Sangli – शेती नसल्यामुळे बिसलेरी बाटलीत पिकवली वांगी, अनोख्या प्रयोगाच सर्वत्र कौतुक
त्या घराच्या परिसरात गेलेल्या प्रत्येक मनुष्याचं ही झाडं लक्ष केंद्रीत करत आहेत. त्यामुळे तिथं पाहायला अनेकजण जातात. त्याचबरोबर फाळके कुटुंबियांना अनेक प्रश्न देखील विचारत असल्याची माहिती मिळाली आहे.

सांगली – शेती नसलेल्या अनेक लोकांना शेती करायची इच्छा असते. त्यामुळे सांगली (sangli)जिल्ह्यातील शिराळा (shirala) तालुक्यातील पणुंब्रे वारूण (panumbre warun) गावात एका तरूणाने अनोखा प्रयोग केला आहे. बिस्लेरीच्या बाटलीत या तरूणाने वांग्याची झाडे पिकवली आहेत. त्याचबरोबर वांग्याच्या झाडांसोबत त्यांनी मिरची देखील लावली आहे. घराच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या मांडवात बिस्लेरी पाण्याच्या बाटल्या जमिनीच्या दिशेने टांगल्या आहेत. त्यात त्यांनी उलट्या पध्दतीने झाडं लावली आहेत. तरूणाच्या घराशेजारी जाणाऱ्या प्रत्येकांचं ही झाड लक्ष वेधून घेत आहेत. विशेष म्हणजे या तरूणांचं कौतुक देखील अनेकांनी केलं आहे.
शेती नसल्याने अनोखा प्रयोग
मासेमारी करून उदरनिर्वाह करणारं फाळके कुटुंब पणुंब्रे गावात वास्तव करीत आहे. शेती अजिबात नसल्याने काहीतरी आपण पिकवलेलं खायला हवं अशी तरूणाची धारणा होती. त्यामुळे त्याने सुरूवातीला एक झाड लावून प्रयोग केला. त्यानंतर झाडे येत असल्याचं लक्षात आल्यानंतर त्यांनी अनेक झाडं लावली. त्यांच्या घराच्या समोर सध्या अनेक झाडं आहेत. त्या झाडांना वांगी आलेली आहेत. आत्तापर्यंत पाच किलो वांगी आम्ही खाल्ली असल्याचं त्याच्या घरच्या लोकांनी सांगितलं आहे. झाडांना वांगी आणि मिरच्या आल्यानंतर आम्हाला अधिक आनंद झाल्याचं देखील त्यांचं म्हणणं आहे.
लोकांचं लक्ष केंद्रीत करणारी झाडं
त्या घराच्या परिसरात गेलेल्या प्रत्येक मनुष्याचं ही झाडं लक्ष केंद्रीत करत आहेत. त्यामुळे तिथं पाहायला अनेकजण जातात. त्याचबरोबर फाळके कुटुंबियांना अनेक प्रश्न देखील विचारत असल्याची माहिती मिळाली आहे. परिसरात काही दिवसांनी अशा पध्दतीची अनेक पीकं दिसतील असं सु्ध्दा लोक म्हणत आहेत.
