… तर आम्हालाही कर्नाटकचे प्रवासी रोखण्याचा विचार करावा लागेल; सतेज पाटील भडकले

आम्हालासुद्धा कर्नाटकचे प्रवाशी महाराष्ट्रात घेताना विचार करावा लागले, अशी रोखठोक भूमिका सतेज पाटलांनी घेतली. (Satej Patil karnataka government maharashtra citizens)

... तर आम्हालाही कर्नाटकचे प्रवासी रोखण्याचा विचार करावा लागेल; सतेज पाटील भडकले
सतेज पाटील
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 3:05 PM

कोल्हापूर : महाराष्ट्रातील नागरिकांना कर्नाटकमध्ये प्रवेशबंदी केल्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील ((Satej Patil) कर्नाटक सरकारच्या (karnataka government) आडमुठेपणावर संतापले आहेत. कर्नाटक सरकारने प्रवाशांना न रोखता त्याची RTPCR टेस्ट करून राज्यात प्रवेश करायला परवानगी द्यावी. अन्यथा आम्हालासुद्धा कर्नाटकचे प्रवाशी महाराष्ट्रात घेताना विचार करावा लागले, अशी रोखठोक भूमिका सतेज पाटलांनी घेतली. (Satej Patil criticizes karnataka government on banning the entry of maharashtra citizens)

…तर आम्हालाही विचार करावा लागेल

यावेळी बाोलताना त्यांनी कर्नाटक सरकारला धारेवर धरलं. महाराष्ट्रातील नागरिकांना कर्नाटकात प्रवेशबंदी करणे चुकीचे असल्याचे त्यांनी म्हटलं याहे. “कोरोना संसर्ग वाढत असला तरी, महाराष्ट्रतील नागरिकांची आरटीपीसीआर टेस्ट करुन त्यांना कर्नाटकमध्ये प्रवेश द्यावा. कर्नाटक सरकार आडमुठी भूमिका घेत असेल तर आम्हालादेखील कर्नाटकचे प्रवाशी महाराष्ट्रात घेताना विचार करावा लागेल. कर्नाटक सरकारच्या या भूमिकेबाबत मी केंद्राला माहिती देणार आहे,” असे सतेज पाटील म्हणाले. तसेच, कर्नाटक सरकारने प्रवाशांची कोरोना चाचणी करून त्यांना क्वॉरन्टाईन करावं, आम्हाला काहीही हरकत नाही, असंही ते म्हणाले.

कर्नाटक सरकारचा निर्णय काय?

देशात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. वेगवेगळ्या राज्यांनी प्रतिबंधात्मक उपाय उपायांची अंमलबजावणी करणे सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारनेसुद्धा प्रवासासंबंधीचे नियम कडक केले आहे. कर्नाटक सरकारने नुकतंच माहाराष्ट्रातील नागरिकांना कर्नाटमध्ये प्रवेशबंदी केली आहे.

महाराष्ट्रातून कर्नाटकात जाणाऱ्या प्रवाशांना कर्नाटक सरकारने प्रवेशबंदी केली आहे. केवळ 72 तासाच्या आतील कोरोना निगेटिव्ह असलेल्यांनाच कर्नाटकात प्रवेश दिला जात आहे. कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक सरकारकडून प्रत्येक प्रवाशांची कसून चौकशी केली जात आहे. ज्यांचा अहवाल निगेटिव्ह असेल त्यांनाच कर्नाटकात प्रवेश दिला जातोय. पॉझिटिव्ह असलेल्या व्यक्तींना परत पाठवले जात आहे. कोगनोळी नाक्यावर या निर्णयाची अंमलबजावणी सुरु झालेली आहे. त्यामुळे अचानक तपासणी सुरू करण्यात आल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय होत आहे. या प्रवाशांना रांगेत तास न् तास अडकून राहवं लागत आहे. तसेच काही प्रमाणात वाहतूक कोंडीचाही सामना करावा लागत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे.

इतर बातम्या :

गृहमंत्र्यांनंतर गृहराज्यमंत्र्यांना कोरोनाची लागण, सतेज पाटील कोरोनाबाधित

Non Stop LIVE Update
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा
वंचित उमेदवाराची माघार, भाजपची डोकेदुखी तर काँग्रेसला मिळणार दिलासा.
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन
शिंदेंच्या बंडाचा आणखी एक पत्ता उघडला, टपरीवरून शिंदेंचा ठाकरेंना फोन.
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार
विशाल पाटलांची बंडखोरी कायम, माघार नाहीच; ‘या’ चिन्हावर लोकसभा लढणार.
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?
माफी मागत शरद पवार म्हणाले, 'ती' चूक पुन्हा कधीच नाही; निशाणा कुणावर?.
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे
पत्रकार परिषदेत डुलकी,गोऱ्हेंनी जरा उठा...म्हणताच प्रवक्ते खजबडून जागे.
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट
आता उशीर झालाय, ठाकरेंना दिल्लीतून सांगितले; शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट.
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी
पैसे पाठवा अन्यथा,सलमानसारख प्रकरण करू, शरद पवार गटाच्या नेत्याला धमकी.
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका
देशात आज नवीन पुतीन तयार होतोय, शरद पवारांची मोदींवर अप्रत्यक्ष टीका.