AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sangli Flood : कोल्हापूर, सांगलीत पूरस्थिती; जलसंपदामंत्री सांगलीत दाखल, अधिकारी आणि नागरिकांच्या सातत्याने संपर्कात

मागच्या काही दिवसापासून पश्चिम महाराष्ट्रात त्याच तीव्रतेचा पाऊस पडत आहे आणि पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. मागचा अनुभव लक्षात घेता नागरिकांचे अधिक नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

Sangli Flood : कोल्हापूर, सांगलीत पूरस्थिती; जलसंपदामंत्री सांगलीत दाखल, अधिकारी आणि नागरिकांच्या सातत्याने संपर्कात
जयंत पाटील, जलसंपदामंत्री
| Edited By: | Updated on: Jul 23, 2021 | 9:48 PM
Share

मुंबई : मुसळधार पाऊस आणि कृष्णा, पंचगंगा नदीच्या पाण्यानं धोका पातळी ओलांडल्यामुळे सांगली आणि कोल्हापुरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरस्थितीवर जयंत पाटील सातत्याने लक्ष ठेवून आहेत. मुसळधार कोसळणार्‍या पावसामुळे संपूर्ण रात्रभर अधिकाऱ्यांशी फोनवर संपर्कात राहून सांगली, कोल्हापूर आणि सातारा भागातील पूरपरिस्थितीचा जयंत पाटील यांनी आढावा घेतला. दरम्यान आज सकाळी पुण्यातील नियोजित कार्यक्रम उरकून जयंत पाटील सांगलीत दाखल झाले आहेत. (Flood situation in Sangli Kolhapur, Water Resources Minister Jayant Patil reached Sangli)

सांगली जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 59.6 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात 154.3 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्याने कृष्णा नदी काठावरील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. आणखी दोन दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे सांगलीकरांवर पुन्हा एकदा 2019च्या महापुराचे सावट निर्माण झालं आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील 2019 चा पूर आठवला की अनेकांना झोप लागत नाही. मागच्या काही दिवसापासून पश्चिम महाराष्ट्रात त्याच तीव्रतेचा पाऊस पडत आहे आणि पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. मागचा अनुभव लक्षात घेता नागरिकांचे अधिक नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

कोयनातून 45 हजार क्यूसेक विसर्ग सुरू

सांगलीला जाण्यापूर्वी जयंत पाटील यांनी टीव्ही 9 मराठीशी बातचीत केली. चिपळूण, कोकणातील पूरस्थिती आटोक्यात पण दरडी कोसळताहेत. स्वत: उद्धव ठाकरे परिस्थिती लक्ष ठेऊन आहेत. सांगली साताऱ्यातील पूरस्थिती आटोक्यात आहे, तिथं पावसाच्या पाण्यामुळेच काही ठिकाणी पूर आलाय, कोयनातून 45 हजार क्यूसेक विसर्ग सुरू आहे, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.

अलमट्टीतून अडिच लाखांचा विसर्ग

कर्नाटक सरकार शी बोलणी सुरू आहे, अलमट्टीतून अडिच लाखांचा विसर्ग सुरू ठेवण्यासाठी ते प्रतिसाद देताहेत, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. पूरग्रस्त भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे, असंही त्यांनी सांगितलं.

कोल्हापुरात पावसाच्या पाण्यानेच पूर आलाय

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाच्या पाण्याचनेच पूर आलेला आहे. धरणांमधून पाणी सोडण्याचं नियोजन अजिबात चुकलेलं नाही, असही त्यांनी स्पष्ट केलं.

कोयनेच्या इतिहासात विक्रमी पाऊस

कोयना धरणात गेल्या दोन दिवसात 18 टीएमसी पाणी जमा झालंय. हा विक्रम आहे. साताऱ्यातील नवजा येथे 700 मिमी पाऊस पडला, महाबळेश्वराला देखील मोठ्या प्रमाणावर पाऊस होतोय, म्हणून धरण आत्तापासूनच खाली करायला सुरू केलंय जेणेकरून भविष्यात पूर येऊ नये. कोयना धरणात यापू्र्वी 24 तासात 12 टीएमसी पाणी जमा होण्याचा रेकॉर्ड आहे. तो यावेळी मोडला गेलाय, असंही जयंत पाटील यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या :

VIDEO: काल इथे गाव होतं… डोंगराच्या आडोशाला गेले आणि…; तळीयेची दुर्घटना नेमकी कशी घडली?; वाचा सविस्तर

Maharashtra Flood : महाराष्ट्रात पावसाचा हाहा:कार; सुप्रिया सुळे अमित शाहांच्या भेटीला, शहांकडून सर्वतोपरी मदतीचं आश्वासन

Flood situation in Sangli Kolhapur, Water Resources Minister Jayant Patil reached Sangli

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...