Satara Crime : साताऱ्यामध्ये न्यायालयासमोरच कुख्यात गुंडावर भरदिवसा गोळीबार, सर्वत्र एकच खळबळ!

Satara Crime News : वाई न्यायालय परिसरामध्ये कुविख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव (Aniket Narayan Jadhav), निखील आणि अभिजीत शिवाजी मोरे यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला. गोळीबार झाल्यावर परिसरात खळबळ उडाली होती.

Satara Crime : साताऱ्यामध्ये न्यायालयासमोरच कुख्यात गुंडावर भरदिवसा गोळीबार, सर्वत्र एकच खळबळ!
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 8:01 PM

संतोष नलावडे, सातारा : सातारा जिल्ह्यामधील (Satara Crime News) वाई तालुक्यामध्ये दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडली आहे. न्यायालयाच्या परिसरातच अटकेत असलेल्या आरोपींवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. (Satara Firing News) वाई न्यायालय परिसरामध्ये कुविख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव (Aniket Narayan Jadhav), निखील आणि अभिजीत शिवाजी मोरे (Abhijeet Shivaji More) यांच्यावर हा गोळीबार करण्यात आला. गोळीबार झाल्यावर न्यायालय परिसरात खळबळ उडाली होती.

नेमकं काय आहे प्रकरण? 

वाई मेनवली येथील हॉटेल मालकास खंडणी मागितल्या प्रकरणी अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव, निखिल आणि अभिजीत शिवाजी मोरे अटकेत आहेत. खंडणी आणि दरोडा घातल्याप्रकरणी तिघांना पोलिसांनी कळंबा कारागृहातून अटक केली होती. त्यानंतर आरोपींना दोन दिवसांची न्यायालीयन कोठडी सुनावण्यात आली होती.

या आरोपींना वाई न्यायालयाच्या परिसरात दोघांना नेत असताना अज्ञातांनी गोळीबार केला. दोन फायर झाल्या मात्र कोणालाही काही दुखापत झाली नाही. पोलीस आरोपींना नेत असताना त्यांच्यावर अशा प्रकारे हल्ला झाल्याने पोलिसांचा काही धाक राहिला नाही का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, गोळीबार होताच सर्वत्र धावपळ उडालेली घटनेची माहिती समजताच वाई पोलिसांनी न्यायालयाच्या दिशेने धाव घेतली. पोलिसांनी गोळीबार केलेल्यांना ताब्यात घेतले असल्याची माहिती समजत आहे.

Non Stop LIVE Update
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?
शिंदेंच्या हेलिकॉप्टरचं चाक हेलिपॅडवर खचलं आणि...., कुठं घडला प्रकार?.
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं
बापरे... धक्कादायक... मुंबईत दोन ठिकाणी भलं मोठं होर्डिंग कोसळलं.
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद
मुंबईकरांनो...ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक बंद.
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण
शिंदेंची मध्यरात्री दिनकर पाटलांशी भेट, सामंतांनी सांगितलं भेटीचं कारण.
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं
लोकसभेचा 4 जूनचा निकाल काय असणार? प्रविण तरडेंनी एका शब्दात सांगितलं.
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा
डोक्यावर पगडी, लंगरमध्ये बनले वाढपी, मोदींकडून सुवर्ण मंदिरामध्ये सेवा.
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय
दोन तासांच्या दौऱ्यासाठी इतक्या जड बॅगा का? ठाकरे गटाचा गंभीर आरोप काय.
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त
मध्य रेल्वे विस्कळीत, 20 मिनिटं लोकलची वाहतूक उशिरानं; मुंबईकर संतप्त.
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा
पाकीट आलं...मालकमंत्री म्हणताय फुलाला मतदान करा, रोहित पवारांचा निशाणा.
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल
बुलेटचा फायदा मराठी माणसाला की गुजरातला? ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल.