साई मंदिराची सर्व दारं उघडा नाहीतर आंदोलन, शिर्डी ग्रामस्थांचा इशारा

साई दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता आता मंदिराचे सर्व प्रवेशद्वार खुले करा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.

  • मनोज गाडेकर, टीव्ही 9 मराठी, शिर्डी
  • Published On - 19:33 PM, 26 Jan 2021
साई मंदिराची सर्व दारं उघडा नाहीतर आंदोलन, शिर्डी ग्रामस्थांचा इशारा

शिर्डी : कोरोनाचा प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्यानंतर शिर्डीमध्ये साई मंदिर खुलं कऱण्यात आलं. आता देशभरात लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली आहे. त्यानंतर शिर्डीत साई दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मंदिरात साई दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता आता मंदिराचे सर्व प्रवेशद्वार खुले करा अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. मागणी मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.(Villagers demand opening of all entrances to Sai Mandir)

मंदिर परिसरातील सर्व प्रवेशद्वारं खुली करावीत आणि ग्रामस्थांना सुलभपणे दर्शन मिळावं या मागण्यांकडे ग्रामस्थांनी लक्ष वेधलं आहे. शनिवारपर्यंत मागण्या मान्य झाल्या नाही तर शिर्डी बंद ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. त्यानंतर साई संस्थानकडून याबाबत खुलासा करण्यात आला आहे. मंदिर परिसरातील काही दरवाजे बंद असल्यानं व्यापाऱ्यांमध्ये असंतोष आहे, ही परिस्थिती असली तरी कोविडच्या नियमावलीसाठी ते आवश्यक असल्याचं साई संस्थानकडून सांगण्यात आलं आहे.

‘व्यापारी वर्गाला दिलासा दिला जाणार’

सरकारने घालून दिलेल्या कोरोना नियमांचं पालन करणं गरजेचं आहे, या दृष्टीनं व्यापारी वर्गाला दिलासा देण्यासाठी काही पर्याय आहेत. त्यादृष्टीनं व्यापारी वर्गाला दिलासा देण्यासाठी काही पर्याय असून त्यावर ग्रामस्थांशी चर्चा करणार असल्याची माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकीर कान्हुराज बगाटे यांनी दिली आहे. गावकऱ्यांच्या मागण्यांबाबत आम्ही सकारात्मक आहोत. कुणी चुकीची माहिती देत असेल तर गैरसमज करुन घेऊ नये, असं आवाहनही मंदिर संस्थानकडून करण्यात आलंय. भाविकांना साईबाबांचं सुलभपणे दर्शन घेता यावं सासाठी विशेष व्यवस्था केली जाईल. तसा एक प्रस्ताव समितीकडे पाठवला असल्याची माहितीही बगाटे यांनी दिली आहे.

साई मंदिरात पत्रकारांसाठी जाचक अटी

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर एसओपीचे पालन करत साईभक्तांना दर्शनाची परवानगी देण्यात आलीय. यानंतर त्यातील अनेक त्रुटी प्रसारमाध्यमांनी समोर आणल्या. आता साई संस्थानने प्रसारमाध्यमांसाठी नवीन 11 कलमी नियमावली तयार करण्याचा घाट घातलाय. औरंगाबाद उच्च न्यायालयाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने जाचक अटींसह ही नियमावली तयार केल्याने शिर्डीतील प्रसारमाध्यम प्रतिनीधींनी त्याला विरोध केलाय.

संबंधित बातम्या :

शिर्डीत साई दर्शनासाठी अलोट गर्दी, 2 किलोमीटरपर्यंत दर्शन रांगा

शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घ्यायचंय? आधी सोडतो म्हणत दाखवला बाहेरचा रस्ता, ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यातील वाद चव्हाट्यावर

Villagers demand opening of all entrances to Sai Mandir