AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छत्रपती घराण्याचे वंशज शाहू महाराज संतापले; म्हणाले, ‘इतकी अस्थिरता…’

"भविष्य काळात रणांगण सुरू होणार आहे. प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की घटनेला साथ द्यायची आहे की घटना गाडून टाकणाऱ्यांना साथ द्यायची. महाराष्ट्रात इतकी अस्थिरता यापूर्वी कधीही आली नव्हती. पक्षांतर बंदी कायदामधून पळवाटा काढल्या जात आहेत. त्यामध्ये दुरुस्ती करणे गरजेचं आहे", असं शाहू महाराज छत्रपती म्हणाले.

छत्रपती घराण्याचे वंशज शाहू महाराज संतापले; म्हणाले, 'इतकी अस्थिरता...'
| Updated on: Feb 20, 2024 | 9:47 PM
Share

भूषण पाटील, Tv9 प्रतिनिधी | 20 फेब्रुवारी 2024 : कॉम्रेड गोविंद पानसरे यांचा आज स्मृती दिवस आहे. पानसरे यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने त्यांच्या स्मारकाचा लोकार्पणाचा कार्यक्रम आज कोल्हापुरात पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते पानसरे यांच्या स्मारकाचं लोकार्पण झालं. या कार्यक्रमाला छत्रपती घराण्याचे वंशज शाहू महाराज छत्रपती हे देखील उपस्थित होते. यावेळी शाहू महाराजांनी देखील भाषण केलं. “आपण आज एका वेगळ्या कार्यक्रमासाठी आलो आहोत. गोरगरीब जनतेसाठी पानसरे काम करत राहिले. मला पानसरे यांचे विचार ऐकायला आवडत होते. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश यांच्या लागोपाठ सीरियल हत्या झाल्या. मात्र या हत्यांचे धागेदोरे अजून सापडले नाहीत. गोविंद पानसरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज कोण होते? हे सर्वसामान्य नागरिकांना समजावून सांगितले. आधुनिक काळात शाहू महाराज यांचे समतेचे विचार पानसरे यांनी आत्मसाथ केले”, असं शाहू महाराज छत्रपती म्हणाले.

“विचारांनी आपण एक राहिलो तर आपण कुणालाही तोंड देऊ शकतो. भविष्य काळात रणांगण सुरू होणार आहे. प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की घटनेला साथ द्यायची आहे की घटना गाडून टाकणाऱ्यांना साथ द्यायची. महाराष्ट्रात इतकी अस्थिरता यापूर्वी कधीही आली नव्हती. पक्षांतर बंदी कायदामधून पळवाटा काढल्या जात आहेत. त्यामध्ये दुरुस्ती करणे गरजेचं आहे. पक्षांतर का होतात? त्याची कारणं काय आहेत? हे सर्वांनाच माहिती आहे”, अशा शब्दांत शाहू महाराजांनी निशाणा साधला.

‘महाराष्ट्राच्या वाट्याला शेपटीचा तुकडा’

“सर्व उद्योगधंदे गुजरातमध्ये जात आहेत आणि महाराष्ट्राच्या वाट्याला शेपटीचा तुकडा टाकला जातो. काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे हे आपल्याला समजले असेल तर ते बदलण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. आपल्याला तलवार घेऊन लढाईला जायचं नाही. मात्र विचाराची लढाई विचाराने लढायची आहे. आत्ताच्या परिस्थितीला कोल्हापुरातूनच प्रतिकार होऊ शकतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे”, असं शाहू महाराज म्हणाले.

‘भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा’, शरद पवारांची टीका

यावेळी शरद पवार यांनीदेखील भूमिका मांडली. “गोविंद पानसरे यांच्यावर हल्याच्या माध्यमातून पुरोगामी विचार नष्ट करू, असा प्रयत्न काही प्रवृत्तीने केलाय. विचार ज्यांच्याकडे नाही अशी प्रवृत्ती कायदा हातात घेऊन अशी कृत्य करत गेली.⁠ आज प्रतिगामी शक्ती वाढत आहे.⁠ देशाच्या सर्वोच्च सभागृहाचे अधिवेशन असताना पंतप्रधान अधिवेशनासाठी फक्त वीस मिनिटं संसदेत आले. सत्तेचा गैरवापर सध्या सुरू आहे.⁠ प्रतिगामी शक्तींना दूर ठेवणे हीच पानसरेंना श्रद्धांजली ठरणार आहे.⁠ आपल्या विरोधात कोण आवाज उठवत असेल तर सत्तेच्या गैरवापर करून आम्ही तो आवाज बंद करू शकतो हा संदेश देशभरात दिला जातोय”, असं शरद पवार म्हणाले.

“भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा अशी स्थिती सध्या आहे. हा संघर्ष फक्त निवडणुकीपुरता नाही. एकत्र येऊन अशा प्रतिगामी विचारांना रोखण्याची गरज आहे.⁠ कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने नेहमीच राज्याला एक दिशा दाखवली आहे. पुरोगामी विचार जिवंत ठेवण्यासाठी कोल्हापूरकरांना शाहू महाराजांकडून अपेक्षा आहेत. पुरोगामी शक्ती वाढवण्यासाठी शाहू महाराजांची गरज आहे”, अशी भावना शरद पवारांनी बोलून दाखवली.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.