Santosh Deshmukh Case : संतोष देशमुख हत्या प्रकरण, 3 तासांच्या अमानुष मारहाणीचे 15 व्हिडिओ, 8 फोटो
Santosh Deshmukh Death Case Update : संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रात संतोष देशमुख यांच्या हत्या आणि मारहाणीचे व्हिडिओ पुरावे असल्याचं म्हंटलं आहे. आरोपींनी देशमुख यांना मारहाण करतानाचे तब्बल 15 व्हिडिओ काढलेले आहेत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. अपहरण केल्यानंतर संतोष देशमुख यांची हत्या करण्यापूर्वी त्यांना झालेल्या मारहाणीचे तब्बल 15 व्हिडिओ काढण्यात आलेले आहेत. तर 8 फोटो देखील काढलेले असल्याचं सीआयडीने आपल्या आरोपपत्रात म्हंटलं आहे. हे सगळे व्हिडिओ आणि फोटो सीआयडीने आरोपी महेश केदारच्या फोनमधून जप्त केलेले आहेत.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली. खंडणीच्या वादातून हा प्रकार घडला. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती समजला जाणारा वाल्मिक कराड हा आरोपी असून त्याचबरोबर इतर 7 आरोपी आहेत. यातील कृष्णा आंधळे हा अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाचा तपास सीआयडी आणि एसआयटीकडे सोपवण्यात आलेला होता. त्यानंतर गेल्या आठवड्यात सीआयडीने आपले आरोपपत्र बीडच्या विशेष मकोका कोर्टात सादर केलं आहे. तब्बल 1400 पानांचं हे आरोपपत्र असून यात संतोष देशमुख यांच्या हत्येचा आणि मारहाणीचा व्हिडिओ आरोपींनी बनवला असल्याचं म्हंटलं आहे. या अमानुष मारहाणीचे तब्बल 15 व्हिडिओ तयार करण्यात आलेले आहेत. तर 8 फोटो देखील काढलेले आहेत, जे आरोपी महेश केदारच्या फोनमध्ये सापडले आहेत.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार

'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब

पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड

'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
