AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरेंना संजय राऊतच देणार सर्वात मोठा धक्का? बड्या नेत्याच्या दाव्याने राज्यात खळबळ; लवकरच…

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलेल्या दाव्यावर आता चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. तसेच राऊत ठाकरे गटात फूट पाडणार आहेत, असाही दावा त्यांनी केला आहे.

ठाकरेंना संजय राऊतच देणार सर्वात मोठा धक्का? बड्या नेत्याच्या दाव्याने राज्यात खळबळ; लवकरच...
sanjay raut Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 03, 2026 | 3:39 PM
Share

Chandrakant Patil Criticizes Sanjay Raut : ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी केलेल्या विधानाची राज्यभरात चर्चा होते. त्यांनी आता जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याविषयी मोठे विधान केले आहे. चंद्रकांत पाटील पुढच्या विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडून भाजपाच्या तिकिटावर निवडणूक लढवतील, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. असे असतानाच आता चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारा दावा केला आहे. आता संजय राऊत हे भविष्यात ठाकरे गट फोडणार आहेत, असे खळबळजनक भाष्य चंद्रकांत पाटलांनी केलं आहे.

संजय राऊतांवर सडकून टीका

शिवसेना पक्षाचे जे तुकडे झाले आहेत, ते संजय राऊत यांच्यामुळेच झाले आहेत. एकसंघ शिवसेनेचे तुकडे करण्यास संजय राऊत हेच कारणीभूत आहेत. संजय राऊत मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. संजय राऊत हा जळगाव मध्ये लग्नाला येतात आणि राजकीय गप्पा मारतात. आम्ही शिवसेनेत किती निष्ठावंत आहोत हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, असा हल्लाबोल चंद्रकांत पाटील यांनी केला.

संजय राऊत ठाकरे गट फोडण्याच्या तयारीत

एकनाथ शिंदे यांना सोडण्याचा कोणताही विचार मी करू शकत नाही, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिलं आहे. जेव्हा आम्ही असं कुठलंही काम करू तेव्हा थेट घरी बसू. संजय राऊत शिवसेनेचा ठाकरे गट फोडून एक नवा गट स्थापन करून उरलेली शिवसेना फोडण्याच्या तयारीत आहेत. ठाकरे गटात राऊत हे मोठी उठाव करणार आहेत. ते नवीन गट स्थापन करण्याच्या तयारीत आहेत, असाही खळबळजनक दावा चंद्रकांत पाटील यांनी केला.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पाटील यांनी राऊतांना डिवचण्यासाठी तर अशा प्रकारचा दावा केला नाही ना? असाही प्रश्न उपस्थित केला जातोय.

संजय राऊत काय म्हणाले होते?

संजय राऊतांनी आज मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील आणि पाचोरा पारोळाचे आमदार पुढची निवडणूक भाजपाकडून लढतील, असा दावा केलाय. हे दोन्ही आमदार गिरीश महाजन यांच्या अतिशय निकटवर्तीय असल्याचेमानले जातात त्यामुळे ही माझी खात्रीची माहिती आहे, अशीही पुष्टी संजय राऊतांनी जोडली होती.

Follow Us
महागाईचा डबल झटका! हा लोकांच्या खिशावर दरोडा; इंधन दरवाढीवर....
महागाईचा डबल झटका! हा लोकांच्या खिशावर दरोडा; इंधन दरवाढीवर.....
अजित पवारांच्या पक्षात नाराजीचं वादळ? पवार घेणार कोअर कमिटीची बैठक
अजित पवारांच्या पक्षात नाराजीचं वादळ? पवार घेणार कोअर कमिटीची बैठक.
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला...
लेकाला डॉक्टर करण्यासाठी कांड, 10 दिवसाआधीच...मोटेगावकरने असा फोडला....
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर...
ठाकरेंच्या जवळचा खासदार शिंदेंच्या गळाला? थेट नंदनवन बंगल्यावर....
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video
एकच खळबळ! शिवराज मोटेगावकरांचा काँग्रेस नेत्यांच्या प्रचार सभेत Video.
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव...
विदर्भात शेतकऱ्याला किडनी विकावी लागते, हे दुर्दैव....
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार
आमदार अमित साटम यांच्या कन्येचा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेतून माघार.
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?
राष्ट्रवादीनंतर शिवसेनेत मोठी खळबळ, बड्या नेत्याने फिरवली पाठ?.
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल.....
कोल्हापूरकरांचा नादच खुळा; जावयाला दीड किलो चांदीची चप्पल......
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ..
NEET पेपरफुटी प्रकरणातील शिवराज मोटेगावकरचा 2 दिवसांपूर्वीचा व्हिडीओ...