तापता उन्हाळा : तापमान वाढल्याने अकोल्यातील पहिले ते सातवीचे वर्ग आता सकाळी साडे अकरापर्यंतच: जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

अकोला जिल्ह्यात सातत्याने तापमान वाढत आहे. त्याचा फटका विद्यार्थी, नागरिक आणि वयोवृद्धांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे संभाव्य परिणाम लक्षात घेता जिल्ह्यातील इयत्ता पहिले ते सातवी पर्यंतच्या सर्व शाळांची वेळ 18 एप्रिलपासून सकाळी सात ते साडेअकरा अशी करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.

तापता उन्हाळा : तापमान वाढल्याने अकोल्यातील पहिले ते सातवीचे वर्ग आता सकाळी साडे अकरापर्यंतच: जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
अकोल्यात उष्णता वाढल्याने शाळांच्या वेळेत बदल
गणेश सोनोने

| Edited By: महादेव कांबळे

Apr 12, 2022 | 10:17 PM

अकोला: अकोला जिल्ह्यात (AKola) सातत्याने तापमान वाढत (Heat) आहे. त्याचा फटका विद्यार्थी, नागरिक आणि वयोवृद्धांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे संभाव्य परिणाम लक्षात घेता जिल्ह्यातील इयत्ता पहिले ते सातवी पर्यंतच्या सर्व शाळांची (Primary School)  वेळ 18 एप्रिलपासून सकाळी सात ते साडेअकरा अशी करण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत. अकोला जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका, नगर पंचायत, तसेच ग्रामीण भागातील तसेच सर्व व्यवस्थापनांच्या, सर्व माध्यमांच्या खासगी, शासकीय, निमशासकीय शाळांची वेळ 18 एप्रिलपासून सकाळी सात ते साडे अकरा अशी करण्यात आली आहे.

तापमानाची तीव्रता लक्षात घेता शाळा व्यवस्थापनांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षा विषयक उपाय योजावेत, तसेच मनपा आयुक्त, जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांनी या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी शाळांमध्ये आवश्यक ते नियोजन करावे असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहेत.

आरोग्यावर विपरित परिणाम

वाढत्या तापमानामुळे विद्यार्था, ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत आहे. तापमान वाढले असल्याने वर्गात बसल्यानंतर विद्यार्थ्यांना उष्णतेमुळे त्रास होत आहे. त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून हा निर्णय घेतला गेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत संबंधित विभागालाही आदेश दिले आहेत. त्यामुळे 18 एप्रिलपासून आता सकाळच्या वेळेत शाळा सुरु होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

विद्यार्थ्यांचे आरोग्य बिघडले

शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना उन्हाचा मोठा त्रास होत होता. त्यामुळे अनेक विद्यार्थी आजारी पडणे, वर्गात बसल्यानंतर त्यांना उष्णतेचा त्रास होणे असा त्रास होत होता. अकोला जिल्ह्यातील अनेक शाळांना वाढत्या तापमानाचा फटका बसत असल्याने हा निर्णय घेतला गेला आहे.

संबंधित बातम्या

Raj Thackeray Thane Uttar Sabha Live: जंतराव, हा संपलेला पक्ष नाही, ‘विझवत’ जाणारा पक्ष, राज ठाकरेंच्या टार्गेटवर जयंत पाटील

Raj Thackeray Thane News: आमचा साईनाथ त्यावेळेस, ज्या नेत्यामुळे राज ठाकरेंनी हटवलं, त्याच्यावर वसंत मोरेंची भरसभेत स्तुतीसुमनं

Wardha Murder : वर्ध्यात चारित्र्याच्या संशयातून दगडाने ठेचून पत्नीची हत्या, आरोपी पतीला अटक

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें