‘महाराष्ट्र सदनाचा पैसा खातोय, माझी पाचवी काढतो तू’, मनोज जरांगे संतापले

"मराठ्यांचा नोंदी सापडल्या इथेच मराठ्यांचा विजय झालाय. 70 वर्षापूर्वी आरक्षण दिले असते तर मराठा समाज प्रगल्भ झाला असता. त्यो एकटा 30 टक्के खातो आणि म्हणतो तुझ्या बापाच खातो का? माझ्या वाटेला लागलं तर मी सोडत नाही", असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

'महाराष्ट्र सदनाचा पैसा खातोय, माझी पाचवी काढतो तू', मनोज जरांगे संतापले
manoj jarange patil and chhagan bhujbal
Follow us
| Updated on: Nov 18, 2023 | 9:12 PM

संतोष नलावडे, Tv9 मराठी, सातारा | 18 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली. त्यांच्या टीकेला मनोज जरांगे यांनी सुरुवातीला काही प्रतिक्रिया दिली नाही. पण आज साताऱ्याच्या सभेत मनोज जरांगेंनी छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर दिलं आहे. “महाराष्ट्र सदनाला जनतेचा पैसा आणि खातोय ह्यो. माझी पाचवी काढतो तू. आधी काय करत होता हे सर्व माहीत”, अशा खोचक शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांना प्रत्युत्तर दिलं आहे. “पुरावे नसल्यामुळे मराठ्याला मराठा आरक्षण मिळालं नाही. त्यावेळी पुरावे नव्हते तर आता नोंदी सापडतात कसे? हे सर्व षडयंत्र आहे”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

“कोणत्याही नोंदी नसताना 1967 मध्ये इतर आरक्षण दिले गेले. मात्र मराठा आरक्षण मिळाले नाही. मराठ्यांचा नोंदी सापडल्या इथेच मराठ्यांचा विजय झालाय. 70 वर्षापूर्वी आरक्षण दिले असते तर मराठा समाज प्रगल्भ झाला असता. त्यो एकटा 30 टक्के खातो आणि म्हणतो तुझ्या बापाच खातो का? माझ्या वाटेला लागलं तर मी सोडत नाही”, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

‘मी पाचवी शिकलो म्हणाले, पण…’

“मी पाचवी शिकलो म्हणाले, पण मला बघायला वेळ नाही. तो म्हणतो आम्ही 60 टक्के, त्याने एक टोळी केलीय, असं समजलं. कुणीही गाफील राहु नका. मराठ्यांनी 70 टक्के लढाई जिंकलीय. महाराष्ट्रात 75 वर्षात सर्व पक्षांना माझ्या बापजाद्यांनी मदत केली. त्यातला आज एकही आरक्षणासाठी डोकवेना. राजकारण करा. पण स्वत:च्या मुलाचं वाटोळं करु नका. आरक्षण मिळाल्यावर कोणाचाही झेंडा उचला. तोपर्यंत काही नाही”, असं मनोज जरांगे म्हणाले.

‘जातीय दंगली घडवल्या जात आहेत’

“जाती-जातीत भांडणे घडवता, याकडे मराठ्यांनी लक्ष देण्याची गरज नाही. मराठा-ओबीसीत जाण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. यासाठीच जातीय दंगली घडवल्या जात आहेत. मराठा आणि ओबीसी बांधवांनी कुणीही एकमेकांच्यात झुंजायचं नाही. नोंदी सापडत आहेत तर गावागावातला ओबीसीसुद्धा मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजं, असं म्हणत आहेत”, असा दावा मनोज जरांगेंनी केला.

‘आम्ही सत्ताधाऱ्यांचे आणि विरोधकांचे शत्रू झालो’

“माझ्यावर सरकारने षडयंत्र रचले. काही जण म्हणतात आम्हाला कुणबीमधून आरक्षण नको म्हणतात. शेतीला पहिले कुणबी म्हणायचे, मग कुणबीची लाज वाटत असेल तर जमीन विका आणि चंद्रावर राहायला जावा. आम्ही सत्ताधाऱ्यांचे आणि विरोधकांचे शत्रू झालो. मराठा आरक्षण मिळाल्याशिवाय एक इंचही मागे हटणार नाही. 1 डिसेंबरपासून गावागावात साखळी उपोषण बसले पाहिजेत. एकाही मराठ्याच्या पोराने आरक्षणासाठी आत्महत्या करायची नाही. कोणी कोणाचं नाही. सरकारची 24 डिसेंबरपर्यंत कसोटी आहे”, अशी भूमिका मनोज जरांगेंनी मांडली.

“सरकारला आवाहन करतो. आमच्या हक्काचं आरक्षण मिळालं पाहिजे. राजकीय नेत्यांना आवाहन करतो, आपल्या लेकरांवर वेळ आलीय तर तुम्ही त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे राहा. तुम्ही मराठ्याच्या पाठिशी उभा राहीला नाहीत तर मराठा माफ करणार नाही आणि नाही आला तरी आमच्या मनगटात ताकद आहे. सरकारने 24 डिसेंबरला आरक्षण दिलं नाही तर मराठा बैठक घेऊन पुढील दिशा ठरवणार”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

Non Stop LIVE Update
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे
पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यामध्ये गोंधळ, एका आठवड्यात दादांचे दोन दावे.
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे मुंबईतील 'या' मतदारसंघातून अपक्ष लढणार?.
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार
जरांगेंना काहीच समजत..., जरांगे आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा वार-पलटवार.
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात
मोदी-अमित भाईंचा फोन गेला की टाटा सरळ..., अजित पवारांचं विधान वादात.
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा
त्या वक्तव्यानं माझं वाटोळं, तेव्हापासून... दादांच्या वक्तव्याची चर्चा.
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल
त्यानं लय वाटोळं केलंय मराठ्यांच, माझा एकच विरोधक… जरांगेंचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?
मुख्यमंत्री शिंदेंना ठार मारण्याचा ठाकरेंचा डाव? कुणी केला गंभीर आरोप?.
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा
पुण्यात सुनेत्रा पवारांची जोरदार बँटिंग, व्हायरल व्हिडीओची तुफान चर्चा.
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?
सोलापुरातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर दरोडा, नेमकं काय घडलं?.
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल
आता ही तुतारी तुमची चांगलीच..., संजय राऊतांचा महायुतीवर हल्लबोल.