सर्वाधिक आनंद कधी झाला…शरद पवार यांनी सांगितली ती गोष्ट

Sharad Pawar: भाजपा हा मग्रूर पक्ष आहे. दिल्लीत तीनदा मुख्यमंत्री भूषविले अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकले आहे. महाराष्ट्र राहुल गांधी की नरेंद्र मोदी यावर निवडणूक प्रचार होत आहे. परंतु ही लढाई स्थानिक प्रश्नावर आहे. ही लढाई घरगुती झालीय.

सर्वाधिक आनंद कधी झाला...शरद पवार यांनी सांगितली ती गोष्ट
sharad pawar
Follow us
| Updated on: Apr 08, 2024 | 10:42 AM

शरद पवार यांनी सोमवारी बारामती आणि पुरंदर तालुक्यातील जिरायती भागाचा दौरा केला. शरद पवार यांनी त्यांच्या दौऱ्याची सुरुवात बारामती तालुक्यातील उंडवडी पठार या गावातून केली. यावेळी शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका करताना आपले अनुभव सांगितले. आपणास सर्वात जास्त आनंद कधी झाला? हे शरद पवार यांनी यावेळी सांगितले. 10 वर्षे देशाचा कृषिमंत्री म्हणून काम केल्यानंतर आपणास सर्वात जास्त आनंद झाल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

मनमोहनसिंग यांच्याकडे काय मागितले?

शरद पवार म्हणाले की, माझ्या कामाची सुरुवात जिरायत भागापासून झाली. जिरायत भाग आणि दुष्काळाचे नाते कायमचे होते. त्यामुळे गावोगावी रोजगार हमी कामे आणि बंधारे बांधण्यास सुरवात केली. राजकारणात असताना अनेक मंत्रीपदे भूषवली. पण सर्वाधिक आनंद देशाचे कृषीमंत्री झाल्यावर झाला. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी कोणते मंत्रीपद हवे? अशी विचारणा केली होती. त्यावेळी इतर कोणतेही पद न मागता कृषीमंत्रीपद आपण मागितले.

कृषीमंत्रीपद मिळाल्यावर काय केले

देशाचा कृषीमंत्री शेतीत अनेक बदल केले. त्यामुळे आज जगात 18 देशांमध्ये धान्य निर्यात होत आहे. शेतकऱ्यामुळे ही बाब घडून आली. यावेळी शरद पवार यांनी मोदी सरकारवर टीका केली. भाजपा हा मग्रूर पक्ष आहे. दिल्लीत तीनदा मुख्यमंत्री भूषविले अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकले आहे. महाराष्ट्र राहुल गांधी की नरेंद्र मोदी यावर निवडणूक प्रचार होत आहे. परंतु ही लढाई स्थानिक प्रश्नावर आहे. ही लढाई घरगुती झालीय.

हे सुद्धा वाचा

सुप्रिया सुळे यांचे केले कौतूक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणी स्थापन केली? असा सवाल शरद पवार यांनी विचारला. जिरायत भागाने माझी कधीही साथ सोडली नाही. सुप्रिया सुळे ही माझी मुलगी आहे, हे या भागातील लोकांनी मान्य केले आहे. तिला संसदेत जोरदार कामगिरी केली आहे. देशातील पहिल्या तीन खासदारांमध्ये ती आहे. संसदेत तिची उपस्थिती ९० टक्के आहे.

Non Stop LIVE Update
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सकाळीच प्रवाशांना मनस्ताप, कुठं बिघाड?
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, सकाळीच प्रवाशांना मनस्ताप, कुठं बिघाड?.
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात
निवडणूक आयोगाचा वापर घरगड्या सारखा..उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारवर घणाघात.
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?
ऐ थांब जरा.... राज ठाकरे चिडले अन् माध्यमांवर भडकले, पण का?.
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं
मतदान करायला आले अन EVM कक्षाला घातला हार, शांतीगिरी महाराजांना भोवलं.
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले
हे अत्यंत वाईट...आदेश बांदेकर मतदान करण्यासाठी आले अन् भडकले.
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
राज ठाकरे चोरीच्या मालाचं चुंबण घेतायत, ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?
राऊतांचे बंधू सुनील मतदान केंद्राबाहेर पोलिसांवरच भडकले, नेमक काय घडल?.
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात...
किरीट सोमय्या मतदानानंतर भावूक; म्हणाले, अनेक वर्षांनंतर आयुष्यात....
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान
म्हणून मी पण रांगेत उभ राहिलो, महायुती उमेदवार कपिल पाटलांनी केल मतदान.
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
आज 13 जागांसाठी मतदान, 6 जागा मुंबईच्या, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला.