AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सामंत लोणीवाले यांनी आरोप केले अन् सुभाष देसाईंचे पुत्र मिंधे गटात, संजय राऊत यांचे नेमके आरोप काय?

Sanjay Raut News | शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे पुत्र शिंदे गटात शामिल झाल्यानंतर संजय राऊत यांनी स्पष्टच प्रतिक्रिया दिली. ते कधी शिवसेनेत नव्हतेच असं म्हणताना राऊत यांनी शिंदे गटातील एका मंत्र्यावर निशाणा साधलाय.

सामंत लोणीवाले यांनी आरोप केले अन् सुभाष देसाईंचे पुत्र मिंधे गटात, संजय राऊत यांचे नेमके आरोप काय?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 14, 2023 | 11:15 AM
Share

नवी दिल्ली | शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे पुत्र भूषण देसाई यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. सुभाष देसाई यांचं पुढे काय होणार, यावरून आडाखे बांधले जात आहेत. मात्र संजय राऊत यांनी यावरून सविस्तर स्पष्टीकरण दिलंय. सुभाष देसाई यांचे पुत्र कधीची शिवसेनेत नव्हते आणि ते एकनाथ शिंदेंकडे गेल्याने ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला काहीही फरक पडणार नाही, असं राऊत म्हणालेत. तर भूषण देसाई एकनाथ शिंदे गटात कसे गेले, हा प्रश्न सामंत लोणीवाले यांना विचारा, असं संजय राऊत म्हणालेत. काही दिवसांपूर्वीच शिंदे गटाचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी भूषण देसाई यांच्यावर काही आरोप केले होते. त्यानंतर आता भूषण देसाई शिंदे गटात शामिल झाले आहेत. त्यामुळे त्या आरोपांचं काय झालं हा प्रश्न सामंत लोणीवालेंना विचारा, अशा शब्दात संजय राऊत यांनी उदय सामंत यांच्यावर निशाणा साधला आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

भूषण देसाई यांच्या मुलाने शिंदे गटात प्रवेश केल्यावरून संजय राऊत म्हणाले, ‘ शिवसेना नेते सुभाष देसाई हे एक ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचे चिरंजीव नेते नाहीत. काल सुभाष देसाईंनी त्यासंदर्भात सविस्तर निवेदन प्रसिद्ध केले. त्यांच्या मुलाचा शिवसेनेशी संबंध नाही. पण मिंधे गट कधी बाप पळवतात, आता मुलंही पळवायला लागलेत. ही मेगा भरती सुरु आहेत, पण त्याला अर्थ नाही. ती कुचकामी आहे. मिंधे गटातले एक मंत्री आहेत, सामंत लोणीवाले. त्यांनी काही महिन्यांपूर्वी याच देसाई यांच्या चिरंजीवावर काही आरोप केले होते. हेच ते. त्यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. असंही सांगितलं होतं. काही दिवसांपूर्वी कोकणातले सामंत लोणीवाले यांनी आरोप केले होते, त्याचं काय झालं, याचं आधी उत्तर द्या. मग आम्ही उत्तर देऊ… सुभाष देसाई हे ज्येष्ठ आणि आदर्श नेते आहेत. चिरंजीवांनी पक्षातून बाहेर पडणार असले तरी ते पक्षात कधी नव्हतेच. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेवर काही परिणाम होणार नाही.

भविष्यात या ओझ्याचं करायचं काय?

अनेक नेत्यांवर आरोप करायचे आणि त्यानंतर त्यांना भाजपा किंवा शिंदे गटात घ्यायचं, असे प्रयोग सुरु आहेत. पण या ओझ्याचं भविष्यात भाजप आणि शिंदे गटातील नेत्यांना खूप ओझं होणार आहे, असं वक्तव्य राऊत यांनी केलंय. संजय राऊत म्हणाले, ‘ भविष्यात या ओझ्याचं काय करायचं, हा सगळा प्रश्न त्यांच्यासमोर असेल. वॉशिंग मशीन बिघडेल, इतका कचरा ते आत टाकतायत..

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.