AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : तर एकनाथ शिंदे भाजपच्या या नेत्यांनाही फोडतील; संजय राऊत यांचा नाव घेऊन थेट दावा

संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या फोडाफोडीच्या राजकारणावर तीव्र टीका केली आहे. शिंदे गट ठाकरे गटाचे आमदार फोडत असल्याच्या चर्चांवर राऊत म्हणाले की, त्यांना कोणीही काम राहणार नाही, ते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि अगदी अमित शहांनाही फोडतील. 'ऑपरेशन टायगर'पासून फडणवीसांनी सावध राहावे, असा सल्लाही राऊतांनी दिला.

Sanjay Raut : तर एकनाथ शिंदे भाजपच्या या नेत्यांनाही फोडतील; संजय राऊत यांचा नाव घेऊन थेट दावा
संजय राऊतांचे टीकास्त्र
| Updated on: Jun 26, 2026 | 11:05 AM
Share

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून गद्दार खासदारांच्या मतदारसंघांच्या दौऱ्यावर आहेत. शिवसेना ठाकरेतून फुटून शिंदे गटात गेलेल्या खासदारांच्या मतदारसंघात ते फिरणार आहेत, तेथील कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिकांशी संवाद साधणार आहेत अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. मात्र आता ठाकरेंना आणखी मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा असून ठाकरेंच्या काही आमदारांनी शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली होती. ते आमदार फोडणार असल्याच्या चर्चेवर राऊतांनी चोख उत्तर दिलं. कदाचित त्यांना आता पुढे काहीच काम राहणार नाही, सगळेच फोडणार आहेत ते. एक दिवस ते (शिंदे) देवेंद्र फडणवीस यांनाही फोडतील, असा टोला राऊत यांनी हाणला. माध्यमांशी संवाद साधताना राऊत विविध विषयांवर बोलले.

ते कोणालाही फोडू शकतात. देवेंद्रजींना फोडतील, मग उद्या सांगतील आता मी चंद्रशेख बावनकुळे यांना फोडणार आहे, मला बावनकुळे आत्ताच भेटून गेले आहेत, असं ते करूच शकतात. एकदा माणसाला नशा चढली, भांग,गांजा, फोडाफोडीची की मग ते काहीही बोली शकतात. देवेद्रजींनी फोडलं. मग शेवटी ते सांगतील, आता मी अमित शहांनाही फोडलंय. अमित शहांना देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधामध्ये फोडण्याच्या त्यांचा प्रयत्न चालू आहे, हे सगळ्यांना माहीत आहे, त्यामुळे ‘ऑपरेशन टायगर’पासून सगळ्यात जास्त देवेंद्र फडणवीस यांनीच सावध राहिलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले.

आमचं ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही, आम्ही टायगर आहोतच. आम्ही टायगर, मग ते कोण होते स्वत: ? हे पहावं लागेल, असा टोलाही राऊतांनी हाणला.

माझ्यामुळे तुमचा खिसा फाटतोय – राऊतांचा शिंदेंना टोला

काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे असं म्हणाले होते की संजय राऊत आमच्या विरोधा जेवढं बोलतात, तेवढा आमचा पक्षा वाढत जातोय. त्यावर राऊतांनी शिंदेंना खणखणीत टोला लगावला. ‘ वाढू द्या ना पक्ष, तुमचा पक्ष कसा वाढतो, तुमचा पक्ष वाढण्यासाठी परवा 6 खासदारांना 50-50 कोटी रुपये दिले. किती खर्च आहे तुम्हाला माझ्यामुळे, मी बोलल्यामुळे तुमचा खर्च किती वाढतोय ! 50 कोटी दिले, परत 25-25 कोटी रुपये द्यायचेत. त्याच्याआधी माझ्यामपळे हजार-  दोन हजार कोटी दिले.. माझ्यामुळे तुमचा खिसा फाटतोय, ‘ अशी खोचक टीका राऊत यांनी केली.

 

Follow Us
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
Video : राम मंदिर दानचोरी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर
शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले...
Video :  शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुप्रिया सुळेंनी सुचवला पर्याय, म्हणाले ते हजारो कोटी रुपये थेट..राजकारण न करण्याचं आवाहन!
राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!
Video: दुष्काळ बाजूला ठेव, बांधावर जाऊन...राज्यात दुष्काळ जाहीर होताच आदित्य ठाकरेंचे महत्त्वाचे विधान!