पुणे-बंगलोर महामार्गावर टँकरचा भीषण अपघात, चुकीच्या ठिकाणी उतरल्या मायलेकी, दुसऱ्या बसची वाट पाहत होत्या इतक्यात…

मायलेकी आणि नात तिघी जणी नातेवाईकांकडे चालल्या होत्या. चुकून दुसऱ्या ठिकाणी बसमधून उतरल्या. मग दुसऱ्या बसची वाट पाहत तिथेच थांबल्या होत्या.

पुणे-बंगलोर महामार्गावर टँकरचा भीषण अपघात, चुकीच्या ठिकाणी उतरल्या मायलेकी, दुसऱ्या बसची वाट पाहत होत्या इतक्यात...
साताऱ्यात टँकर अपघातात मायलेकीचा मृत्यूImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 11:09 AM

सातारा : साताऱ्यात अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. बसची वाट पाहत महामार्गावर उभ्या असलेल्या मायलेकी आणि नातीला भरधाव टँकरने चिरडल्याची घटना घडली. पुणे बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आनेवाडी गावाच्या हद्दीत ही घटना घडली. टोलनाक्याहून साताऱ्याच्या दिशेने निघालेल्या टँकरवरील चालकाचे पुलावरून उतारावर नियंत्रण सुटले. यावेळी वाहनांच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या दोन महिला आणि एका लहान मुलीला टँकरने उडवले. यामध्ये एका महिलेचा जागीच मृत्यू झाला तर दुसऱ्या महिलेचा जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या अपघातात नऊ वर्षाची मुलगी बचावली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शारदा कैलास शिर्के आणि आरती राजेंद्र कांबळे अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघी मायलेकींची नावे आहेत. शारद शिर्के या भोर तालुक्यातील पारवडी गावच्या रहिवासी आहेत. तर आरती कांबळे या पांडे गावातील रहिवासी आहेत. घटनेची माहिती मिळताच भुईंज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित टँकर चालकाला अटक केली असून, या अपघाताची नोंद भुईंज पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

लिंब गावी जायचे होते, चुकून आनेवाडीला उतरल्या

भोर तालुक्यातील पांडे या ठिकाणाहून शारदा शिर्के आणि आरती कांबळे या दोघी मायलेकी 10 वर्षाच्या मुलीसह साताऱ्यातील लिंब या गावी पाहुण्याकडे येत होत्या. त्यांना लिंब फाटा येथे उतरायचे होते, मात्र त्या चुकून आनेवाडी फाट्यावर उतरल्या. यावेळी आपण अलीकडेच उतरलो असल्याचे समजल्यानंतर लिंब फाट्याकडे जाण्यासाठी त्या महामार्गालगत दुसऱ्या वाहनाची वाट पाहत उभ्या होत्या.

हे सुद्धा वाचा

स्टेअरिंग रॉड तुटल्याने टँकर अनियंत्रित

यादरम्यान आनेवाडी टोल नाक्यावरून एक टँकर गुजरातवरून बेळगावकडे निघाला होता. आनेवाडी फाट्यावरील पुलावरून साताऱ्याकडे जात असताना टँकरचा अचानक स्टेअरिंग रॉड तुटल्यामुळे चालकाचा टँकरवरील ताबा सुटला. यावेळी वाहनाच्या प्रतीक्षेत उभ्या असलेल्या या दोन महिला आणि लहान मुलीला उडवले. या अपघातात 60 वर्षीय शारदा यांचा जागीच ठार झाली तर आरती कांबळे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातात दहा वर्षाची मुलगी जखमी झाली.

Non Stop LIVE Update
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.