AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जागा वाटपावरुन शिंदेंचे मंत्री आणि आमदार आक्रमक! काय आहे शिंदेंच्या मंत्र्यांची मागणी?

महायुतीत आणखी काही जागांचा तिढा कायम असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री आणि आमदार जागावाटपावरुन आक्रमक झाले आहेत. शिवसेनेच्या जागा देऊ नका अशी त्यांनी मागणी आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात या जागांवरुन रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

जागा वाटपावरुन शिंदेंचे मंत्री आणि आमदार आक्रमक! काय आहे शिंदेंच्या मंत्र्यांची मागणी?
shinde MLA
shailesh musale
shailesh musale | Updated on: Apr 06, 2024 | 10:00 PM
Share

Loksabha election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी झालेल्या बैठकीत जागा वाटपावरुन शिंदेंचे मंत्री आणि आमदार आक्रमक झाल्याची माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पालघर आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागा सोडू नका अशी मागणी शिंदेंच्या मंत्र्यांनी केली आहे. आपल्या जागा सोडू नका, यावर मंत्री आणि आमदारांनी मुख्यमंत्र्यांसमोर आक्रमक भूमिका घेतली आहे.

आपलेच मतदारसंघ कसे जात आहे, मित्रपक्षांचे मतदारसंघ आपल्याला मिळावेत, अशी रोखठोक भूमिका मंत्र्यांनी घेतली आहे. तसंच संजय निरुपमांना पक्षात घेण्यावरुन एकमत झालं असून 48 तासांत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. एक मोठा नेता आणि अनेक आमदार संपर्कात असल्याची चर्चाही बैठकीत झाली आहे.

शिवसेनेचे १० उमेदवार जाहीर

शिंदेंच्या शिवसेनेकडून आतापर्यंत 10 उमेदवारांची घोषणा झाली आहे. त्यात 3 विद्यमान खासदारांचा पत्ता कट झाला आहे. आणखी 3-4 जागा शिंदेंच्या शिवसेनेला मिळू शकतात. त्यावरुन बैठकीनंतर शिरसाटांनीही भाष्य केलं आहे. भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत असल्याचं शिरसाटांनीच म्हटलं आहे.

नाशिक आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या दोन मतदारसंघावरुन भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु आहे. नाशिकमध्ये विद्यमान खासदार हेमंत गोडसेंचं तिकीट निश्चित झालेलं नाही. इथं अजित पवार गटाच्या भुजबळांना उमेदवारी निश्चित झाल्याची चर्चा आहे. त्यातच मुख्यमंत्री शिंदेंनी, गोडसेंना मुंबईत बोलावून घेतलं आहे.

भुजबळांच्या उमेदवारीला शिवसेनेत विरोध

मला तिकीट मिळाल्यास भुजबळही माझं काम करतील आणि भुजबळांना तिकीट मिळाल्यास मी मदत करेल असं गोडसे म्हणत असले तरी शिंदेंच्या शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरींनी भुजबळांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. भुजबळांना उमेदवारी मिळाल्यास शिवसैनिक काम करणार नाही, असा इशारा चौधरींनी दिला आहे.

4 ते 5 जागांचा तिढा अजूनही महायुतीत कायम आहे. त्या जागांवरुन शिंदेंनी मंत्री आणि नेत्यांची बैठक घेतली. पण आपल्या जागांवर ठाम राहायचं हीच भूमिका शिंदे गटानं घेतल्यानं, तिढा नेमका कसा सुटेल हे पाहणं महत्वाचं असेल.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा