AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sangli politics| मुंगीही हत्तीला भारी पडू शकते…खासदार पाटील-आमदार बाबर यांच्यात जुंपली; का सुरूय वाद?

खासदार संजय पाटील यांच्या आरोपाला आमदार अनिल बाबर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, यशवंत कारखान्याचा निकाल तुमच्या बाजूने लागला असेल, तर आनंद व्यक्त करण्याऐवजी तुम्ही संताप का व्यक्त करीत आहात?

Sangli politics| मुंगीही हत्तीला भारी पडू शकते...खासदार पाटील-आमदार बाबर यांच्यात जुंपली; का सुरूय वाद?
Sanjay Patil, Anil Babar.
| Edited By: | Updated on: Jan 09, 2022 | 11:12 AM
Share

सांगलीः सांगली-खानापूर तालुक्यातील नागेवाडीच्या यशवंत साखर कारखानाच्या निकालावरून भाजप खासदार संजय पाटील आणि शिवसेना आमदार अनिल बाबर यांच्यात थेट वाकयुद्ध सुरू झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऐन थंडीत राजकीय वातावरण चांगलेच गरम झालेले पाहायला मिळते आहे. हा वाद नेमका कशामुळे विकोपाला गेलाय ते जाणून घेऊ.

खासदारांचा इशारा

भाजप खासदार संजय पाटील म्हणतात की, 2012-13 साली जिल्हा बँकेने यशवंत कारखाना विक्रीस काढला. त्यानंतर आपण टेंडरच्या माध्यमातून त्यावेळच्या ऑफसेट प्राईसपेक्षा 28 कोटी रुपये जास्त देवून यशवंत कारखाना घेतला. त्याच्यानंतर सेल सर्टिफिकेट आणि पझेशन दिलं. त्यानंतर अनिलभाऊंनी कोर्ट मॅटर सुरू केला. गेल्या नऊ वर्षामध्ये कोर्ट प्रकियेमुळे मला अनेक आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले. परंतु मी कधीही व्यक्तीगत टीका, टिप्पणी केलेली नाही.आता सुरुवात तुम्ही केली आहे. त्यामुळे मी देखील संघर्षला तयार आहे, असा इशारा त्यांनी दिलाय.

कारखाना कोणी बंद पाडला?

खासदार संजय पाटील पुढे म्हणाले की, माझी कायदेशीर लढाई सुरू होती. त्यामुळे कायदेशीर लढाईला सामोरे जात होतो. नुकताच पंधरा दिवसांपूर्वी कारखान्याच्या बाबतीत निकाल आमच्या बाजूने लागला आहे. यशवंत कारखाना कुणी बंद पाडला, त्याच्यामध्ये काय घोटाळे झाले ? त्याला जबाबदार कोण ? यावर खोलात जाऊन योग्यवेळी लोकांसमोर बोलेन. मी शेतकर्‍यांसाठी, सभासदांसाठी करणार आहे. हे लोकांपुढे सांगायचं खोटं नाटक बंद करा. निकालामुळे तुमचं पितळ उघड झालं आहे, असे म्हणत खासदार पाटील यांनी कारखान्याच्या अवस्थेवरून आमदार अनिल बाबर यांच्यावर जोरदार टीका केली आहे

आमदारांचे प्रत्युत्तर

खासदार संजय पाटील यांच्या या आरोपाला आमदार अनिल बाबर यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, यशवंत कारखान्याचा निकाल तुमच्या बाजूने लागला असेल, तर आनंद व्यक्त करण्याऐवजी तुम्ही संताप का व्यक्त करीत आहात? दमदाटीची भाषा कशाला करता. ते दिवस आता संपले आहेत. त्यामुळे असली भाषा कोणीच करू नये आणि तुम्ही तर लोकसभा सदस्य आहात. तुम्हाला हे शोभतच नाही. मुंगीही हत्तीला भारी पडू शकते, अशा शेलक्या शब्दांत आमदार अनिल बाबर यांनी खासदार संजय पाटील यांना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

माझी कायदेशीर लढाई सुरू होती. त्यामुळे कायदेशीर लढाईला सामोरे जात होतो. नुकताच पंधरा दिवसांपूर्वी कारखान्याच्या बाबतीत निकाल आमच्या बाजूने लागला आहे. यशवंत कारखाना कुणी बंद पाडला, त्याच्यामध्ये काय घोटाळे झाले ? त्याला जबाबदार कोण ? यावर खोलात जाऊन योग्यवेळी लोकांसमोर बोलेन. – संजय पाटील, खासदार

यशवंत कारखान्याचा निकाल तुमच्या बाजूने लागला असेल, तर आनंद व्यक्त करण्याऐवजी तुम्ही संताप का व्यक्त करीत आहात? तुम्हाला हे शोभतच नाही. मुंगीही हत्तीला भारी पडू शकते. – अनिल बाबर, आमदार

इतर बातम्याः

Medical Exam| कोरोनामुळे मेडिकलच्या परीक्षा पुढे ढकलल्या; कधीपासून होणार पेपर?

Sahitya Sammelan|साहित्य संमेलनाच्या तारखा जाहीर; उदगीरमध्ये कन्नड, उर्दू, तेलगूचाही होणार सन्मान…!

Nashik Train| नाशिक रेल्वे मार्गावरच्या 10 गाड्या आज रद्द; प्रवाशांचे पुन्हा बेहाल!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.