कृष्णा आंधळे फरार, आरोपींना पळवून लावण्यात पोलिसांचा हात; मनोज जरांगेंचा आरोप
संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणी तीन महिने उलटली असतानाही आरोपी कृष्णा आंधळे फरार आहे. यावरून मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी आरोपींना संरक्षण मिळत असल्याचा आरोप केला आहे आणि या प्रकरणात त्वरित कारवाईची मागणी केली आहे.

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येला तीन महिने उलटले आहेत. मात्र अद्याप या गुन्ह्यातील आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. एकीकडे कृष्णा आंधळे हा फरार असल्याचे बोललं जात आहे. तर दुसरीकडे आरोपी कृष्णा आंधळे हा त्याच्या मित्रासह नाशिकमध्ये बाईकवरून फिरत असल्याचा दावा करण्यात आला. पण पोलिसांनी हा दावा फेटाळत तो कृष्णा आंधळे नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे. आता याप्रकरणावर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आरोपींना फाशी होणार म्हणजे होणारच
मनोज जरांगे यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना कृष्णा आंधळेसह विविध मुद्द्यांवर विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी भाष्य केले. कृष्णा आंधळे फरार आहे हे दुर्दैव आहे. फरार आरोपी अद्याप सापडत नाही. संतोष देशमुख बाबतीत जाणून बुजून केले जाते की काय असं वाटतं आहे? खून करणाऱ्या आणि खंडणी मागणाऱ्या आरोपींना गाड्या आणि घरे दिले जातात. काहींना पळवून लावण्यात पोलिसांचा हात आहे. यातील आरोपींना फाशी होणार म्हणजे होणारच, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी केला.
तुमच्यामुळे आमचे नुकसान होतेय
संतोष देशमुख यांचे आरोपी सापडत नाही मात्र इतर सापडतात हा भेदभाव आहे. हे सरकार असे की भ्रष्टाचारांशी पार्टनरशिप करणार सरकार आहे. तू माझं, मी तुझं असे करण्याचा प्रयत्न करत आहेत. संतोष देशमुख यांच्या विषयाला वळण देत आहे. त्यांना लक्ष हटवायचे आहे. त्यांना संतोष देशमुख प्रकरणाचे लक्ष हटवायचे आहे. हे सत्य असून आम्ही समर्थन करत नाही. राजकीय लोक यात घुसले की आमच्यासारख्या सामाजिक लोकांना अडचणी येतात. हे एकमेकांचं असे लोक अडवतील. हे बाहेर येत आहे. धनंजय मुंडे ३०२ मध्ये येत असून सरकार संशयाच्या भोवऱ्यात अडकणार आहे. आत बऱ्याच गोष्टी शिजत आहेत. तुमच्यामुळे आमचे नुकसान होतेय, असेही मनोज जरांगे म्हणाले.
आडनाव मिटवू शकत नाही
धनंजय मुंडे यांच्या टोळीने वाईट केले की आडनाव बोलण्याची वेळ आली. तुम्हाला आता झाकून यावं लागत आहे. सामाजिक स्वस्थ बिघडवण्याचे काम केले आहे. या टोळीत पोलिस अधिकारी, डॉक्टर आहेत. नेम प्लेट बदलने वाईट केले. कुणाचे आडनाव मिटवायचे आणि जायचे हे चुकीचे आहे. धनंजय मुंडे यांच्या गुंडांचा दहशतवाद तसाच ठेवायचा. निर्णय योग्य नाही. आडनाव मिटवू शकत नाही. कायद्याचे उल्लंघन करत असून याला जबाबदार धनंजय मुंडे यांची टोळी आहे. यामुळे जातीवाद वाढेल. याला सरकार जबाबदार आहे, असेही मनोज जरांगेंनी म्हटले.