AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अन्…, शरद पवारांनी जाहीर भाषणात आव्हाडांचे कान टोचले, राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?

आज नाशिकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या एक दिवसीय शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरामध्ये बोलताना शरद पवार यांनी मराठा-ओबीसी संघर्षावर बोलताना मोठं वक्तव्य केलं आहे.

अन्..., शरद पवारांनी जाहीर भाषणात आव्हाडांचे कान टोचले, राष्ट्रवादीच्या शिबिरात नेमकं काय घडलं?
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 14, 2025 | 7:44 PM
Share

आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचं एक दिवसीय शिबीर नाशिकमध्ये पार पडलं, या शिबीरामध्ये बोलताना शरद पवार यांनी आज पुन्हा एकदा मराठा आणि ओबीसीमध्ये सध्या सुरू असलेल्या संघर्षावर मोठं वक्तव्य केलं आहे, तसेच यावेळी शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांचे जाहीर भाषणात कान देखील टोचले आहेत.

महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवायला लागली आहे, ही अतिशय चिंतेची बाब आहे. जितेंद्र आव्हाड यांनी भाषण करताना बजरंग सोनवणे यांच्याकडे पाहून बोलायची गरज नव्हती. सामाजिक ऐक्य साधणारा हा पक्ष आहे. हा पक्ष कुणा एकाचा नाही, असे म्हणत शरद पवारांनी जितेंद्र आव्हाड यांचे कान टोचले आहेत. लवकरच महाराष्ट्रात मी प्रत्येक जिल्ह्यात जाणार आहे आणि कार्यकर्त्यांशी सुसंवाद साधणार आहे. तुम्ही देखील प्रत्येक तालुक्यात पोहचा असंही यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.

शरद पवार यांनी नेमकं काय म्हटलं? 

हैदराबाद गॅजेट यावर आधारित निर्णय घ्यावा असं सांगण्यात आलं. या गॅझेटमधे काही विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. व्हीजेएनटी बंजारा यांना आदिवासीच स्थान यामध्ये देण्यात आले आहे. आता बंजारा समाजाने मागणी सुरू केली आहे, काहीही झालं तरी चालेल पण आता आम्हाला आदिवासीमध्ये घेतलं पाहिजे. याचा अर्थ काय तर समाजासमाजामध्ये कटूता वाढेल असे निर्णय घेतले जात आहेत. बावनकुळे यांच्या  नेतृत्वात ओबीसी समिती स्थापन करण्यात आली आहे. सगळे ओबीसी समितीत आहेत, तर दुसरीकडे मराठा समाजासाठी जी समिती नेमण्यात आली तर त्यात महाजन सोडले तर सगळे मराठा आहेत. राज्य सरकारच्या कमिट्या कधी एका समाजाच्या करायच्या नसतात, असं म्हणत यावेळी शरद पवार यांनी राज्य सरकारला देखील खोचक टोला लगावला आहे.

दरम्यान यावेळी बोलताना शरद पवार यांनी केंद्र सरकारवर देखील जोरदार हल्लाबोल केला आहे. आज केंद्रातील सत्ता ज्यांच्या हातात आहे ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही. त्यामुळे  शेतकरी संघटना अधिक प्रभावी करणे गरजेचे आहे. देशाचा नकाशा काढा, पाकिस्तान, नेपाळ अडचणीत आहेत. बांगलादेश उद्ध्वस्त झाला आहे. त्याच्या स्वातंत्र्यसाठी भारताने खस्ता खाल्ल्या होत्या तो आपल्या सोबत नाही, श्रीलंका आपल्या सोबत नाही. देशाची धुरा मोदी यांच्या हातात आहे. त्यांनी आता परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित आहे, असं यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...