कोकणातील राजकीय दहशतवादाची चौकशी करण्यासाठी शहांनी एसआयटी नेमावी, राऊतांचा राणेंना टोला

कोकणातील राजकीय दहशतवादाची चौकशी करण्यासाठी शहांनी एसआयटी नेमावी, राऊतांचा राणेंना टोला
शिवसेना खासदार संजय राऊत

राणेंनी हातात लेखणी घेऊन काही मतं मांडली असेल तर लोकशाहीत आदर केलाच पाहिजे. फक्त तुम्ही खून करू नका, असा टोला संजय राऊत यांनी नारायण राणे यांना लगावला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: दादासाहेब कारंडे

Jan 05, 2022 | 4:08 PM

शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पुन्हा कोपरखळ्या मारल्या आहेत. राणेंना टीका करण्याचा अधिकार आहे, मात्र मर्यादा पाळल्या पाहिजेत. राणेंनी हातात लेखणी घेऊन काही मतं मांडली असेल तर लोकशाहीत आदर केलाच पाहिजे. फक्त तुम्ही खून करू नका, असा टोला संजय राऊत यांनी नारायण राणे यांना लगावला आहे.

राजकीय दहशतवादाची चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमावी

श्रीधर नाईक, अंकूश राणे, सत्यविजय भिसे, कालपरवा संतोष परब यांच्याबाबतीत काय झालं? मी तर म्हणेल केंद्रीय गृहमंत्रालयाने एसआयटी नेमावी. दहशतवादाबाबत कुणाला काही प्रश्न पडले असेल तर राणेंनी अमित शाह यांच्याकडे मागणी करावी, आम्हाला अडचण नाही. सिंधुदुर्गच काय राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात राजकीय दहशतवाद असूच नये, राजकारणात एक मोकळेपणा असला पाहिजे, अशी कोपरखिळी संजय राऊत यांनी मारली आहे.

सिंधुदुर्ग बँक निवडणूक फार मोठा विषय नाही

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक खूप मोठा विषय आहे वाटत नाही. हा एका जिल्ह्यातील विषय आहे. अनेक जिल्ह्यात बँकेच्या निवडणुका झाल्या पण एकाच जिल्ह्यात असे वातावरण झालं. एकाच जिल्ह्यात वातावरण का? याचा विचार केला पाहिजे. याबाबत राणेंच्या नेतृत्वात एखादं चर्चा सत्रं कुणी घेतलं तर आमचे लोक चर्चा सत्राला उपस्थित राहील, असाही टोला त्यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रात कांगावा का?

सर्व लोक मुख्यमंत्र्यांच्या प्रकृतीची माहिती घेत असतात. गोव्यातील अनेक खासदारांनी माहिती घेतली. त्यांच्यावर काही वैद्यकीय बंधनं आहेत. ती पूर्ण काळ राहत नाहीत, हळूहळू त्यातून माणूस उभा राहतो आणि काम करतो. देशात अनेक धडधाकट माणसं आहेत. देशाच्या राजकारणात, ते काहीच काम करत नाहीत. त्यांना दिल्लीतील व्यवस्था काहीच काम करू देत नाही. त्यांच्याविषयी काय म्हणणार? त्या मानाने महाराष्ट्रात गोंधळ का निर्माण करता ? असा सवाल त्यांनी भाजपला केला आहे. मुख्यमंत्री, अजित पवार, बाळासाहेब थोरात, नाना पटोले हे सर्व मिळून काम करत आहेत. चिंता करू नका. भाजपने शब्दांचे किती बार फोडले तरी सरकारचा केसही वाकडा होणार नाही. तुम्ही कितीही बोलत राहिला याला लकवा मारला, त्याला लकवा मारला, तर लकवा मारलाय म्हणजे काय हे काय पाहायचं असेल तर केंद्राकडे जाऊन पाहिलं पाहिजे. त्यांची कामाची पद्धत काय आहे? अशी टीका त्यांनी केली आहे.

राज्यपालांनी मर्यादा पाळाव्या

राज्यपाल पदावरील व्यक्तीने मर्यादा पाळल्या पाहिजे. मग ते मेघालयाचे असो महाराष्ट्राचे असो की पश्चिम बंगालचे. त्यांनी काही अद्वातद्वा बोललं की आम्ही त्यांचं समर्थन करणार नाही. महाराष्ट्राच्या राज्यपालांविषयी एक भूमिका आणि मेघालयाच्या राज्यपालांबाबतची दुसरी भूमिका असं आम्ही करणार नाही. राज्यपालांनी घटनेचं आणि पदाचं पालन केलं पाहिजे. राजकीय विधान करायचं असेल तर राजीनामा देऊन बोललं पाहिजे. सत्यपाल मलिक बोलले ते चुकीचं आहे. पंतप्रधानांचं म्हणणं आवडलं नसेल आणि सार्वजनिक बोलायचं असेल तर त्यांनी राजीनामा देऊन बोललं पाहिजे, असेही राऊत म्हणाले.

कॉफीसोबत हा पदार्थ तुम्ही वापरत आहात तर सावधान…स्किन केअरसाठी कॉफीसोबत हे वापरू नका…

Dombivali Crime: मोटारसायकलने फोडले लूटीचे बिंग, चैन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना पोलिसांनी केली अटक

Nagpur | घरीच तयार होत होती सुगंधी तंबाखू, पोलिसांनी टाकली धाड; धाडीत काय सापडलं?

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें