अजितदादा बारामतीतून निवडणूक लढवायला घाबरतायेत, कारण…; माजी मंत्र्याच्या विधानाने चर्चांना उधाण

Baramati Vidhansabha Election 2024 : विधानसभा निवडणूक तोंडावर असताना अजित पवार यांनी बारामतीत बोलताना एक विधान केलं. त्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. त्यावर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून भाष्य करण्यात आलं आहे. अजित पवार घाबरल्याचं त्यांनी म्हटलं आहे. वाचा सविस्तर...

अजितदादा बारामतीतून निवडणूक लढवायला घाबरतायेत, कारण...; माजी मंत्र्याच्या विधानाने चर्चांना उधाण
अजित पवारImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Sep 11, 2024 | 8:53 AM

पिकतं तिथं उगवत नाही. बारामतीला माझ्याशिवाय नेतृत्व मिळालं पाहिजे. बारामतीकरांना मी सोडून आमदार मिळाला पाहिजे. 1991 ते 2024 च्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीत बोलताना केलं. यावर आता शरद पवार गटाच्या नेत्याने प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते, माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांनी अजित पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. जळगावमध्ये टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी अजित पवारांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे.

अजित पवार घाबरतायेत- पाटील

अजित पवार यांनी शरद पवार यांना रोखलं का? उलट बारामतीकरांनी जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. आता अजित दादा स्वतः म्हणत आहेत की मी बारामतीमध्ये निवडणूक लढणार नाही. बारामतीमध्ये शरद पवार साहेबांची कामगिरी आहे. त्यामुळे अजित पवार हे स्वतः त्या ठिकाणी निवडणूक लढवायला घाबरत आहेत. फुटून आलेल्या आमदार 2 हजार, 3 हजार कोटींची काम सांगतात. त्या सुद्धा त्यांनी की टक्केवारी घेतलेली आहे लोक त्यांना जाब विचारत आहेत. त्यामुळे लोक यांचा हिशोब करायला निघालेले आहेत, असं डॉ. सतीश पाटील यांनी म्हटलं आहे.

मविआ सरकार येणार- पाटील

अनेक योजना आणून सुद्धा लोक त्याला भुलत नाहीये त्यामुळे जास्तीत जास्त निवडणूक लांबवल्या जात आहेत. पर्याय म्हणून राष्ट्रपती राजवट लागण्याची सुद्धा शंका आम्हा सर्वांना वाटते आहे. सगळे घरी जाणार आहेत, आणि विधानसभेमध्ये जास्तीत जास्त जागा या महाविकास आघाडीच्या निवडून येतील. महाविकास आघाडीचं सरकार येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय.

एकनाथ खडसे या भाजपमध्ये जाण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून वेटिंगवर होते. पण भाजपकडून ग्रीन सिग्नल न मिळाल्याने एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी शरद पवार गटातच राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरही पाटील यांनी भाष्य केलं. एकनाथ खडसे यांना सुद्धा मान्य झाला आहे की महाविकास आघाडीचे सरकार येत आहेत. त्यामुळे ते जर म्हणत असतील की महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. तर त्यांच्या तोंडात साखर पडू द्या. भाजपने त्यांना लटकवून ठेवलं आहे..मात्र त्यांनी दिलेला अल्टिमेटम हा संपलेला आहे, असं सतीश पाटील म्हणाले.

गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?
गुन्हेगारी, राजकारण अन् सध्यस्थितीवर काय म्हणाले सरसंघचालक भागवत?.
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
'हीच वचपा काढण्याची अन् क्रांतीची वेळ', राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?.
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्...
नवनीत राणा यांच्या जीवाला धोका, अश्लील भाषेत धमकीचं पत्र अन्....
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज
‘लाडकी बहीण योजने’साठी सरकारकडून पुन्हा संधी,'या' तारखेपर्यंत करा अर्ज.
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं....
मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी का निघाले? दादांनी स्पष्टच म्हटलं.....
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली
'काम करणारा भाऊ पाहिजे की चुXXX बनवणारी...', भरत गोगावलेंची जीभ घसरली.
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?
विधानसभा तोंडावर असताना संघानं टोचले भाजपचे कान, RSS च्या सूचना काय?.
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?
टाटा ट्रस्टच्या अध्यक्षपदी कोणाची निवड? टाटांनंतर कोण उत्तराधिकारी?.
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स.