AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ना डिलिमिटेशन, ना नारीशक्ती विधेयक… भाजपला खासदार का फोडायचे? संजय राऊत यांनी केला हादरवणारा गौप्यस्फोट

संजय राऊत यांनी खासदार फोडाफोडीमागील भाजपचा खरा उद्देश उघड केला आहे. डीलिमिटेशन किंवा नारीशक्ती विधेयक ही कारणे नाकारत, राऊतांनी दावा केला की, भाजपला प्रादेशिक पक्ष संपवून संविधान बदलून देशात हुकूमशाही आणायची आहे. २०२९ मध्ये राहुल गांधींच्या नेतृत्वात सत्ता येऊ नये म्हणून भाजप ही खेळी करत आहे, असा गौप्यस्फोट त्यांनी केला.

ना डिलिमिटेशन, ना नारीशक्ती विधेयक... भाजपला खासदार का फोडायचे? संजय राऊत यांनी केला हादरवणारा गौप्यस्फोट
भाजपला खासदार का फोडायचे? संजय राऊत यांचा हादरवणारा गौप्यस्फोट
| Updated on: Jun 19, 2026 | 11:42 AM
Share

देशात सध्या खासदार फोडण्याचे वारे वाहत आहेत. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे खासदार फोडल्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार फोडण्यात आले आहेत. आता काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि समाजवादी पार्टीचे खासदारही फोडले जाणार आहेत. डीलिमिटेशन आणि नारीशक्ती विधेयक मंजूर करण्यासाठी देशभरात खासदार फोडण्याचे काम सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, ही थिअरी खासदार संजय राऊत यांनी फेटाळून लावली आहे. संजय राऊत यांनी नवा गौप्यस्फोट केल्याने एकच खळबळ उडाली आहे. मीडियाशी संवाद साधताना राऊत यांनी आज मोठा बॉम्ब टाकला आहे.

नारी शक्ती विधेयक आणि डीलिमिटेशन विधेयक मंजूर करण्यासाठी खासदारांची फोडाफोडी सुरू आहे, हे विश्लेषण चुकीचं आहे. नंबर गेमसाठी आम्ही आमच्या पक्षाचा बळी द्यायचा का? आमच्या प्रादेशिक अस्मितेचा बळी द्यायचा का? उद्या अमित शाह उद्या नसतील. ते काही संजीवनी बुटीका खाऊन जन्माला आले नाही ना. ते काय अमर आहेत का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.

म्हणून खासदार फोडत आहेत

भाजपला घाबरलेली आहे. 2029 मध्ये काँग्रेससोबत त्यांना प्रादेशिक पक्ष राहू नये असं वाटतं. 850 खासदारांचा आकडा घेऊन भाजप संविधानात बदल करणार आहे. संविधान बदलल्यावर भाजपला देशातील लोकशाही खतम करायची आहे आणि त्यांना या देशात हुकूमशाही आणायची आहे. अध्यक्षीय पद्धत आणायची आहे. तानाशाही आणायची आहे. पण आम्ही ते होऊ देणार नाही, असा गौप्यस्फोटच राऊत यांनी केला आहे.

आम्ही सत्ता बनवतोय

राहुल गांधी देशाचे नेते आहेत. लोकप्रिय नेता आहेत. ते संघर्ष करत आहे. आज अशाच संघर्षाची गरज आहे. राहुल गांधींच्या लीडरशीपनेच मोदींना आव्हान उभं केलं आहे. 2029मध्ये आम्ही राहुल गांधींच्या नेतृत्वात सरकार बनवणार आहोत. हे मोदी आणि शाह यांना माहीत आहे. त्यामुळेच ते प्रादेशिक पक्ष तोडत आहे. आम्ही 2029 मध्ये केंद्रात सरकार बनवतोय हे मोदी आणि शाहांना माहीत आहे. त्यामुळेच आज देश राहुल गांधींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे, असं त्यांनी सांगितलं.

हेच काम आहे त्यांना

शरद पवार गटाचे खासदारही फोडले जाणार असल्याची चर्चा आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. हेच काम आहे ना दिल्लीवाल्यांचं? मी सांगितलं ना काल मोदी आणि ट्रम्प यांची बैठक झाली. शिंदे तुमचे खासदार फोडणार आहे, सरकार सांभाळा असं मोदी ट्रम्पला सांगत आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला.

Follow Us