AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Walmik Karad : वाल्मिक कराड फिल्म प्रोड्यूसर ? सोशल मीडियावरील त्या फोटोंनी खळबळ

बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराडचा सिनेसृष्टीशी संबंध असल्याचा धक्कादायक दावा निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर वाल्मीक कराडचे आयकार्ड आणि बीकेसीतील प्रॉडक्शन ऑफिसचे फोटो शेअर केले आहेत. या दाव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे

Walmik Karad : वाल्मिक कराड फिल्म प्रोड्यूसर ? सोशल मीडियावरील त्या फोटोंनी खळबळ
वाल्मिक कराड फिल्म प्रोड्यूसर ? Image Credit source: social media
| Updated on: Mar 31, 2025 | 10:09 AM
Share

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची डिसेंबर महिन्यात निर्घृण हत्या झाली आणि संपूर्ण महाराष्ट्र हादरला. तेव्हापासून एकच नाव सतत चर्चेत आहे, ते म्हणजे या हत्येचा मास्टरमाईंड असलेला वाल्मिक कराड. त्याच्यावर अनेक आरोप असून याच कराडचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. वाल्मिक कराडचे थेट चित्रपचसृष्टीशी अर्थात सिने-इंडस्ट्रीशी संबंध असल्याची चर्चा असून यासंदर्भात निलंबित पोलीस अधिकाऱ्याने खळबळजनक दावा केला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड फिल्म प्रोडूसर होता? असा दावा बीड मधील सायबर विभागातील निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला असून त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. गेल्या 3 महिन्यांपासून हे प्रकरण प्रचंड तापलेलं असून देशमुखांच्या मारेकऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी देशमुख कुटुंबियांपासून ते राज्यभरातील सर्व नागरिकांनी केली आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींपैकी वाल्मिक कराड हा सर्वात चर्चेत आहे. वाल्मिक कराड हा खंडणी आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराडवर अनेक आरोपझाले. कराड याचे सहकारी असलेले सुदर्शन घुले आणि इतर आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्यावर वाल्मिक कराडचे अनेक कारनामे समोर आले. काही वर्षांपूर्वी एक घरगडी असलेला वाल्मिक कराड आज कोट्यावधींचा मालक आहे, पुण्यासह अनेक ठिकाणी त्याच्या कोट्यवधींच्या जागाही आहेत. कराडने जमवलेल्या या संपत्तीची सतत चर्चा होत असते.

कराड होता फिल्म प्रोड्युसर ?

आता याच कराडबद्दलची आणखी एक माहिती समोर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड फिल्म प्रोडूसर होता, असा दावा बीड मधील सायबर विभागातील निलंबित पोलीस अधिकारी रणजीत कासले यांनी केला आहे. याबाबतचे काही फोटोज रणजीत कासले यांनी सोशल माध्यमावर वायरल केले आहेत. यात बीकेसी मधील प्रॉडक्शन ऑफिसचे फोटो त्याबरोबरच आयकार्डचा फोटो व्हायरल करण्यात आला आहे. इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर असोसिएशनचा वाल्मीक कराड अजीवन सभासद होता. बीआरजे फिल्म प्रोडक्शन ही निर्मिती संस्था असल्याचे समोर आले आहे. रणजीत कासले यांनी वाल्मीक कराड बाबत अनेक धक्कादायक बाबी समोर आणल्या आहेत, त्यामुळे मोठी खळबळ माजली आहे.

इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?
तपोवनच्या वादात राणेंनी ईदच्या बकरीला आणलं खेचून! नेमकं काय म्हणाले?.
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा
भाजप-शिंदेंच्या सेनेत भडका: फोडाफोडीवरून शिरसाटांचा भाजपला इशारा.
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर
पुतीन भारतात, दोस्ती दमदार..रशियाचे राष्ट्राध्यक्ष दोन दिवसीय दौऱ्यावर.
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?
अंदर की बात है, खडसे एकसाथ है? खडसे कुटुंबाची पडद्यामागे भाजपला मदत?.
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा
पवार कुटुंबात भाऊबंदकीचं ग्रहण? लग्नसमारंभातील अनुपस्थितीमुळे चर्चा.
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा
नगरपालिका निवडणुकीनंतर राड्यानंतर आता EVM लाा CCTV, पोलिसांचा पहारा.