Satara Crime : अल्पवयीन गतीमंद मुलीवर बलात्कार, नऊ आरोपींना अटक, साताऱ्यातील पाटण येथील घटना

पाटण येथील या अल्पवयीन गतीमंद मुलीला आरोपी महिला फिरायला जायचा बहाणा करुन घेऊन जायची. त्यानंतर तिची पाटण आणि आजूबाजूच्या लोकांशी ओळख करुन द्यायची. मग तिला ओळख करुन दिलेल्या व्यक्तींशी शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडायची.

Satara Crime : अल्पवयीन गतीमंद मुलीवर बलात्कार, नऊ आरोपींना अटक, साताऱ्यातील पाटण येथील घटना
कुर्ल्यात शॉपिंग सेंटरचा छज्जा कोसळून पाच वर्षाच्या बालकाचा दुर्दैवी मृत्यू
Follow us
| Updated on: Feb 21, 2022 | 8:41 PM

कराड : अल्पवयीन मुलीवर गतीमंद मुलीवर (Mentally Challenged) बलात्कार (Rape) केल्याची घटना साताऱ्यातील पाटण येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीनुसार पाटण पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी 9 आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे मुलीवर झालेल्या अत्याचाराला एक महिलाच जबाबदार आहे. एका ओळखीच्या महिलेने मुलीला फिरायला जाण्याचे तसेच खाऊ आणि पैसे देण्याचे आमिष दाखवून बाहेर नेले. त्यानंतर पीडितेला आरोपींसोबत शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडायची. पाटण याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. (Nine accused arrested for raping underage girl, Incident at Patan in Satara)

ओळखीतील महिलेनेचे घडवून आणले दुष्कृत्य

पाटण येथील या अल्पवयीन गतीमंद मुलीला आरोपी महिला फिरायला जायचा बहाणा करुन घेऊन जायची. त्यानंतर तिची पाटण आणि आजूबाजूच्या लोकांशी ओळख करुन द्यायची. मग तिला ओळख करुन दिलेल्या व्यक्तींशी शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडायची. अशा प्रकारे पाटण आणि आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी सदर पीडितेवर वेळोवेळी विविध ठिकाणी नेऊन वारंवार बलात्कार केला. ही बाब मुलीच्या आईला कळल्यानंतर तिने तात्काळ पाटण पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी कारवाई करीत नऊ आरोपींना अटक केली असून अधिक तपास पोलिस करीत आहेत.

वर्ध्यात तीन अल्पवयीन मुलींवर बलात्कार

वर्ध्यात तीन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना गिरड पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावात रविवारी उघडकीस आली. तीन अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या घटनेने वर्धा जिल्ह्याला हादरा बसला आहे. यापैकी दोन मुली सख्ख्या बहिणी आहेत. गिरड पोलिसांनी आरोपी नराधमास अटक केली आहे. केशव बावसू वानखेडे (56) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील रहिवासी आहे. आरोपीला न्यायलयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपी केशव वानखेडे हा लोखंडी पिपे विक्रीचे काम करतो. विविध गावांत जाऊन तो लोखंडी पिपे विकायचा. अशाताच तो गिरड पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावात दाखल झाला. गावातील रस्त्याकडेला तो पिपे विकायचा. (Nine accused arrested for raping underage girl, Incident at Patan in Satara)

इतर बातम्या

Dhule Crime : घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार मुद्देमालासह जेरबंद, चाळीसगाव रोड पोलिस प्रशासनाची कारवाई

Beed : बीडमध्ये वाळू माफियांचा तहसिलदारांच्या घराला गराडा, दृश्ये सीसीटीव्हीत कैद

Non Stop LIVE Update
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.