AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut: आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर… शिवसैनिक मरायला आणि मारायला तयार आहे, संजय राऊतांचा इशारा

नागपूरः अमरावतीचे खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्यासाठी आक्रमक झाले असताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही राणा दाम्पत्याला इशारा दिला आहे. आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा… शिवसैनिक स्वतःचं रक्षण करण्यासाठी समर्थ आहेत. शिवसैनिक मारायला आणि मरायला तयार आहे. फक्त आमचं सरकार आहे, त्यामुळे […]

Sanjay Raut: आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर... शिवसैनिक मरायला आणि मारायला तयार आहे, संजय राऊतांचा इशारा
Image Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Apr 23, 2022 | 10:47 AM
Share

नागपूरः अमरावतीचे खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणण्यासाठी आक्रमक झाले असताना संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही राणा दाम्पत्याला इशारा दिला आहे. आमच्या घरात घुसण्याचा प्रयत्न कराल तर याद राखा… शिवसैनिक स्वतःचं रक्षण करण्यासाठी समर्थ आहेत. शिवसैनिक मारायला आणि मरायला तयार आहे. फक्त आमचं सरकार आहे, त्यामुळे पोलिसांचं संरक्षण घेतलं जात आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या गोष्टी आम्हाला सांगू नका, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. दरम्यान, राणा दाम्पत्याने मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा म्हणण्यासाठी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे शेकडो शिवसैनिकांची गर्दी मातोश्री या निवासस्थानाबाहेर जमली आहे.

‘शिवसैनिक मरायला आणि मारायला तयार’

संजय राऊत राणा दाम्पत्य आणि त्यांच्या पाठिशी असलेल्या भाजपाला इशारा देताना म्हणाले, ‘ कुणाच्या तरी पाठबळानं तुम्ही आमच्या मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न करत असाल मुंबईत येऊन तर शिवसैनिक काय स्वस्थ बसतील का.. कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी आम्हाल सांगू नका… सरकारनं काय केलं पाहिजे… मुख्यमंत्र्यांनी काय केलं पाहिजे.. हे सल्ले ऐकण्याइतकं भिकारीपण महाराष्ट्राला आलेलं नाही…असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

आय रिपीट.. राष्ट्रपती राजवटीच्या धमक्या द्यायची नाही

भाजपाला इशारा देताना संजय राऊत म्हणाले, ‘ तुम्ही कोण आहात.. काय लायकी तुमची आहे? आम्हाला धमक्या देऊ नका.. हिंमत असेल ईडी, सीबीआय लावा.. आम्ही तुम्हाला घाबरत नाही.. शिवसैनिकांवर आता कुणाचाही कंट्रोल नाही याक्षणी. अजून काहीही सुरुवात झालेली नाही. दोन दिवसांत झालेल्या घटना या फक्त शिवसैनिकांच्या मनातील भावना नाही, तर महाराष्ट्रातील जनतेच्या मनातील रोष आहे. परत सांगतो.. आय रिपीट.. राष्ट्रपती राजवट लागण्याच्या धमक्या आम्हाला द्यायची नाही..आम्ही सत्तेसाठी जन्माला आलेलो नाही.. सत्ता आमच्यासाठी जन्माला आली, हे बाळासाहेबांचं वाक्य आहे.

‘बायकांच्या पाठीमागून वार करणं बंद करा..’

नवनीत राणा यांच्यावरून भाजपाला इशारा देताना संजय राऊत म्हणाले, ‘ बायकांच्या पाठीमागून वार करणं बंद करा. सात जन्म घ्यावी लागतील भाजपला आम्हाला पुरुन उरायला… केरळ, पश्चिम बंगालमध्ये भाजपला तिथले लोकं पुरुन उरले होते… कायदा आणि सुव्यवस्था बिघण्याचं काम भाजपचीच लोकं करत आहेत..त्यामुळे हा सगळा प्रकार बंद करा, असं अल्टिमेटम संजय राऊत यांनी दिलं.

इतर बातम्या-

Devendra Fadnavis | दक्षिण-पश्चिम नागपूरमधील 1600 कुटुंबांचा प्रश्न; झोपडपट्टीधारकांसाठी देवेंद्र फडणवीसांचा पुढाकार

Side Effects Of Ghee | आरोग्याच्या या समस्या आहेत?, तर तुपापासून चार हात दूरच राहा! 

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.