AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुढच्या घडामोडी काय घडणार याची आम्हाला कल्पना, संजय राऊत यांचं भाकीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील एका लग्न सोहळ्यात भेटले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये गप्पा रंगल्या. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना आणि भाजपच्या युतीबाबत सूचक विधान केल्याने पुन्हा एकदा युतीच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यावर आता संजय राऊत यांनीही सूचक विधान करून या चर्चांना हवा दिली आहे.

पुढच्या घडामोडी काय घडणार याची आम्हाला कल्पना, संजय राऊत यांचं भाकीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
| Updated on: Jan 30, 2025 | 11:31 AM
Share

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि भाजपचे नेते चंद्रकांत पाटील हे एका लग्नाच्या निमित्ताने एकत्र भेटले. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये गप्पा रंगल्या आणि हास्यविनोदही झाले. यावेळी ठाकरे गटाचे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी युती कधी होईल? असा मिश्किल सवाल चंद्रकांतदादांना केला. त्यावर चंद्रकांतदादांनीही मिश्किलपणे उत्तर देत, तो माझ्यासाठी सुवर्ण क्षण असेल असं सांगितलं. त्यामुळे भाजप आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र येणार का? अशी चर्चा रंगली आहे. ही चर्चा सुरू असतानाच संजय राऊत यांनी पुढच्या घडामोडी काय घडणार हे आम्हाला माहीत आहे, असं सांगत या चर्चांना हवा दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथ होणार का? अशी चर्चा रंगली आहे.

खासदार संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे आणि चंद्रकांत पाटील यांच्या भेटीवर भाष्य केलं. चंद्रकांतदादांनी ज्या भावना व्यक्त केल्या. त्याबाबत आमच्या काय भावना आहेत. याचं उत्तर आम्ही योग्यवेळी देऊ. सध्या आमच्याकडे युतीची कोणतीही चर्चा नाही. आमच्या बैठकात तो विषय निघत नाही. पण भविष्यात काय होईल, याचं उत्तर माझ्याकडे नाही. मात्र, पुढच्या घडामोडी काय घडणार आहे याची पूर्ण कल्पना आम्हाला असल्याने आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत, असं सूचक विधान संजय राऊत यांनी केलं.

त्याच भावना आमच्या पक्षात

चंद्रकांत पाटील हे नेहमीच शिवसेना-भाजप युतीचे समर्थक राहिले आहेत. शिवसेना आणि भाजपची जी जुनी पिढी होती, ज्यांनी एकत्र काम केलं, त्यापैकी चंद्रकांतदादा हे एक आहेत. आता भाजपमध्ये हौशे, नवशे आणि गवशे आहेत. त्यांना शिवसेना-भाजपच्या 25 वर्षाच्या युतीचं महत्त्व समजणार नाही. या हौशे, नवश्यांचा हिंदुत्वाशी काडीचाही संबंध नाही, असं सांगतानाच चंद्रकांतदादांनी ज्या भावना व्यक्त केल्या तशाच भावना त्यांच्या पक्षातील अनेकांच्या आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

शाह यांचा उदय झाला आणि…

शिवसेना आणि भाजपने 25 वर्ष उत्तम काम केलंय. आम्ही नरेंद्र मोदी यांच्यासोबतही चांगलं काम केलं. पण जसा अमित शाह यांचा राजकारणात उदय झाला, त्यानंतर शिवसेना आणि भाजपमध्ये वितुष्ट आलं, असं सांगतानाच आता चंद्रकांतदादांनी ज्या भावना व्यक्त केल्या, त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे, असं ते म्हणाले.

तेच मागत होतो ना?

चंद्रकांतदादा यांच्या ज्या भावना आहेत, त्या तुमच्या पक्षातही आहेत का? असा सवाल करताच राऊत यांनी त्याचं उत्तर होकारार्थी दिलं. आमच्या पक्षातही अशा भावना असू शकतात. का असू नये? आम्ही महाविकास आघाडी गेलो त्याला भाजपच्या लोकांचा हट्ट जबाबदार होता. आम्ही जे मागत होतो. ते आम्हाला दिलं नाही. आम्हाला साधं उपमुख्यमंत्रीपदही दिलं नाही. मात्र, आमचा पक्ष फोडून शिंदे गटाला सोबत घेतलं. त्यांना मुख्यमंत्रीपदही दिलं आणि उपमुख्यमंत्रीपदही दिलं. मग आम्ही वेगळं काय मागत होतो? असा सवाल राऊत यांनी केला.

अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.