AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Patil : शिवीगाळ, धमकी देणाऱ्या संजय पाटील यांच्यावतीने शिवसेनेच्या बड्या नेत्याने मागितली माफी

Sanjay Patil : "संजय दीना पाटील यांच्याबद्दल संजय राऊतने अपशब्द वापरले. संजय पाटील यांनी भावनेच्या भरात प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. धमकी देताना कोणी अशी उघड धमकी देत नाही. भावनेचा उद्रेक झाल्यामुळे त्यांच्या तोंडातून हे वाक्य निघालं असावं"

Sanjay Patil : शिवीगाळ, धमकी देणाऱ्या संजय पाटील यांच्यावतीने शिवसेनेच्या बड्या नेत्याने मागितली माफी
Sanjay Patil
| Updated on: Jun 25, 2026 | 3:03 PM
Share

ठाकरे गटातून फुटून बाहेर पडलेले खासदार संजय दीना पाटील वादात सापडले आहेत. त्यांनी पत्रकारांना धमकावलं, शिवीगाळ केली. रागाच्या भरात बोलताना त्यांचा संयम सुटला. पत्रकारांना मारण्याची भाषा केली. माध्यमांनी हा विषय लावून धरला असून संजय पाटील यांच्यावर कारवाई कधी करणार? असा प्रश्न विचारला जात आहे. संजय दीना पाटील यांनी जी भाषा वापरली, त्यांच्याकडून जी चूक झाली त्या बद्दल संजय शिरसाट यांनी माफी मागितली आहे. संजय शिरसाट आमदार, मंत्री आणि शिवसेना प्रवक्ते आहेत. “गेल्या तीन-चार दिवसांपासून आपल्या माध्यमातून संजय दीना पाटील आणि संजय राऊत यांच्यात वाकयुद्ध सुरु आहे. कोणी बॉम्बने उडवून देण्याची धमकी देत आहे. कोणी स्टेनगन घेऊन फोटो काढून दाखवतोय. अशा प्रकाराचं कोणी समर्थन करणार नाही” असं संजय शिरसाट म्हणाले.

“संजय दीना पाटील यांच्याबद्दल संजय राऊतने अपशब्द वापरले. संजय पाटील यांनी भावनेच्या भरात प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. धमकी देताना कोणी अशी उघड धमकी देत नाही. भावनेचा उद्रेक झाल्यामुळे त्यांच्या तोंडातून हे वाक्य निघालं असावं. एकनाथ शिंदे संजय पाटील यांच्यावर नाराज आहे अशा बातम्या चालवल्या जात आहेत. पण संजय पाटील आणि एकनाथ शिंदे यांच्यात काय बोलणं झालं, ते त्या दोघांना माहित आहे. संजय पाटील यांच्या बोलण्याच कोणी समर्थन करणार नाही” हे संजय शिरसाट यांनी सांगितलं.

‘एक जण पिस्तुल दाखवतो, शिव्या देतो’

संजय राऊत आणि संजय पाटील यांनी आपसात भांडावं ते पत्रकारांना का शिव्या देत आहेत. या पत्रकारांच्या प्रश्नावर संजय शिरसाट यांनी माफी मागितली. “पत्रकारांना ते काही वेडंवाकडं बोलले असतील, तर मी त्यांच्यावतीने माफी मागतो. आम्ही त्यांच्याशी बोलू. एखाद्यावेळी फ्रस्ट्रेशन, राग आल्यामुळे ते बोलले असतील. मी सर्व पत्रकारांची माफी मागतो” असं संजय शिरसाट म्हणाले. “आम्ही त्यांच्याशी बोलू. अशा पद्धतीने बोलू नका अशी विनंती करु. तुमच्याबद्दल पत्रकारांना वेडवाकडं बोललं गेलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो. लोकशाहीत अशी भाषा कोणी करु नये. एक जण पिस्तुल दाखवतो, शिव्या देतो त्यानंतर स्वाभिमान म्हणून प्रत्युत्तर दिलं असेल पण ते योग्य नाही” असं संजय शिरसाट यांनी स्पष्ट केलं.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?