AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केदारनाथमधून 228 किलो सोने गायब… शंकराचार्य यांचा मोठा आरोप, म्हणाले, नरेंद्र मोदी…

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी केदारनाथमध्ये सोन्याचा घोटाळा झाला आहे. 228 किलो सोने गायब झाले आहे. याला जबाबदार कोण? असा सवाल केला.

केदारनाथमधून 228 किलो सोने गायब... शंकराचार्य यांचा मोठा आरोप, म्हणाले, नरेंद्र मोदी...
uddhav thackeray (1)Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Mahesh Pawar
Mahesh Pawar | Updated on: Jul 15, 2024 | 8:24 PM
Share

आम्ही सनातन धर्माचे पालन करणारे लोक आहोत. पुण्य आणि पापाची भावना येथे स्पष्ट केली आहे. गोहत्या हे सर्वात मोठे पाप असल्याचे म्हटले आहे. त्याहूनही मोठा हल्ला म्हणजे विश्वासघात असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांचा विश्वासघात झाला आहे. यामुळे प्रत्येकाच्या हृदयात वेदना होत आहेत असे सांगून ते म्हणाले, ठाकरे यांचे सरकार पाडणे ही चांगली गोष्ट नाही. विश्वासघात करणारा हिंदू असू शकत नाही. याचा त्रास संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला होत आहे. जे सत्य असेल तेच शंकराचार्य सांगतील असे ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सांगितले.

शिवसेना (यूबीटी) नेते उद्धव ठाकरे यांच्या विनंतीवरून ज्योतिषपीठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी मात्रोश्री निवासस्थानी भेट दिली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद यांची कुटुंबासह भेट घेतली. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक मुद्द्यावर चर्चा केली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संबंधित प्रकरण, दिल्लीतील प्रतीकात्मक केदारनाथ मंदिर, केदारनाथ धामचे 228 किलो सोने गायब झाल्याच्या मुद्द्यांवरून सरकारला सवाल केले.

केदारनाथमध्ये सोन्याचा घोटाळा झाला आहे. 228 किलो सोने गायब झाले आहे. त्याची आजतागायत चौकशी झालेली नाही. याला जबाबदार कोण? आम्ही दिल्लीत प्रतीकात्मक केदारनाथ बांधू. पण हे होऊ शकत नाही. केदारनाथ हिमालयात आहे. तुम्हाला केदारनाथचे स्थान का बदलायचे आहे? हा चुकीचा प्रयत्न आहे. राजकीय हितसंबंध असलेले लोक आमच्या धार्मिक स्थळांमध्ये घुसत आहेत अशी टीका त्यांनी केली. नरेंद्र मोदी माझे शत्रू नाहीत. आम्ही पंतप्रधान मोदींचे शुभचिंतक आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शंकराचार्य यांच्या या वक्तव्यानंतर शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांनी हे शंकराचार्यांना शोभत नाही अशी प्रतिक्रिया दिली. जगतगुरु शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंदजी हे धार्मिक कमी आणि राजकीय जास्त आहेत. ठाकरे यांना भेटणे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असू शकतो. त्यावर आक्षेप नाही. पण, शिवसेनेच्या अंतर्गत वादावर राजकीय भाष्य करणे त्यांनी टाळायला हवे होते. मुख्यमंत्री कोण होणार आणि कोण नाही, हे जनता ठरवेल, शंकराचार्य नाही. विश्वासघात करणारे हिंदू असू शकत नाहीत. हे फार विचित्र तर्क आहे. सर्वप्रथम हे ठरवावे लागेल की विश्वासघात कोणी केला? आणि शंकराचार्य हे ठरवू शकत नाहीत असे संजय निरुपम यांनी सांगितले.

Follow Us
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपकेंचं पुन्हा आंदोलन?
आता परीक्षा केंद्रावारून उठायचं नाही... अभिजीत दीपके पुन्हा आंदोलनाला बसले, हायकोर्ट टायपिंग परीक्षा प्रकरण तापलं
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंबाबत..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची मोठी कबुली; गोपीनाथ मुंडेंच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या दाव्यावर म्हणाले...
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, काय घडलं?
छत्रपती संभाजीनगरात हायकोर्ट टायपिंग परीक्षेत मोठा गोंधळ, नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा खुलासा
मोठी बातमी! बावनकुळेंचे चार कॉल आले, म्हणाले... मनोज जरांगेंचा कुणबी प्रमाणपत्राबाबत मोठा खुलासा
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... भावेश कावरेचं मोठं विधान
मला वाद वाढवायचा नाही, मी माफी मगतोय... ब्रोकर भावेश कावरे ठाकरेंच्या भेटीनंतर नेमकं काय म्हणाला?
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर
एकच खळबळ! सगळीकडे धावपळ... आंतरराष्ट्रीय विमानतळावर मिसफायर, व्हिडीओच आला समोर
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्...
मुंबईत भयंकर घडलं! 112 वर कॉल केला अन्... पोलिसांनीच मारहाण केल्याच्या आरोपाने मोठी खळबळ
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी...
अमित शाहांनी भर मंचावरून काँग्रेसची लाज काढली; थेट म्हणाले, जराशी तरी लाज शिल्लक असेल तर...
लातूरमधील घटना: रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू
लातूरमधील खासगी रुग्णालयात प्रसूतीदरम्यान महिलेचा मृत्यू, नातेवाईकांकडून निष्काळजीपणाचा आरोप
रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत काय घडलं?
Maratha Arakshan | रुग्णालयातून थेट अंतरवाली सराटीत; जरांगे पाटलांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?