AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रुग्णांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरानेच उचललं टोकाचं पाऊल; परिसरात एकच खळबळ

रुग्णांवर उपचार करून त्यांना जीवदान देणाऱ्या एका डॉक्टरांनीच स्वत:चं आयुष्य संपवलं आहे. डॉ. दिनेश भटकळ असं त्यांचं नाव असून ते 79 वर्षांचे होते. गेल्या काही काळापासून ते स्वत: कर्करोगाशी झुंज देत होते.

रुग्णांना जीवदान देणाऱ्या डॉक्टरानेच उचललं टोकाचं पाऊल; परिसरात एकच खळबळ
प्रतिकात्मक छायाचित्र (एआय जनरेटेड इमेज)Image Credit source: AI Generated Image
| Updated on: May 22, 2026 | 10:23 AM
Share

उपचार करून रुग्णांचे प्राण वाचवणाऱ्या एका ज्येष्ठ डॉक्टरानेच टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं आहे. कर्करोगाने त्रस्त असलेल्या या ज्येष्ठ डॉक्टराने शुक्रवारी सकाळी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे बेळगाव शहरात खळबळ उडाली आहे. डॉ. दिनेश लक्ष्मण भटकळ असं असून ते 79 वर्षांचे होते. ते मूळचे उत्तर कन्नड जिल्ह्यातील अंकोला तालुक्याचे होते. अनेक वर्षे वैद्यकीय सेवा बजावल्यानंतर ते बेळगावमध्ये स्थायिक झाले होते. साधेपणा आणि मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांची समाजात विशेष ओळख होती. डॉ. भटकळ यांनी असं पाऊल उचलल्यामुळे सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.

आजारपणाला कंटाळून उचललं टोकाचं पाऊल?

बेळगावच्या केएलई रुग्णालयात ते कार्यरत होते. डॉ. दिनेश भटकळ यांना फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचं निदान झाल्याचं सांगितलं जात आहे. कर्करोगान त्रस्त असल्यामुळे त्यांनी टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. टिळकवाडी सीपीआयसह काही पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तपास केला आहे. ही घटना बेळगावमधील टिळकवाडीतील पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी आत्महत्येची नोंद केली आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. भटकळ यांनी बेळगावमधील मंडोली रोडवरील आपल्या घराच्या बाल्कनीत स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवलं. गोळीबाराचा आवाज ऐकून कुटुंबीय आणि शेजारी तातडीने घटनास्थळी धावले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. प्राथमिक तपासात आजारपण आणि मानसिक नैराश्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असावं, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. डॉ. भटकळ यांच्या आत्महत्येमागील नेमकं कारण तपासानंतर स्पष्ट होणार असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं आहे.

Follow Us
मोठी खळबळ! जरांगेंना भेटण्यापूर्वी भाजप नेत्याला थेट जीवे मारण्याची...
मोठी खळबळ! जरांगेंना भेटण्यापूर्वी भाजप नेत्याला थेट जीवे मारण्याची....
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.