पहाटे 3 वाजता चढाईला सुरुवात, सकाळी 10 वाजता टोकावर, पोलिसाकडून लिंगाणा किल्ला सर

विशेष म्हणजे लिंगाणा किल्ला सर करणारे विजय घोलप हे सांगली जिल्ह्यातील पहिले पोलीस ठरले आहेत. (Sangli Police Vijay Gholap Lingana fort Climbed)

  • राजेंद्र कांबळे, टीव्ही 9 मराठी, सांगली
  • Published On - 22:18 PM, 26 Jan 2021
पहाटे 3 वाजता चढाईला सुरुवात, सकाळी 10 वाजता टोकावर, पोलिसाकडून लिंगाणा किल्ला सर

सांगली : सांगली जिल्ह्यातील एका पोलिसाने लिंगाणा किल्ला सर केला आहे. विजय घोलप असे या पोलीस हवालदाराचे नाव आहे. विशेष म्हणजे लिंगाणा किल्ला सर करणारे विजय घोलप हे सांगली जिल्ह्यातील पहिले पोलीस ठरले आहेत. हा किल्ला सर केल्यानंतर त्यांनी आणि त्यांच्या टीमने प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकवला आहे. (Sangli Police Vijay Gholap Lingana fort Climbed)

दरवर्षीप्रमाणे यंदाही देशात ‘72 वा प्रजासत्ताक दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण देशभरात ठिकठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राजपथावर भारताची विविधता आणि सामर्थ्य दर्शविणारी दृश्ये दाखवण्यात आली. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सांगलीतील पोलीस दलात कार्यरत असणारे पोलीस हवालदार विजय घोलप यांनी लिंगाणा किल्ला सर केला आहे. कोल्हापूर हेकर्स या टीम सोबत त्यांनी हा किल्ला चढायला सुरुवात केली. यानंतर 4 हजार फूट किल्ल्यावर जाऊन विजय घोलप आणि त्यांच्या टीमने प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी तिरंगा फडकावला.

मी पहाटे 3 वाजता लिंगाणा किल्ला सर करायला सुरुवात केली. सकाळी 10 च्या दरम्यान आम्ही लिंगाणाच्या टोकावर पोहोचलो. किल्ल्यावर पोहोचल्यानंतर राष्ट्रगीत आणि वंदे मातरम ही गाणी गायली. दुपारी 3 च्या दरम्यान आम्ही 13 ट्रेकर खाली उतरलो, अशी प्रतिक्रिया लिंगाणा सर केल्यानंतर विजय घोलप यांनी दिली.

सरळ रेषेत हा किल्ला आहे तस वर चढणे अवघड असते. मात्र घोलप आणि त्यांच्या साथीदारांनी किल्ला सर केला आहे. दरम्यान गेल्यावर्षी विजय घोलप यांनी महाराष्ट्रातील सर्वात उंच असणारे कळसूबाई हे शिखर यांनी सर केले होते.

लिंगाणा किल्ला सर करत वर जाऊन तिरंगा फडकवावा, असे अनेक ट्रेकर्सचे स्वप्न असते. पण अनेकांना हे स्वप्न पूर्ण करता येतचं असं नाही. मात्र घोलप यांनी स्वप्न बघत ते प्रत्यक्षात उतरवले आहेत. (Sangli Police Vijay Gholap Lingana fort Climbed)

संबंधित बातम्या : 

शीतल आज तू हवी होतीस, डॉ. विकास आमटे यांची भावनिक पोस्ट

गिरीश बापट हे भाजपचे खासदार नाहीत तर…. : अजित पवार