VIDEO: राज्यपाल राजकारण करताहेत, त्यांना पदावर ठेवणं अयोग्य; संजय राऊतांचा पुन्हा हल्लाबोल

VIDEO: राज्यपाल राजकारण करताहेत, त्यांना पदावर ठेवणं अयोग्य; संजय राऊतांचा पुन्हा हल्लाबोल
राज्यपाल राजकारण करताहेत, त्यांना पदावर ठेवणं अयोग्य; संजय राऊतांचा पुन्हा हल्लाबोल
Image Credit source: tv9 marathi

विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीवरून पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं. महाविकास आघाडीतील नेते वारंवार राज्यपालांची भेट घेऊन विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्याची विनंती राज्यपालांना करत आहे.

संदीप राजगोळकर

| Edited By: भीमराव गवळी

Mar 16, 2022 | 10:36 AM

नवी दिल्ली: विधानसभा अध्यक्षाच्या निवडणुकीवरून पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagatsingh koshyari) यांच्यावर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं. महाविकास आघाडीतील नेते वारंवार राज्यपालांची भेट घेऊन विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्याची विनंती राज्यपालांना करत आहे. राज्यपाल ते पद भरत नाहीत याचा अर्थ राज्यपाल राजकारण करत आहेत. याचा अर्थ राज्यपाल ज्या पक्षातून आले आहेत, त्या पक्षाच्या दबावामुळे ते राजकारण करत आहे. राज्यपाल विरुद्ध सरकार अशा प्रकारचा संघर्ष अनेक राज्यात झालेला आहे आणि सुरू आहे. पण महाराष्ट्रात (maharashtra) ज्या पातळीवर राज्यपालांनी आणि त्या पक्षाने हा संघर्ष नेऊन ठेवला त्याची इतिहासात काळ्या अक्षरात नोंद होईल. राज्यपालांनी ज्या वारंवार भूमिका घेतल्या, त्या कायद्याच्या आणि घटनेचा भंग करणाऱ्या आहेत. अशा घटना भंग करणाऱ्या व्यक्तीला पदावर ठेवणं, पदावर राहू देणं आणि त्यांच्या माध्यमातून बहुमतातील सरकारला अडचणी करू देणं हे सातत्याने हे आयोग्य आहे, असं संजय राऊत (sanjay raut) यांनी म्हटलं आहे. राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा हल्लाबोल केला.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावेळी काँग्रेसच्या जी-23 नेत्यांवरही टीका केली. जी-23 आणि काँग्रेसमध्ये काही फरक नाही असं मला वाटतं. जी-23 कुणाची तरी सुपारी घेऊन काँग्रेसच्या विरोधात काम करत आहे असं मला वाटतं. काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. विरोधी पक्षाचं स्थान राहिलं पाहिजे. विरोधी पक्ष मजबूत राहिला पाहिजे. जेव्हा विरोधी पक्ष एकत्र येण्याची गोष्ट करतो तेव्हा त्यात काँग्रेस असला पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे, असं राऊत म्हणाले.

आता रडताय कशाला?

भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यावरूनही त्यांनी भाजपवर हल्ला केला. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या चौकश्या होतात. खोट्या प्रकरणात त्यांना अटक होते, तेव्हा भाजपच्या नेत्यांना गुदगुल्या होतात. ते फक्त रस्त्यावर उतरून लेझिम खेळायचेच बाकी असतात. कुणी चुकीचं केलं असेल, राज्याला लुबाडलं असेल, फसवणूक केली असेल तर त्यावर कारवाई करण्यास राज्याचे पोलीस सक्षम आहेत. पोलीस किती सक्षम आहेत हे फडणवीसांना माहीत आहे. त्यांनी रश्मी शुक्ला प्रकरणी दाखवून दिलं आहे. पोलीस कधीही खोटे गुन्हे दाखल करणार नाहीत. मुंबई बँक घोटाळा हे एक टोक आहे. पण पीएमसी बँक घोटाळ्यात कोणी तुरुंगात गेलं तर मला आश्चर्य वाटणार नाही. राज्याचे पोलीस, तपास यंत्रणा तुमची चौकशी करू शकत नाही का? रडताय कशाला? मला का बोलवता? मला का बोलवता? असं का ओरडता? अरे जाना सामोरे, नौटंकी कसली करता?, अशा शब्दात राऊत यांनी भाजपवर हल्ला चढवला.

संबंधित बातम्या:

जेव्हा ज्ञानेश्वर नागरगोजेचा मोहम्मद शहजाद झाला, हिंदू-मुस्लिम, मुस्लिम-हिंदू, धर्म बदलाची बीडची घटना चर्चेत

The Kashmir Files: काश्मीरमधून पंडीतांनी पलायन केलं त्यावेळेस केंद्रात कुणाचं सरकार होतं? काँग्रेस नेते म्हणतात, भाजपला विचारा

Maharashtra News Live Update : राज्यातील पोलिसांनी चौकशी केल्यानंतर रडताय का ? – संजय राऊत

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें