AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे काय नवाज शरीफ आहेत काय?; संजय राऊत यांचा सरकारला इशारा

आम्ही मुंब्र्यात येत आहोत. पोलीस आम्हाला अडवणार आहेत. पण आमची शाखा तोडली तेव्हा पोलीस कुठे होते? आज सकाळपासून पोलीस रस्त्यावर उतरले आहेत. जमाववबंदी लागू करण्यात आली आहे. आमच्या लोकांना नोटीस बजावल्या जात आहेत. मग शाखा पाडत असताना ही यंत्रणा कुठे होती? असा संतप्त सवाल संजय राऊत यांनी केला आहे. ते मीडियाशी संवाद साधत होते.

उद्धव ठाकरे काय नवाज शरीफ आहेत काय?; संजय राऊत यांचा सरकारला इशारा
sanjay rautImage Credit source: TV9MARATHI
| Updated on: Nov 11, 2023 | 3:38 PM
Share

दिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी प्रतिनिधी, मुंबई | 11 नोव्हेंबर 2023 : मुंब्र्यातील शिवसेनेची शाखा तोडण्यात आली आहे. त्यामुळे मुंब्रा येंथे तणावाचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज मुंब्र्यात जाणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यापूर्वीच मुंब्र्यातील उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे होर्डिंग्ज फाडण्यात आले आहेत. त्यामुळे ठाण्यात तणाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ठाण्यात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तर दुसरीकडे या मुद्द्यावरून ठाकरे आणि शिंदे गटात शाब्दिक युद्ध सुरू झालं आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी या मुद्द्यावरून थेट राज्य सरकार आणि शिंदे गटालाच इशारा दिला आहे.

मुंब्र्यात एक शाखा पाडली जाते. पोलीस बघ्याची भूमिका घेतात. ठाण्यातील शाखा जबरदस्तीने पाडल्या जात आहेत. पोलिसांच्या मदतीने काही ठिकाणी शाखा ताब्यात घेतल्या जात आहेत. अशावेळी आम्ही काय गप्प बसायचं? आम्हाला अडवताय का? आम्ही जाऊ तिकडेच. आम्हाला अडवाच. तुमच्या हातात सत्ता आहे. तुमच्या हातात खोक्यांची मस्ती आहे. ही खोक्यांची मस्ती आहे, बाकी काही नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

मिंधेपणाची भूमिका घेऊ नका

उद्धव ठाकरेंच्या स्वागताचे बॅनर्स फाडले गेले. तेव्हा पोलीस काय करत होते? पोलिसांनी मिंधेपणाची भूमिका घेऊ नये. पोलिसांनी तटस्थ राहावे. 31 डिसेंबरनंतर पोलिसांचे मालक राहतील का जातील हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी पाहावं. उद्धव ठाकरे माजी मुख्यमंत्री आहेत. 2024ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर असतील हे मी खात्रीने सांगतो, असं संजय राऊत म्हणाले.

शिवसैनिक आमच्याच बाजूला

मुंब्र्यात संघर्ष झाला तर एकाच बाजूला फटका बसेल. जनता आमच्यासोबत आहे. शिवसैनिक आमच्यासोबत आहेत. दिवाळीच्या सणाचा विचार आम्हीही करतो. याची जाणीव आणि काळजी कोणी घेतली पाहिजे. पोलिसांनी. आम्ही तिथे गेलो आणि आलो. आम्ही तिथे सभा घेणार नाही, असं सांगतानाच उद्धव ठाकरे यांना रोखायला ते काय नवाज शरीफ आहेत का? ते उद्धव ठाकरे आहेत. हा महाराष्ट्र आहे. मुंब्रा महाराष्ट्रात आहे, असा सवाल त्यांनी केला.

लोकांची दिवाळी खराब करायची नाही

ज्यांच्याकडे या राज्याची सूत्रे आहेत. त्यांनी कायदा सुव्यवस्था राखली पाहिजे. ही तुमची जबाबदारी आहे. एका शाखेला बुलडोझर लावून उद्ध्वस्त करत असताना मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस आयुक्त काय करत होते? ही वेळ आणली कोणी? ही वेळ त्यांनी आणलीय. आम्हाला कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्था बिघडवून लोकांची दिवाळी खराब करायची नाही. पण आमच्यावर काही लादलं तर आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशाराच त्यांनी दिला. हा उद्धव ठाकरे यांचा विषय नाही. हा जनतेचा विषय आहे. अस्मितेचा विषय आहे. आम्ही जाणार आहोत. अडवताय तुम्ही तर अडवा. आम्ही त्यांच्या छाताडावर पाय रोवून उभं राहणार आहोत, असंही ते म्हणाले.

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.