभू योजनेच्या माध्यमातून आटपाडी, कवठेमहांकाळ, सांगोला या तालुक्यासाठी 1.5 टीएमसी पाणी उचलण्यात येणार असून साधारणतः 74 लघु प्रकल्प भरले जाणार आहेत. म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, जत, सांगोला, मंगळवेढा या तालुक्यासाठी अंदाजे 2 टीएमसी पाणी उचलण्यात येणार असून साधारणतः 150 लघु प्रकल्प आणि साठवण तलाव भरले जाणार आहेत, असेही जयंत पाटील यांनी सांगितले. दरम्यान स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच याबाबतचे पावले टाकल्याने व्यक्तीशः आनंद होत असल्याचे सांगताना सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

जत तालुक्यासाठी 6 टीएमसी पाणी देण्याचे आदेश

जयंत पाटील यांनी जलसंपदा विभागामार्फत कृष्णा खोरे विकास महामंडळास बिगर संचिन तरतूदीतील विनावापर 6 टीएमसी पाणी जत तालुक्याला देण्याचे आदेश दिलेत. याबाबत स्वतः जयंत पाटील यांनी ट्विट करत माहिती दिली. गेली अनेक वर्षे जत तालुक्याची ओळख सांगली जिल्ह्यातील दुष्काळी तालुका म्हणून आहे. या जत तालुक्यातील 65 गावे पाण्यापासून पूर्णपणे वंचित होती. या गावांना कायमस्वरूपी सिंचनाखाली आणण्यासाठी पाण्याची आवश्यकता होती.

महापुराच्या काळात जयंत पाटील सांगलीत ठाण मांडून

जुलैच्या शेवटच्या आठवड्यात कृष्णा आणि पंचगंगा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे सांगली आणि कोल्हापूर शहरासह नदी किनारच्या गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा पूरस्थितीवर जयंत पाटील सातत्याने लक्ष ठेवून होते. मुसळधार कोसळणार्‍या पावसामुळे संपूर्ण रात्रभर अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्कात राहून सांगली, कोल्हापूर आणि सातारा भागातील पूरपरिस्थितीचा जयंत पाटील यांनी आढावा घेत होते. त्यानंतर 23 जुलै रोजी सकाळी पुण्यातील नियोजित कार्यक्रम उरकून जयंत पाटील सांगलीत दाखल झाले होते.

सांगली जिल्ह्यात 22 जुलैला अवघ्या 24 तासात सरासरी 59.6 मि.मी. पावसाची नोंद झाली होती.. शिराळा तालुक्यात 154.3 मि.मी. पावसाची नोंद झाली. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने कृष्णा नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यामुळे सांगलीकरांवर पुन्हा एकदा 2019च्या महापुराचे सावट निर्माण झालं होतं.

तत्पूर्वी अलमट्टी धरणातून पाण्याच्या विसर्गाबाबत जयंत पाटील यांनी कर्नाटक सरकारशी चर्चा केली होती. कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनीही अलमट्टी धरणातून अडीच ते तीन लाखापर्यंत पाण्याचा विसर्ग सुरु ठेवत चांगला प्रतिसाद दिला होता.

इतर बातम्या : 

प्राध्यापक भरतीवरील बंदी उठवा!, पुण्यात प्राध्यापकांचं 28 व्या दिवशी अर्धनग्न आंदोलन, सरकारची भूमिका काय?

मोदी म्हणतात, भारत-पाक फाळणीचा स्मृती दिन साजरा करणार; पटोले म्हणातात, हा तर देशांतर्गत फाळणीचा डाव

Excess rain water will be diverted to drought stricken talukas of Sangli district

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.