AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदेंच्या पुरस्कारानंतर दिल्लीत संजय राऊत, शरद पवार एकाच मंचावर; राऊतांकडून पवारांचं कौतुक म्हणाले…

एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं दिल्लीमध्ये शरद पवार आणि संजय राऊत हे एकाच व्यासपीठावर आले. यावेळी संजय राऊत यांनी शरद पवार यांचं कौतुक केलं आहे.

एकनाथ शिंदेंच्या पुरस्कारानंतर दिल्लीत संजय राऊत, शरद पवार एकाच मंचावर; राऊतांकडून पवारांचं कौतुक म्हणाले...
| Updated on: Feb 20, 2025 | 9:54 PM
Share

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. यावेळी बोलताना शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचं कौतुक केलं होतं. शरद पवार यांच्या या भूमिकेनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली. दुसरीकडे मात्र शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर त्यावेळी जोरदार हल्लाबोल केला होता. ‘शरद पवार यांच्यावर विश्वास ठेवला पण विश्वासघात झाल्यासारखी परिस्थिती आहे’, असं राऊत यांनी त्यावेळी म्हटलं होतं.

दरम्यान त्यानंतर आता एका पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं दिल्लीमध्ये शरद पवार आणि संजय राऊत हे एकाच व्यासपीठावर आले. यावेळी मात्र संजय राऊत यांनी शरद पवार यांचं कौतुक केलं आहे. शरद पवार हे आमचे विरोधकही नाहीत आणि शत्रू तर अजिबात नाहीत ते मार्गदर्शक आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

नेमकं काय म्हणाले संजय राऊत?  

संजय राऊत यांनी शरद पवार यांचं कौतुक केलं आहे. ते एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. ‘महाराष्ट्र सदन हे दिल्लीमध्ये मराठी माणसाचं, महाराष्ट्राचं एक महत्त्वाचं स्थान असलेली जागा आहे, आणि इथे हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला माननीय पवार साहेब उपस्थित आहेत.  पवार साहेबांसोबत मी देखील आहे,  माननीय पवार साहेब हे आमचे विरोधकही नाहीत आणि शत्रू तर अजिबात नाहीत. ते महाराष्ट्राचे, देशाचे आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आहेत, आणि ते राहातील. मी अनेक वर्ष लिहितो आहे, रोज लिहितो आहे. कुठेही असो तरी लिहितो. विमानात लिहितो,  कारमध्ये असलो तरी लिहितो. पुस्तक लिहीनं सोपं नाही. मी तुरुंगातून सुटल्यानंतर मला पुस्तक लिहायचं होतं. तीन वर्ष झाली अजून पुस्तक लिहितो आहे, पण पुस्तक लिहिनं सोपी गोष्ट नाही, असं यावेळी संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे.

Follow Us
माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर...पुर्णेकर प्रकरणात
Pradip Purnekar | माझ्या मुलाने काही केलं नाही; यात हात असेल तर... प्रदीप पुर्णेकर प्रकरणात पप्या शिंदेंच्या आईचा मोठा दावा
वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद - बजरंग सोनवणे
Bajrang Sonawane : वाल्मिक कराड जेलमध्ये असला तरी अनेकांसोबत फोनवरून संवाद; बजरंग सोनवणेंचा गंभीर आरोप
1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
Amravati : अमरावतीत दुष्काळाचा कहर; 1285 गावांची पैसेवारी 50 पैशांखाली; शेतकऱ्याने उभं सोयाबीनच जाळलं
50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना...
Chandrshekhar Bawankule : 50 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; सूर्या प्रकल्पग्रस्तांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड अन्...
उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी
NCP Sharad Pawar on CJP : उद्याच्या CJP मोर्चाला पवारांची राष्ट्रवादी मैदानात; सुप्रिया सुळेंनी जाहीर केला पाठिंबा
पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
Sanjay Raut on Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा दावा! पूर्णेकरला संपवण्यामागे कोणाचा हात?, राऊतांनी सगळंच सांगून टाकलं
तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन
CM DCM Meeting : रात्री उशिरा तिन्ही नेत्यांची बैठक! विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा मोठा प्लॅन; जागावाटपावर खलबतं - सुत्र
लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं एवढ्या कोटींना विकलं
Lalbaugcha Raja Auction : लालबागच्या राजाच्या चरणी अर्पण केलेलं 1 किलो सोनं तब्बल एवढ्या कोटींना विकलं! बाप्पाचा आशीर्वाद मानून भक्तानेच खरेदी केलं
मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? तब्बल एवढ्या कोटींच्या....
Manoj Jarange ED : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांवर ED ची नजर? आर्थिक व्यवहारांची गोपनीय चौकशी सुरू; तब्बल एवढ्या कोटींच्या व्यवहारांचा दावा
हे जैनांचं नाही, आगरी-कोळी, मराठी बांधवांचं शहर; मनसेचा कोणाला टोला?
MNS On Narendra Mehata : मीरा-भाईंदरच्या ओळखीवरून राजकीय रणकंदन! हे जैनांचं नाही, आगरी-कोळी आणि मराठी बांधवांचं शहर; मनसेचा नेमका कोणाला टोला?